Wednesday 21 November 2012

......तर ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही

जो जन्माला येतो तो मरतो हा निसर्ग नियमच आहे . परंतु बर्याच जणांना काही व्यक्तींपुरता तरी हा नियम अपवाद ठरावा  असे मनोमन वाटत  असते. बाळ  ठाकरेंच्या संदर्भात सुद्धा कित्येकांना असेच वाटले. बाळासाहेब आपल्याला सोडून गेले ही  खबरच नव्हे तर त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे असे सांगणार्या वृत्त वाहिनीची ओ बी व्ह्यान  फोडण्यापर्यंत  बाल ठाकरेंच्या चाहत्यांची मजल गेली. मरण हे देवालाही चुकत नाही असे कितीही म्हटले तरी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यासाठी देवापेक्षाही  मोठी वाटायला लागते तेव्हा मात्र त्या व्यक्तीने निसर्गाचे सारे नियम झुगारून केवळ आपल्यासाठी जगतच राहावे असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच जेव्हा ठाकरेंची प्रकृती चिंताजनक म्हणण्या एवढी गंभीर झाली तेव्हा प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकूनही प्रत्येकाने बाळासाहेब बरे व्हावेत म्हणून देव पाण्यात घालून ठेवले. पण म्हणतात ना  की  "वास्तव हे विस्तव पेक्षा जास्त तापदायक असते " या नियमाप्रमाणे बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. या वास्तवाची जाणीव ही  निश्चितच विस्तवाच्या चटक्यांपेक्षा  पेक्षाही  जास्त  चटका  लावणारी  आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जनतेचा महासागर लोटला.

वैचारिक मतभेद हे जिवंत माणसांचे लक्षण आहे. म्हणूनच आपल्या कुटुंबात कितीही मतभेद झाले तरी आपण आपला संसार नेटाने शेवटास नेतो . बाळासाहेब हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव म्हणून त्यांना जन्मताच सत्यशोधक विचारांचा वारसा लाभला आणि याच वारशाच्या जोरावर बाळासाहेबांनी 'शिवसेना' नावाची प्रथम सामाजिक आणि नंतर राजकीय संघटना उभा केली. असे असले तरीही बाळासाहेबांनी आज जे लाखो चाहते निर्माण केले त्याचे श्रेय मात्र बाळासाहेबांनाच द्यावे लागेल.असो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जो महापूर जमला या मुळे  विरोधकांना सुधा बाळासाहेबांच्या नावाची ताकत लक्षात आली. परंतु त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीने बेभान झालेल्या दीड शहाण्या ब्राहमणी  मेडिया ने  जे अवास्तव कवित्व सुरु केले आहे ते पाहून दस्तूर खुद्द बाळ  ठाकरेंनी सुधा या दीड शहान्यांना आपल्या 'मार्मिक' शब्दात फटकारले असते आणि या नालायक लोकांना सुधा निमुटपणे बाळासाहेबांच्या फटकार्यांचा "सामना" करावा लागला असता .काही वाहिन्यांनी दिवाळीचा दिपोस्ताव संपल्या संपल्या बाळ  ठाकरेंच्या अंत्ययात्रेबद्दल आपल्या नसलेल्या अकलेचे दिवे पाजळत या अंत्ययात्रेची तुलना 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अंत्ययात्रेशी करायला सुरुवात केली. मुळात कोनत्याही  व्यक्तीची तुलना दुसर्या व्यक्तीशी करणे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात महामानवांची एक दुसर्याशी तुलना करणे तर अजिबात योग्य  नाही. या पेक्षाही अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या तुलनेद्वारे आपण नकळत (की जाणीवपूर्वक ?) बाबासाहेबांना कमी लेखत आहोत हे या ब्राह्मणांच्या लक्षात येत नसेल काय ? बर प्रदीप इंगोले म्हणतात तसे -"अंत्ययात्रेत सामील झालेल्या लोकांच्या केवळ संख्येवरून त्या व्यक्तीचे   मोठेपण ठरवले तर मग त्या व्यक्तीच्या विचार आणि कार्याचे काय? आणि जर संख्येवरूनच मोठेपना ठरवायचा असेल तर मग कार्ल मार्क्स ह्या महामानवाच्या अंत्ययात्रेला त्याला खांदा देणारे ४ जनच उपस्थित होते. मग कार्ल मार्क्सचे  मोठेपण काय हवेत मिळाले  का ? आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की  जिथे कार्ल मार्क्सचे विचार पोहोचले नाहीत." आणखी उदाहरणच द्यावयाचे झाल्यास अन्ना  भाऊ  साठेंचेही देता येईल. त्यांच्या अंत्ययात्रेला तर केवळ १७ जनच हजर होते. मग अन्नाभाऊंचे  मोठेपण नाकारायचे काय? हेही जाऊद्या खुद्द शिवरायांच्या अंत्ययात्रेलाही  मोजकीच मानसे हजर होती. मग उद्या बाल ठाकरेंना शिवरायांपेक्षा  मोठे ठरवायचे काय? बाळासाहेबांना जरूर मोठे करा पण त्यासाठी आमच्या महामानवांचा अवमान कशासाठी ?

