Monday 16 July 2012

अमेरिकेत शिवराय...(भाग १)

      छत्रपती शिवरायांचा कालखंड संपून ३५०-४०० वर्ष झाले असले तरी आजही त्यांचे कार्य जगभरातील मानवी समूहाला भुरळ घालते आहे. म्हणूनच जगभरातील बऱ्याच युद्धात शिवरायांच्या शिवतंत्राचा वापर करण्यात आला आहे. सर रवींद्रनाथ टागोर जपानला हेले असता त्यांना तेथील पत्रकारांनी सवाल केला की एका वाक्यात तुम्ही तुमच्या देशाची ओळख काय सांगाल? तेव्हा टागोरांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले की-"बुद्धाचे तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे." अशा प्रकारे आपल्या देशाची मान जगभरात उंचावणारया शिवरायाचे देशभर स्मारके आहेत.पण देशाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार सुधा शिवरायांचे स्मारक आहे असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल नं? पण मित्रांनी हे खरे आहे.शिवाजी महाराज फक्त देशातच नाही तर देशाच्या बाहेरही पोचले आहेत. शिवरायांचे स्मारक परदेशात आहे आणि ते ही स्वताला जागतिक महासत्ता समजणाऱ्या अमेरिकेत. पण हे आपल्याला माहित नाही हे इथल्या बामणी व्यवस्थेचे हरामखोरीचे लक्षन होय.

     छ.शिवरायांचा पुतळा अमेरिकेतील कालीफोर्णिया प्रांतातील स्यान  जोसे शहरात गुअदालुपे रिव्हर पार्क (GUADALUPE RIVER PARK )  येथे आहे. या स्मारकाची उंची साधारणतः ४ फूट असून त्याचे वजन २०० पौंड पेक्षा अधिक आहे. शिवरायांचे हे शिल्प "बी.आर.खेडकर " यांनी बनविले असून यासाठी सुमारे १ लाख रुपयांचा खर्च आणि ३ महिन्यांचा कालावधी लागला आहे.  हे शिल्प कालीफोर्नियातील  बगीच्यात साधारणतः २०><२० एवढ्या जागेत बसविले आहे. हा पुतळा "स्यान जोसे-पुणे सिस्टर कमिटी " तर्फे पुण्याचे तात्कालिक महापौर शिवश्री दत्ता गायकवाड यांच्या हस्ते स्यान जोसे शहराचे महापौर शिवश्री रोन गोंझाले यांना भेट म्हणून देण्यात आला.

     ज्या चबूतऱ्यावर  शिवरायांचे हे शिल्प उभे केले आहे त्या  चबूतऱ्यावर शिल्पाविषयी माहिती देणारा एक स्टीलचा फलकही लावण्यात आला आहे.या फलकावर इंग्रजी भाषेतून पुढील मजकूर कोरला आहे-

"SHIVAJI FOUNDED PUNE (CIRCA1640).HE WAS THE FIRST MODERN WARRIOR WHO SUCCESSFULLY FOUGHT THE FOREIGN INVADERS FOR 40YEARS AND ESTABLISHED A MARATHA KINGDOM. THAT LASTED 200 YEARS WITH PUNE AS ITS CAPITAL."

  याचा स्वैर अर्थ "शिवाजी राजांनी पुणे हे शहर वसवले. आधुनिक भारतातील शिवाजी हा पहिला थोर राजा होता ज्याने परदेशी शक्तींशी सर्व शक्तीने लढा दिला आणि मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचे हे साम्राज्य पुढे २०० वर्ष टिकले ज्यात पुणे हे महत्वाचे शहर होते."
         बांधवांनो यावरून आपल्याला इंग्रजी भाषा किती महत्वाची हे समजलेच असेल.म्हणून आता आपल्या मुला मुलींना हाय फाय इंग्रजी शिकवायला सुरु करा. हे शिल्प  पाहून आपण शपथ घेऊया की आयुष्यात एकदा तरी अमेरिकेत जाऊन महाराजांच्या या स्मारकाला भेट देईन तरच माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. शिवरायांच्या याच शिल्पाच्या साक्षीने आपण निर्धार करुया की आम्ही मराठे पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ.... पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ.....पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ   !!!

