Friday 6 July 2012

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे {एम.ए.,एम.फिल.,पी.एच.डी.(इतिहास)बी.ड्रामा}


प्रा.डॉ.दिनेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्या एका दुर्लक्षित पैलू संबंधात या ग्रंथात माहितीपूर्ण विवेचन करून इतिहास लेखनात महत्वपूर्ण भर घातलेली आहे.

 ज्या कालखंडात  स्त्रीची किंमत उपभोग्य वस्तू म्हणून मानली जात असे त्या कालखंडातील एका राजाची स्त्री विषयक दृष्टिकोन स्पष्ट  करून सांगणे हे या पुस्तकाचे प्रमुख बलस्थान आहे.

शिवाजी महाराज हे नीतीमत्तेचे समर्थक होते उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी नीतीमत्ता आवश्यक ठरते. शिवाजी महाराजांची नीतीमत्ता ही किती उच्च दर्जाची होती हे समजून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मुळापासून वाचावे लागेल.

मध्ययुगीन काळात स्त्रियांचा गुलाम म्हणून सर्रास व्यापार चालत असे.विशेषत: युध्द अथवा लुटीत मिळालेल्या स्त्रियांवर ही गुलामी लादली जाई.शिवाजीराजांचा डचांबरोबर जेव्हा तह झाला तेव्हा त्या तहात शिवरायांनी गुलामगिरीच्या प्रथेला आळा घातला,त्यांनी त्या तहातील एका कलमात स्पष्ट म्हटले -"मुसलमानांच्या कारकीर्दीत तुम्हाला स्त्री पुरुष गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती.परंतु माझ्या राज्यात अशा गुलाम प्रथेला परवानगी मिळणार नाही."

शिवाजीराजे हे मध्ययुगातील पहिले सत्ताधीश आहेत की ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घातला."महापुरुष आपल्या काळाला आणि समाजाला घडवितो आणि आकार देतो असे नित्सेने म्हटले आहे."  ते शिवरायांच्या बाबतीत बऱ्याच अंशी लागू पडते.  पारंपारिक व्यवस्थेने छळलेल्या आणि तळागाळाच्या घटकाला न्याय देण्याचे क्रांतीकार्य शिवरायांनी आपल्या काळानुरूप केले, म्हणूनच ३५० वर्षानंतरही मराठी माणसाला 'शी-वा-जी ' या तीन शब्दांचे प्रचंड आकर्षण आहे. 

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण हे पंचफुला प्रकाशनाचे १२ वे पुस्तक प्रा.डॉ.दिनेश मोरे यांच्या अभ्यासपूर्ण व्यासंगातून आकारास आले आहे. शिवरायांचा स्त्रीवादी दृष्टिकोन आजही साऱ्या जगाला अचंबित करून सोडतो पण डॉ.दिनेश मोरे यांनी मात्र या विषयावर एक स्वतंत्र पुस्तक लिहून शिवप्रेमी,इतिहास अभ्यासक आणि वाचकांची चांगली सोयच करून दिली आहे. प्रस्तुत पुस्तक विक्रीसाठी खुले झाले आहे. हे पुस्तक प्रत्येक शिव् प्रेमिकडे असायलाच हवे.

प्रकाशन: पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.
मूल्य:६० रु./- (टपाल  खर्च ३० रु /- वेगळा. अशी एकत्रित रक्कम आमच्या खालील पत्त्यावर पाठवा )
पृष्ठे : ७२
संपर्क: ९४ २२ ५२ ८२ ९०
पत्ता: पंचफुला प्रकाशन, प्लॉट नं.११४७, साई नगर, एन-६, सिडको, औरंगाबाद-४३१ ००३.

1 comment:

  1. this book will answer many questions.it is an important work because the efforts have been made to neglect this aspect of SHIVARAY

    ReplyDelete