बाळासाहेबांच्या पित्याने शिवरायांचे नाव घेऊन समाजप्रबोधन केले तर बाळ  ठाकरेंनी शिवरायांचे नाव घेऊन सोयीचे राजकारण केले. गर्दीचा महापूर पाहून बेभान झालेले काही उपटसुंभ तर बाळ ठाकरेंची तुलना छ. शिवाजी महाराजांशी करत आहेत.याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास बाळासाहेबांना स्वरांजली अर्पण करताना  फेणाणी या गायिकेने रामदासाने लाळघोटेपणे शिवरायान्बद्दल जो "निश्चयाचा महामेरू..." हा श्लोक लिहिला तोच श्लोक बाळ ठाकरे बद्दल वापरला.एका न्यूज च्यानेल ने तर बाळ ठाकरेंचा आदरार्थी उल्लेख करत याच वाक्याच्या खाली "शिवाजीच्या पुतळ्या शेजारीच स्मारक (बाळासाहेबांचे ) व्हावे " असे वाक्य टाकून  शिवरायांना अरे- तुरे करून  शिवरायांची बदनामी केली. पण बाळासाहेबांच्या जाण्याने सक्ख्खा  बाप गमावल्याप्रमाणे आकंठ दुखत बुडालेल्या शिवसैनिकांना याच्याशी काहीही देणेघेणे दिसत नाहीये. स्वत बाळ ठाकरेही शिवरायांचे  विरोधकच होते.आता काही  जणांना ही बाळासाहेबंवरील अनाहूत टीका वाटेल परंतु वास्तव काय सांगते? काही वर्ष झाले शिवसेनेच्या ब्याणर वरून शिवराय हद्दपार झाले आहेत आणि तेही बाल ठाकरे जिवंत असताना हे घडले आहे. मग शिवप्रेमी बाळासाहेबांनी आपल्या पदाधिकार्यांना या गैर प्रकार बद्दल  कानपिचक्या का बरे दिल्या नाहीत? शिवसेनेत तर बाळासाहेबांच्या आदेशा शिवाय कोणतीही गोष्ट होत नसते. मग याचा अर्थ शिवरायांना ब्याणर वरून हटविण्याचे आदेशाही बाळ  ठाकरेंनीच दिले असल्याचे सिद्ध होते. बर जेव्हा शिवरायांच्या पितृत्व विषयी घाणेरडा विनोद बनवून जीजाऊच्या मातृत्वालाही कलंकीत केले गेले तेव्हा बाळ  ठाकरेंनी  या प्रकाराचा साधा निषेधही केला नाही. उलट उपलब्ध पुराव्यानुसार बाळासाहेबांनी या गैर प्रकाराचे समर्थनच केले होते.(अधिक माहितीसाठी वाचा डॉ बालाजी जाधव लिखित जेम्स लेन प्रकरणातील ब्रह्मराक्षस हा ग्रंथ.) 

परवा परवा राज्यातील सत्ता रूढ पक्षाने शिवरायांचे  अरबी  समुद्रात  भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले तेव्हा त्यालाही बाळ ठाकरेंनी विरोधच केला. असे असताना बाळ  ठाकरेंची तुलना शिवरायांशी करण्याची खाज का? ज्या भावनेतून बाळ  ठाकरेंनी शिवरायांच्या अरबी समुद्रात होणार्या स्मारकाला विरोध केला त्याच भावनेचा आदर करत महागाईने त्रस्त असणार्या राज्यातील जनतेने आणि शिवसैनिकांनी सुधा शिवाजी पार्क वरील बाळ  ठाकरेंच्या पुतळ्याला विरोध केला पाहिजे आणि तोही प्राणपणाने.