 अमेरिका स्थित शिव् स्मार्काची काही छायाचित्रे खास "पंचफुला प्रकाशनाच्या " वाचकांसाठी खाली
 देत आहोत.

चित्र १. नकाशात दिसणारे शिवस्मारकाचे स्थान (उपग्रह )   




चित्र २.स्यान जोसे शहरातील शिवरायांचा चित्ताकर्षक अश्वारूढ पुतळा.




चित्र ३.चबुतऱ्यावरील  शिवरायांविषयी  माहिती देणारा फलक.

चित्र ४. शिवरायांचे शिल्प तत्कालीन  पुणे महापौरांकडून स्वीकारताना स्यान जोसे शहराचे  तात्कालिक महापौर रोन गोंझाले.
चित्र ५. शिव जयंतीला पोवाडा  गाणारे महाराष्ट्रीय शाहीर .


(विशेष सूचना-शिवरायांचे हे स्मारक अमेरिकेत स्थापन केल्या जाऊ नये म्हणून पुणेरी बामनांनी केलेली हरामखोरी वाचा पुढील लेखात  ""''अमेरिकेत शिवराय...भाग २ '')

Friday 6 July 2012

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे {एम.ए.,एम.फिल.,पी.एच.डी.(इतिहास)बी.ड्रामा}


प्रा.डॉ.दिनेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्या एका दुर्लक्षित पैलू संबंधात या ग्रंथात माहितीपूर्ण विवेचन करून इतिहास लेखनात महत्वपूर्ण भर घातलेली आहे.

 ज्या कालखंडात  स्त्रीची किंमत उपभोग्य वस्तू म्हणून मानली जात असे त्या कालखंडातील एका राजाची स्त्री विषयक दृष्टिकोन स्पष्ट  करून सांगणे हे या पुस्तकाचे प्रमुख बलस्थान आहे.

शिवाजी महाराज हे नीतीमत्तेचे समर्थक होते उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी नीतीमत्ता आवश्यक ठरते. शिवाजी महाराजांची नीतीमत्ता ही किती उच्च दर्जाची होती हे समजून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मुळापासून वाचावे लागेल.

मध्ययुगीन काळात स्त्रियांचा गुलाम म्हणून सर्रास व्यापार चालत असे.विशेषत: युध्द अथवा लुटीत मिळालेल्या स्त्रियांवर ही गुलामी लादली जाई.शिवाजीराजांचा डचांबरोबर जेव्हा तह झाला तेव्हा त्या तहात शिवरायांनी गुलामगिरीच्या प्रथेला आळा घातला,त्यांनी त्या तहातील एका कलमात स्पष्ट म्हटले -"मुसलमानांच्या कारकीर्दीत तुम्हाला स्त्री पुरुष गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती.परंतु माझ्या राज्यात अशा गुलाम प्रथेला परवानगी मिळणार नाही."

शिवाजीराजे हे मध्ययुगातील पहिले सत्ताधीश आहेत की ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घातला."महापुरुष आपल्या काळाला आणि समाजाला घडवितो आणि आकार देतो असे नित्सेने म्हटले आहे."  ते शिवरायांच्या बाबतीत बऱ्याच अंशी लागू पडते.  पारंपारिक व्यवस्थेने छळलेल्या आणि तळागाळाच्या घटकाला न्याय देण्याचे क्रांतीकार्य शिवरायांनी आपल्या काळानुरूप केले, म्हणूनच ३५० वर्षानंतरही मराठी माणसाला 'शी-वा-जी ' या तीन शब्दांचे प्रचंड आकर्षण आहे. 

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण हे पंचफुला प्रकाशनाचे १२ वे पुस्तक प्रा.डॉ.दिनेश मोरे यांच्या अभ्यासपूर्ण व्यासंगातून आकारास आले आहे. शिवरायांचा स्त्रीवादी दृष्टिकोन आजही साऱ्या जगाला अचंबित करून सोडतो पण डॉ.दिनेश मोरे यांनी मात्र या विषयावर एक स्वतंत्र पुस्तक लिहून शिवप्रेमी,इतिहास अभ्यासक आणि वाचकांची चांगली सोयच करून दिली आहे. प्रस्तुत पुस्तक विक्रीसाठी खुले झाले आहे. हे पुस्तक प्रत्येक शिव् प्रेमिकडे असायलाच हवे.