जे बाळासाहेब स्वताचे आत्मचरित्र कधीच लिहिणार नाही असे छाती ठोकपने जाहीर सभातून सांगायचे त्याच बाळासाहेबांचे पुतळे उभे करणे बाळासाहेबांना सुधा खचितच आवडले नसते. असे असतानाही बाळासाहेबांच्या मुळ  विचारांना छेद देऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? वरून काही लोक खवचटपने इंदू मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी करत आहेत. ज्या बाळासाहेबांनी इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला  द्यायला मरेपर्यंत विरोध केला त्यांचेच स्मारक इंदू मिलच्या जागेत करा असे म्हणणे समस्त भिमसैनिकांच्या आणि बाबासाहेबप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. उलट बाळ ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क आणि इंदू मिलपेक्षाही योग्य जागा "कोहिनूर मिल" आहे. जे  जोशी वारावर शिकत होते त्यांना  चक्क मुख्यमंत्री पदापर्यंत बाळ ठाकरेंनी पोचवले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जोशी काकांनीच बाळासाहेबांच्या जागेचा वाद मिटवत कोहिनूर मिल येथे साहेबांचे भव्य स्मारक बांधून घ्यावे अशी राज्यातील समस्त शिव सैनिकांची इच्छा आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसैनिकांच्या या भावनेचा मान राखावा. 

सरतेशेवटी थोडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल बोलूया. बाल ठाकरेंच्या मृत्यू नंतर मुंबईतच नव्हे तर राज्यभर बंद  पाळला गेला. हा बंद काही ठिकाणी  उत्स्फूर्त पने पाळला गेला तर काही ठिकाणी शिवसैनिकांनीआपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन करत  बंद पाळण्यास भाग पाडले.या बंदमुळे  विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे 'शाहीन धाडा ' या युवतीने फेसबुकवर बंदच्या निषेधार्थ काही मजकूर लिहिला आणि रेणू श्रीनिवासन हिने त्याला लायिक केले. यामुळे संतप्त होऊन शिवसैनिकांनी त्या तरुणीच्या काकांच, श्रीयुत अब्दुल धाडा यांचे रुग्णालय फोडून टाकले.माथेफिरू शिवसैनिकांच्या भावना समजून घेता येऊ  शकतात परंतु याप्रकारामुळे पोलिसांनी त्या दोन तरुणींना तत्काळ अटक केली आणि  चोर सोडून संन्यासाला फाशी " या म्हणीचा प्रत्यय  आणून दिला. खरे तर अशा  प्रकारची जलद कारवाई दरोडा, खून, बलात्कार या सारख्या गंभीर गुन्ह्यात होत असते. काहीवेळा आरोपी बेपत्ता होण्याची शक्यता गृहीत धरून किंवा वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांनाही अश्या प्रकारे अटक केल्या जाऊ शकते. परंतु  सदर तरुणींनी असा किंवा अशाप्रकारचा   कोणताही गुन्हा केलेला नसताना त्यांना अटक झालीच कशी? कुठे गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने  गळे  काढणारे स्वातंत्र्यवीर? की  या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? या अटकेमुळे पोलिसांनी घटनेचे कलम १९ चे उल्लंघन केले.

बाळ ठाकरेंच्या मृत्यू मुळे  पाळण्यात आलेल्या बंदचा निषेध करणाऱ्या तरुण्णींना जर एवढ्या लवकर अटक होत असेल तर मग जीजाऊच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? फेसबुक चेच उदाहरण द्यायचे झाल्यास शेकडो ब्राह्मण खोट्या  नावाने राजरोसपणे बहुजन महामानवांची निंदा नालस्ती करत असतात त्यांचे काय करायचे? की  शाहीन धाडा ही  मुस्लीम होती म्हणून आधी  शिवसेनेच्या गुंडांनी आणि नंतर पोलिसांनी तिच्यावर ही  कारवाई केली? अरे बाळ  ठाकरे जेव्हा शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे दोन डॉक्टर हे मुस्लीम समाजातील होते.  मग हा मुस्लीम द्वेष कशासाठी?  हे सगळे जर असेच चालत राहिले आणि बाळ ठाकरेंच्या विचारांविरोधात जाऊन त्यांचे देशात एकही स्मारक उभारले तर नक्कीच बाळ  ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.



(टीप: बाल ठाकरेंचे स्मारक होईल तेव्हा होओ. आता सर्व मराठ्यांनी अरबी समुद्रातील  शिव स्मारकाच्या संदर्भात  आंदोलन केले पाहिजे. )

Sunday 19 August 2012

राज्याबाहेरील बाहेरील मराठ्यांचे प्रबोधन करणारा- शिवाजी समाज.




माझे मराठ्यांनो षंढ झालात काय हे पुस्तक एव्हाना मध्यप्रदेश,गुजरात,जम्मू काश्मीर, पंजाब, कर्नाटका, गोवा, छत्तीसगड आदि राज्यात जाऊन पोचले आहे. प्रतिक्रियेच्या निमित्ताने का होईना राज्याबाहेरील मराठा बांधव माझ्याशी संपर्क साधतात आणि आपले राज्य सोडूनही मराठे बाहेरच्या राज्यात स्थाईक झाले आहेत याची मला जाणीव होते. कर्नाटक राज्यातून तर या पुस्तकाचे कन्नड भाषेत भाषांतर करावे असे विनंतीवजा पत्रही प्राप्त झाले आहे. असाच प्रकार गेल्या जून महिन्यात घडला. औरंगाबाद क्रांती चौक पोस्ट खात्यातून मला फोन आला की डॉ.बालाजी जाधव आपल्यासाठी इंदौरहून एक समाचार पत्र आले आहे परंतु त्यावर आपला पूर्ण पत्ता नाही. तर फक्त नाव आणि नंबर आहे. मी माझा पत्ता सांगितला आणि ते समाचार पत्र माझ्या हातात पडले. समाचार पत्राचे नावच "शिवाजी समाज " असे होते. बाहेरच्या राज्यात महाराजांच्या नावाने असे कोणते समाचार पत्र असेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणून ते पत्र वाचून मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. महाराष्ट्रतील मराठ्यांना हे माहित नसेल की आपले राज्य सोडून देशभरात सुमारे २ कोटी मराठे आहेत. परंतु आपण आपल्याच मातीत मराठ्यांशी संबंध ठेवत नाही तर मग अशा बाहेरच्या लोकांशी केव्हा ठेवणार?

या प्रसंगापूर्वी मला पानिपत येथे मराठे स्थाईक झाले आहेत याची माहिती होती. त्यांना 'रोड मराठा' असे म्हटले जाते. एवढेच नाही तर औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर गावी माझ्या व्याख्यानाला सुद्धा काही पानिपत येथील मराठे आले होते. मी कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते केले. अर्थात ती मंडळी त्यांच्या कामानिमित्त्य या गावात आली होती. परंतु एवढ्या लांबवरच्या मराठ्यांना भेटल्याचा आनंद काही औरच होता. दरवर्षी १२ जानेवारीला सिंदखेडराजाला आणि ६ जूनला रायगडावर  ही मंडळी प्रचंड संखेने जमते. तर बांधवांनो सांगण्याचे तात्पर्य असे की "मराठा सेवा संघाच्या माध्यमातून " आपण मराठा तितुका मेळवावा, गुण दोषासह स्वीकारावा हे ब्रीद स्वीकारले आहे. मग आता आपल्या समोरची पुढच पायरी म्हणजे या राज्याबाहेर विखुरलेल्या  मराठ्यांना आपल्याशी  जोडणे. त्यांच्या सोबत बेटी व्यवहार प्रस्थापित करणे, कुण्याही मराठी नेत्याचे न ऐकता त्यांची भाषा शिकून घेणे. साधी गोष्ट आहे आजकाल ब्राह्मण समाज सुद्धा सर्व भाषिक संमेलने घेऊ लागला आहे मग आपणही आपल्यातील हे भाषिक आणि प्रांतिक भेद मिटविण्यास सज्ज राहिले पाहिजे. त्या शिवाय मराठा समाज हा देश पातळीवर एक होणार नाही आणि देशाच्या  मुख्य प्रवाहात येणार नाही. आजकाल बरेच लोक देश पातळीवर एकत्र येत आहेत. उदा. जैन समाज, मुस्लीम समाज, बौद्ध समाज, शीख समाज वगैरे वगैरे. मग इतिहासाचा उज्वल वसा आणि वारसा लाभलेल्या आणि अटकेपार झेंडे फडकवलेल्या मराठ्यांनीच यात मागे का बरे राहावे?