प्रकाशन: पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.
मूल्य:६० रु./- (टपाल  खर्च ३० रु /- वेगळा. अशी एकत्रित रक्कम आमच्या खालील पत्त्यावर पाठवा )
पृष्ठे : ७२
संपर्क: ९४ २२ ५२ ८२ ९०
पत्ता: पंचफुला प्रकाशन, प्लॉट नं.११४७, साई नगर, एन-६, सिडको, औरंगाबाद-४३१ ००३.

Monday 2 July 2012

पर्यावरण खात्यानेच उभारावे शिवरायांचे स्मारक


      छत्रपती शिवरायांचे एक भव्य,प्रेरणादायी असे स्मारक मुंबईत उभे राहावे अशी जगभरातील शिवप्रेमींची प्रामाणिक भावना गेल्या कित्येक वर्षांपासून होती आणि आहे.महाराष्ट्र शासनानेही शिवप्रेमींच्या या भावनेची दाखल घेत शिवरायांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभे करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु शिवराय म्हटले की वाद असे समीकरणच गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जाणीवपूर्वक तयार केल्या गेल्यामुळे अरबी समुद्रातील हे शिवस्मारक वितंडवाद न घालता पूर्ण होईल अशी चिन्हे सध्या तरी महाराष्ट्रात दिसत नाहीत. अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षाही उंच असणाऱ्या या स्मारकामुळे मानुवाद्यांना पोटशूळ उठला नसता तरच नवल. ज्याप्रमाणे आपल्या समस्त जातभाइंची सुप्त इच्छा पुर्ण करण्यासाठी ‘कृष्णा भास्कर कुलकर्णीने’ शिवरायांच्या मस्तकावर वार केला होता त्याचप्रमाणे ‘कुमार केतकर’ नावाच्या याच  कुलकर्णीच्या अनौरस औलादिने या शिवस्मारकाला सर्वप्रथम विरोध केला. परंतु कुमार केतकरच्या  या शिव्द्वेशाच्या काविळीवर संभाजी ब्रीगेड आणि शिवसंग्राम ने जालीम पराशुरामी उतारा शोधून काढल्यामुळे केतकर थंड पडला.
      
     पण केतकरी कोल्हेकुई थांबली म्हणून शिवस्मारकाचे काम गतिमान झाले असे मात्र घडले नाही. कारण त्यानंतर शासनाला आपल्याकडे शिवरायांचे स्मारक बांधण्यासाठी पैसाच शिल्लक नाही असा चित्पावनी दृष्टांत झाला आणि शिवस्मारक हे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर उभे करण्याचे शासनाणे जाहीर केले. यातून शासनाने स्वताच्या आर्थिक दिवाळखोरीबरोबरच आपली बौद्धिक दिवाळखोरीही जाहीर केली. तात्काळ संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्र भरातून माणसागणिक एक रुपया शासनाला पाठविल्यानंतर शासनाला आपल्याकडे मुबलक गंगाजळी असल्याचा साक्षात्कार झाला. संभाजी ब्रिगेडच्या या आर्थिक मदतीमुळे महाराष्ट्र शासनाची आर्थिक दिवाळखोरी जरी मिटली तरी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी मात्र कायम राहिली. कारण या नंतर शासनाणे अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचा अध्यक्ष म्हणून अट्टल शिवद्रोही बाबा पुरंदरेचे नाव घोषित केले. पण संभाजी ब्रिगेड सहीत महाराष्ट्रतील समस्त परिवर्तनवादी संघटनांनी शासनाचा जाहीर निषेध नोंदवत शासनाचागोल भोकाला चौकोनी पाचर’ ठोकण्याचा प्रयत्न हाणून पाडला. महाराष्ट्रतील समस्त शिवप्रेमींचा हा प्रक्षोभ एवढा जबरदस्त होता की तात्कालीन ‘आदर्श मुख्यमंत्री माननीय नामदार श्री अशोकराव चव्हाण’ यांना स्मारक समिती अध्यक्ष पदी बाबा पुरंदरे नसून मीच आहे असे लगोलग जाहीर करणे भाग पडले. एवढ्या ब्राह्मणी दिव्यातून पार पडल्यानंतर तरी शिवस्मारकाचे काम गतिमान होईल अशी भाबडी आशा शिवप्रेमींना होती. परंतु आमचे सरकार हे पेशवाईचा वसा घेतलेले असल्यामुळे ते शिवरायांचे स्मारक कसे काय बरे बांधेल? केतकरी कोल्हेकुई, शासनाची आर्थिक दिवाळखोरी, पुरांदरेच्या  माध्यमातून दिसलेली बौद्धिक दिवाळखोरी संपते न संपते तोच पर्यावरण खात्याच्या माध्यमातून एक नवीनच हरामखोरी परवा परवा वाचायला मिळाली. शिवरायांच्या या स्मारकामुळे देशातील पर्यावरणाला म्हणे प्रचंड हानी पोचणार आहे असा घाशरामी साक्षात्कार पर्यावरण खात्याला झाला आहे.
      