मध्य प्रदेशातील मराठा बांधवांना संघटीत आणि प्रबोधित करण्याचे कार्य शिवश्री डॉ.वसंतराव सोनोने आणि शिवमती डॉ.चंद्रकला सोनोने हे मराठा द्वय करत आहेत. हे पती-पत्नी सातत्याने युगानायक पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण दादा गायकवाड, छत्रपती संभाजी राजे, अनंत दारवटकर, डॉ.वसंत मोरे आदींच्या संपर्कात असतात. या दोहोंनी मिळून समाजाला जागृत करण्यासाठी "शिवाजी समाज " नावाचे वर्तमान पत्र सुरु केले आहे. हे पत्र ते इंदौरहून चालवतात. या समाचार पत्राचे हे २१ वे वर्ष असून आजपर्यंत याचे ४३ अंक निघाले आहेत. साधारणतः १२ पानाचे हे समाचार पत्र आहे. ज्याचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ  दोन्हीही रंगीत असून अत्यंत आकर्षक असतात. तसे या समाचार पत्राची किंमत १० रुपये असून वार्षिक वर्गणी फक्त १०० रुपये आहे. ज्यांना कुणाला या अंकाचे आजीवन सभासद व्हायचे असेल त्यांनी १००० रुपये शिवाजी समाजच्या करंट  खात्यात जमा करावेत. बँकेचा पत्ता आहे- "भारतीय स्टेट बँक, नेमी नगर शाखा, इंदौर. कोड नं. ३०३४४, खाते क्र. ६३०४३४५२८४६ " असा आहे. या उपर कुणाला हे समाज प्रबोधनाचे कार्य असेच निरंतर चालू राहावे असे वाटत असेल तर त्यांनी या कार्याला आपापल्या हस्ते मदत करावी.

आपल्या या मुखपत्राच्या माध्यमातून संपादकद्वयांनी काही मुद्दे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रशासनापुढे ठेवले आहेत. आपण अपेक्षा करूया की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील. परंतु महाराष्ट्रात मराठे हे सत्ताधारी आणि संखेने प्रचंड असल्यामुळे त्यांनी आपल्या कडूनही अपेक्षा व्यक्त केलीय की "महाराष्ट्र के मराठा संघटनो व नेतृत्व वर्ग से यही निवेदन है की महाराष्ट्रा  के बाहर के मराठो के बारे मे विचार करणे का मुद्दा उनके अजेंडे मे हो. महाराष्ट्रा मे जब जब मराठी विरुद्ध  उत्तर भारतीय का सवाल उठता है तो हम लोगोन्के लिये जवाब देना मुश्कील हो जाता है. " या वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणाऱ्या मराठा बांधवांनी योग्य तो बोध घ्यावा आणि राज्याबाहेरील २ कोटी मराठ्यांचे अंतकरण समजून घ्यावे. बाकीच्या मराठ्यांनी पण या लोकांशी संबंध वाढवण्यासाठी विचार करावा. तरच खऱ्या अर्थाने  आपण जग जिंकण्याच्या लायकीचे बनुयात.

जय जिजाऊ !!!

डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
मो-९४ २२ ५२ ८२ ९० 

Sunday 12 August 2012

वाघ्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही, १० ऑगस्ट २०१२ च्या दैनिक दिव्य मराठीतील बातमी.




शिव पत्नीच्या समाधीवर बसविलेला वाघ्या हा काल्पनिक आहे हे आतां सर्वमान्य झाले आहे. परंतु १ ऑगस्ट २०१२ ला संभाजी ब्रिगेडच्या ७३ मावळ्यांनी जेव्हा हा अनैतिहासिक वाघ्या शिव पत्नीच्या समाधीवरून हटविला तेव्हा काही वाघ्याच्या अनौरस औलादींनी आपला बाप मेल्याच्या अविर्भावात गळे काढले होते. काहींनी तर उपोषणाचे  वापरून वापरून बोथट झालेले हत्यारही आजमावून पहिले होते. या सर्व घडामोडींमुळे सामान्य जनता मात्र संभ्रमात होती. कुणाचे खरे आणि कुणाचे खोटे हेच जनतेला समजत नव्हते. अशावेळी महत्वाची भूमिका बजावली ते काही वर्तमान पत्रांनी. त्यात दै.पुण्य नगरी , दै.देशोन्नती यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तशातच दै.दिव्य मराठीचे संपादक शिवश्री.धनंजय लांबे यांना मी विनंती केली की अशा संवेदनशील मुद्द्याच्या वेळी आणि सामान्य जनता संभ्रमात असताना आपण संभाजी ब्रिगेडची भूमिका लोकांपर्यंत पोचवा. आणि माझ्या विनंतीला मान देऊन, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवश्री.धनंजय लांबे सरांनी खालील बातमी दै.दिव्य मराठीच्या 'मराठी मुलुख '  या ३ न. च्या पानावर लावली. या मुले साधारणतः हे वर्तमान पत्र जिथे जिथे जाते तिथल्या वाचकांना वाघ्याचा फोलपणा लक्षात आला. आणि बरे झाले वाघ्या काढल्या गेला होता ते अशा प्रतिक्रिया जन सामान्यात उमटायला लागल्या.भविष्यात जेव्हा कायदेशीर रित्या वाघ्या काढल्या जाईल तेव्हा हा समाज संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी राहिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. संभाजी ब्रिगेडची भूमिका सर्व सामान्य जनते पर्यंत पोचवल्या बद्दल शिवश्री. धनंजय लांबे सर आणि दै.दिव्य मराठी  यांचे मनपूर्वक आभार.

Tuesday 7 August 2012

बाळ ठाकरे ला मारा, आम्ही वाघ्या काढतो.


राष्ट्रीय समाज पक्ष  या अकौंट धारकाशी ओनलाईन संवादाचा हाच तो भाग.
 परवा मी फेसबुकवर बसलो असताना "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट धारकाने माझ्याशी च्याटीग सुरु केली. सुरुवातीला त्याने मला "नाराज आहात काय ?"  असा खवचट प्रश्न विचारला. मी म्हटलं भाऊ नाराज नाही पण वाईट वाटले की आपलेच धनगर बांधव विनाकारण विरोधात गेलेत याचे. तो म्हणाला सुरुवात तुम्ही केली. मी म्हटलं आपल्या अपमानाची प्रतिक आपण झुगारून लावली पाहिजेत. त्याने पुन्हा वाघ्याला पुरावा आहे असे सांगितले. इथं पर्यंत ठीक होतं परंतु त्या "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट माझ्याशी जी काही चर्चा केली टी वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.तो म्हणाला की शिवरायांचा वाघ्या पेक्षा जास्त अपमान ब्राह्मणांनी केला. मी म्ह्टलं होय ठीक आहे. मग त्याने काय म्हणावे? तो म्हणाला की त्यातही जास्त बदनामी पुरंदरे आणि बाळ ठाकरे  ( "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट धारकाचे उद्गार ) याने केलेली आहे. तर मग तुम्ही लोकानी (म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या )  त्या बाळ ठाकरे आणि बाबा पुरांदरेला मारून टाका  मग धनगर समाज स्वताहून कुत्र्याला तिथून काढील. मला धक्काच बसला. की धनगर समाज बांधव नेमके कशाच्या विरोधात आहेत? कुत्र्याच्या , बाळ ठाकरे-पुरांदरेच्या की केवळ मराठ्यांच्या ? एकीकडे वाघ्या काढला आमची अस्मिता दुखावली म्हणून त्यांचे राष्ट्रीय  नेते सम्भाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता बाळ ठाकरे - पुरांदरेच्या हत्येची गोष्ट करतो. यातले नेमके काय सत्य धरावे ? तुम्ही त्यांना मारा आम्ही वाघ्याला काढतो असे म्हणणे म्हणजे या लोकांना माहित आहे की त्या वाघ्या कुत्र्याला कसलाच ऐतिहासिक पुरावा नाही. नव्हे हा वाघ्या धनगरांची अस्मिता पण नाही. (अन्यथा संभाजी ब्रिगेड विरोधात मोर्चे काढणाऱ्या पक्षाचे नाव  धारण करणाऱ्याने आम्ही स्वतहून वाघ्या काढू असे म्हटलेच नसते.) याचाच अर्थ हा विरोध फक्त मराठा द्वेषातून होतो आहे की काय?


पुढे मी त्याला समजावले की बाबारे लोकशाहीमध्ये एखदयाला जिवंत मारून टाकणे असले प्रकार शोभून दिसत नाहीत. भारतात बाबासाहेबांची राज्य घटना लागू आहे मनू स्मृती नाही. तो म्हणाला मग तुम्ही लोकांनी वाघ्या का फोडला ? त्याला समजावले की वाघ्या दगडी आहे आणि त्यामुळे शिवरायांची बदनामी होते. मग पुन्हा तो म्हणाला की पुरांदरेने केलेली बदनामी कमी आहे काय? अगोदर त्याचे काय ते बघा नंतर वाघ्याचे बघू. नंतर शिवरायांचा "जय शिवाजी " असा एकेरी उच्चार करून त्याने संवादाला पूर्ण विराम दिला. म्हणजे या लोकांना असे म्हणायचे आहे की ब्राह्मण समाजाने जर महाराजांची बदनामी केली असेल तर मग त्यांच्या कत्तली करा. मगच वाघ्या विषयी बोला? कसली भाषा आहे ही. हरी नरके- संजय  सोनवणी या सारखे दिग्गज समतावादी यांच्या पाठीशी असताना यांचे हे असले विचार ? नरके सिरांनी तर संभाजी ब्रिगेड वाल्यांचा आदर्श हिटलर आहे म्हणून त्यांना टार्गेट केले होते. बर संजय सोनवणी सुद्धा त्यांच्या ब्लॉगवरून सारखे तटस्थ राहा असे आवाहन करत असतात. तरीही त्यांचा लिखाणाचा प्रतिवाद करणाऱ्या कुण्या शिवालिक वर्माला एका अद्न्यात व्यक्तीने "समोर ये खांडोळी खांडोळी करतो " अशी धमकी दिल्याचे वर्माच्या प्रतिक्रियेत वाचले. आता याचा अर्थ काय लावायचा?