     शिवरायांच्या स्माराकाला विरोध करण्यासाठी शासनाचे पर्यावरण खाते असा काही आव आणत आहे की जणू काही या स्मारकामुळे ओझोनचा थर फाटायला लागला आहे, ग्लोबल वार्मिंग मध्ये कमालीची वाढ झाली आहे, हिमनद्या भराभर वितळू लागल्या आहेत, समुद्रातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे आणि यामुळे केव्हाही त्सुनामी येऊन जगबुडी यायचेच तेवढे शिल्लक राहिले आहे. मागे कुण्यातरी उपटसुम्भाने नव्हते का सांगितले की २०१२ मध्ये सकल पृथ्वी नष्ट होणार म्हणून. कदाचित आमच्या अक्कल शून्य पर्यावरण खात्याने या जगबुडीला शिवस्मारकाला कारणीभूत धरलेले दिसत आहे आणि म्हणूनच ही जगबुडी रोकण्यासाठी शिवस्मारक तेवढे होऊ न देणे एवढा एकच पर्याय शासनाने शोधून काढलेला दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे अर्धी मुंबई ही समुद्रात भर टाकून वसविल्या गेली तेव्हा हे पर्यावरण खाते समुद्रात जलक्रीडा करत होते काय? नाशिकच्या कुंभमेळ्यात साधू संतांनी (?) मल मुत्राचे तर्पण करून अख्खी गोदावरी दुषित करून टाकली तेव्हा हे खाते गांजा फुकत होते काय? एवढेच कशाला गणेश विसर्जनाला गणेश मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण हे या खात्याला दिसत नाही काय? अरे प्रशासन चालविता की शेण खाता? की भावना फक्त गणेश भक्तांनाच असतात? आणि शिवभक्तांना काय काळीज नाही काय? कुणीही उठतो आणि शिवप्रेमींच्या भावनांशी खेळतो.
    