आता समजा मी रागाच्या भरात एखाद्याला म्हटले की -"मी तुला मारून टाकेल " आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्राने लगेच अरेरे तुम्ही हिंसक आहात म्हणून माझी साथ सोडली. तर त्याने या नंतर अहिंसेचा आणि माझ्यापेक्षा योग्य मार्ग अवलम्बायचा की "तूच तर म्हटलं होतास की त्याला मारून टाकेल, मग आत्ता का मारून टाकले नाही ?"असे म्हणायचे ? म्हणजे माझ्या हिंसक भाषेमुळे दुखावून गेलेला माझा मित्र जर तू त्याला का मारले नाही म्हणत असेल तर माझ्या पेक्षा जास्त गरज त्यालाच जाणवते.  म्हणून तो चिथावणीखोर भाषा वापरत आहे. मग तो अहिंसक कसा ? पुष्य मित्र शुंगाने हजारो बौद्धांच्या कत्तली केल्या मग बौद्ध बांधवांनी काय तलवारी घेऊन ब्राह्मणांच्या कत्तलीच केल्या काय?  तर नाही. ज्या ब्रह्माणी विचारसरणीमुळे बौद्ध कापले गेले ती विचारधाराच समूळ उध्वस्त करायचा प्रयत्न बौद्ध धम्माच्या माध्यमातून चालविला. हाच मुद्दा बाबासाहेबांच्या प्रसंगा वरूनही स्पष्ट होईल. ज्या मनुस्मृती मुळे दलितांना हीन जीवन जगावे लागले   ती मनुस्मृतीच बाबासाहेबांनी जाळून टाकली. नाकी तिचे आचरण करणाऱ्या ब्राह्मण समाजाला त्यांनी कत्तलीद्वारे संपवायचा प्रयत्न केला.

फुलेंनीही लिहून ठेवले आहे की भटांनी तुम्ही लिहिलेली धर्मग्रंथ तुम्हीच जाळून नसत करा, अन्यथा बहुजन समाज जागा झाला तर त्या ग्रंथाच्या होळीत तुम्ह्लाही जाळायला कमी करणार नाही. अर्थात ज्या लोकांनी आमच्यावर अपमानाची प्रतिक लादली ती प्रतिक त्यांच्या विकृत विचारांसाहित नस्त् करावी लागतात. वाघ्याचे शिल्पही शिवरायांना कुत्र्याचा दर्जा देणारे आहे. म्हणून तेही काढायला पाहिजे. याचा अर्थ ज्यांनी ती लादली त्यांच्या कत्तली करणे गरजेचे आहेच असे काही नाही.

म्हणून धनगर समाज बांधवांनी केवळ विरोधाला विरोध न करता या मागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. बामनांनी शिवरायांचा अपमान केला असूनही तुम्ही त्यांना कापत नाही मग तुम्हाला आम्ही वाघ्या काढू देणार नाही. असले आडमुठे धोरण स्वीकारू नये.  पण समजत नाही ब्रिगेडवर हिंसकतेचा आरोप करून दूर गेलेले नरके - सोनवणी ही मंडळी आत्ता का गप्प आहे?