     खरे तर शिवरायांचा इतिहास हा एवढा उज्वल आणि प्रेरणादायी आहे की शासनाने अरबी समुद्रातील शिवस्मारक तर उभारावेच परंतु महाराजांचा पर्यावरण प्रेमाचा इतिहास वाचून पर्यावरण खात्यानेही महाराजांचे स्वतंत्र स्मारक उभारावे. एकीकडे पर्यावरण खात्याने शिवस्मारकाला विरोध केलेला असताना त्याच खात्याने शिवरायांचे स्मारक उभारावे ही मागणी काही जणांना चक्रम आणि अडेलतट्टू वाटण्याचा संभव आहे. परंतु बांधवांनो शिवरायांचे पर्यावरण प्रेम आणि जागरूकता पाहूनच आम्ही तशी मागणी शासनाकडे करत आहोत. शिवस्मारकामुळे एकीकडे पर्यावरण ऱ्हासाची बोंब ठोकणारे शासन मात्र दुसरीकडे रस्ता रूंदीकरण करताना दुतर्फा असणाऱ्या विशालकाय वृक्षांना मुळासकट उचकटून फेकते आणि पुन्हा वरून ग्लोबल वार्मिंग ची बोंब ठोकते यालाच चोराच्या उलट्या आणि सुलट्या बोंबा म्हणतात. खरे तर पर्यावरण रक्षण कसे करावे हे शिकावे तर ते शिवरायांकडून. भारताला जगात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे हे सर्वांना माहित आहे. भारताला खरा धोका हा समुद्र मार्गेच आहे हे शिवरायांनी त्याकाळी ओळखले होते. पण शिवरायांची ही चेतावणी लक्षात यायला आम्हाला कसाबची वाट पहावी लागली हे शिवरायांचे दुर्दैव. मुंबईवर हल्ला करण्यापुर्वी कसाब समुद्रमार्गे येऊन होटेल ताजमध्ये काजू बदाम खात हल्ल्याची योजना आखत बसला आणि आमच्या शासनाला याचा थांगपत्ताही लागला नाही. परंतु शिवरायांचे प्रशासन हे काही आजच्या सारखे नव्हते की कुणीही या आणि टपली मारून जा. तर समुद्र मार्गाचा हा धोका कमी करायचा असेल तर समुद्रावर आपली सत्ता असली पाहिजे आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे साधे सोपे तर्कशास्त्र शिवरायांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी भारतात पहिल्यांदा आरमार दलाची स्थापना केली. आता आरमारासाठी लाकडे लागायची. शिवरायांच्या काळात जंगले दाट होती अन लागतात लाकडेही विपुल प्रमाणात उपलब्ध होती. परंतु रस्ता रुंद  करायचा ना? मग तोडा झाडे असा महाराष्ट्र शासन टाईप सपाटा महाराजांनी लावला नाही. उलट त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिले-
        “स्वराज्यातील आंबे फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची. परंतु त्यास हात लाउ       देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरानसारखी ही बहुतकाळ जतन करून वाढविली. त्यांचे दूखास पारावार काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले, तरी त्याचे धन्यास राजी करून घेउन द्रव्य देउन त्याचे संतोसे तोडून द्यावे.”
         याला म्हणतात पर्यावरण रक्षण, याला म्हणतात वृक्षांची काळजी. खरे तर आरमार उभारणे हे सुद्धा प्रशासनाचाच एक भाग होता. जनतेच्याच हिताचा होता, नव्हे जनतेसाठीच होता. पण शिवरायांनी त्यांच्या रयतेने पोटच्या लेकराप्रमाणे वाढविलेली झाडे सरसकट कापून नेली नाहीत. तर एखादे जुने झाड वाळून गेले असल्यास त्याचा योग्य मोबदला देऊन त्या शेतकऱ्याला राजी करून मगच तोडले. अरे कुठे वाळलेल्या झाडाचाही रयतेला योग्य मोबदला देनारे शिवराय आणि कुठे ‘विशेष आर्थिक क्षेत्राच्या’ नावाखाली शेतकर्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालणारे आजचे राजकारणी? दरवर्षी वर्तमान पत्रात छापुन येण्यापुरते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण होत नाही. तर त्यासाठी पोटच्या लेक्राप्रमाने झाडांचे संगोपन करण्याची दृष्टी कमवावी लागते. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि ग्लोबल वर्मिन्ग्लाही आळा बसेल. अरे या पुढाऱ्यांचे वृक्षारोपण तरी कसे? तर दरवर्षी खड्डा तोच फक्त रोपटी आणि पुढारी मात्र नवीन.
         ते काहीही असो. शिवरायांच्या या गुणांमुळेच त्याकाळची रयत त्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार झाली आणि यामुळेच आजही लाखो शिवप्रेमी महाराजांसाठी प्राण द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. शासनाने अरबी समुद्रातील नियोजित स्मारक तर बंधावेच पण झाडांची पोटच्या लेक्रांप्रमाणे काळजी घेनारा राजा म्हणून जागोजागी शिवरायांचे स्मारक बांधावे. यातूनच मग प्रेरणा घेऊन सामान्य जनताही पर्यावरण प्रेमी बनेल. पण असे न झाल्यास निसर्गातील पर्यावरण बिघडेल तेव्हा बिघडो पण लाखो शिवप्रेमींच्या असंतोशामुळे महाराष्ट्रतील सामाजिक पर्यावरण मात्र प्रदुषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सामाजिक प्रदूषणाला आमचे पर्यावरण खातेच जबाबदार असेल हे काही सांगण्याची गरज आहे का?