Saturday 4 August 2012

'वाघ्या'ची आख्यायिका (४ ओगस्ट २०१२ च्या पुण्य नगरीतील अग्रलेख)

            रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील सन 1936 मध्ये उभारण्यात आलेल्या वाघ्या कुर्त्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर कार्यकत्र्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर सरकारने दबावाला बळी पडून त्या पुतळ्याची पुनस्र्थापना केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार असाच रागरंग दिसतो. कारण या अस्मितेशी संभाजी ब्रिगेडच काय कोणीच तडजोड स्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दंतकथेवर आधारित भाकड संदर्भ चिटकून अधून-मधून जो वादंग उद्भवतो तो टाळण्यासाठी या इतिहासाचे वस्तुनिष्ठ संशोधन झाले पाहिजे. युगपुरुषाच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जाते, ही बाब जेम्स लेन या माथेफिरू इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातून स्पष्ट झाली. त्यातूनच पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूटची संभाजी ब्रिगेडने मोडतोड केली. त्या वेळी त्यांना 'गुंड' म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्याविरोधात मोठा गजहब झाला, पण तद्नंतर जेव्हा वस्तुस्थिती पुढे आली तेव्हा संभाजी ब्रिगेडची भूमिकाच योग्य होती, ही बाब सर्वमान्य झाली. जेम्स लेन प्रकरणावर पडदा पडल्यानंतर संभाजी बिग्रेडने दादोजी कोंडदेव यांचा वाद ऐरणीवर घेतला. त्यांनी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा दावा केला. त्यासाठी इतिहास संशोधकांना ललकारून त्यांना ऐतिहासिक सबळ पुरावा देण्याचे आवाहन केले, पण त्यांना एका पाठोपाठ एक मुदत देऊनही ते सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हलवला. उलट - सुलट चर्चा झडली, पण कोणी अजूनही पुरावा देऊ शकले नाही. इतिहासाचा कोणताच संदर्भ नसेल तर केवळ श्रद्धेपोटी तो वस्तुनिष्ठ कसा मानता येईल. तेव्हा संभाजी ब्रिगेडचा विरोध अनाठायी म्हणता येणारच नाही. संभाजी ब्रिगेडला 'बोल' लावून मनुवाद्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण किती काळ सहज करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबाबतच इतिहासातील वाद-विवादाला सुरुवात होते. महाराष्ट्र सरकारने त्यावर इतिहास संशोधकांच्या माध्यमातून संशोधन करून तो जाहीर केला तरी अनेक पक्ष आणि मंडळी आपला हेका दरवर्षी चालवतातच ना, हे कशाचे द्योतक मानायचे. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुर्त्याचा पुतळा त्याच कपोकल्पित पठडीतील आहे. म्हणून तर संभाजी ब्रिगेड विरोध करत आहे. वाघ्या कुर्त्याचे समर्थक कोणताच ऐतिहासिक पुरावा अथवा संदर्भ का देऊ शकत नाहीत. महाराजांचा इमानी कुत्रा म्हणून मानल्या जाणार्‍या वाघ्या कुर्त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेत उडी मारली होती, अशी आख्यायिका रंगून सांगणे म्हणजे इतिहास नव्हे. राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' या नाटकात आलेल्या कुर्त्याच्या या उल्लेखावरून हा इतिहास समजणे संयुक्तिक नाही. गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते नाटककार होते. भाकडकथा नाटक-सिनेमात उठून दिसतात इतिहासात नाहीत. इतिहास, दंतकथा आणि श्रद्धा याची सरमिसळ सामाजिकदृष्टय़ा हानीकारक ठरते. तेव्हा इतिहास जशाच्या तसाच स्वीकारावा लागतो. तशी अवस्था दंतकथा अथवा श्रद्धेची नसते. राम गणेश गडकरी यांचे नाटक हा ऐतिहासिक दस्तऐवज मानला, तर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी होणार नाही का ? ती वाघ्या कुर्त्याच्या समर्थकांना मान्य होईल का, याचे उत्तर द्यावे. महात्मा फुले यांनी 1869 साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला. शिवरायांवर प्रदीर्घ पोवडा लिहिला पण त्यात या कुर्त्याबाबत कोठेच उल्लेख नाही. 1981-82 च्या दरम्यान इंग्रजी लेखकजेम्स डग्लस यांनी शिवरायांवर अभ्यास करून पुस्तक लिहिले, त्यात कोठे हा संदर्भ नाही. 1929 साली वि. वा. जोशींनी राजधानी रायगड नावाचे पुस्तक लिहिले, त्यातही या कुर्त्याचा संदर्भ कोठे आढळत नाही. जेधे शकावली आणि अन्य तत्कालीन साहित्यात कोठेच उल्लेख नसताना केवळ गडकरींच्या नाटकावरून वाघ्या कुर्त्याचे उदात्तीकरण करणे ही नाटय़रूप विकृती ठरते. ती टाळण्यासाठी संभाजी ब्रिगेडने तीन वर्षे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. पुराव्याच्या संशोधनाची मागणी केली. पुरातत्त्व विभागाकडे कोणता ठोस पुरावा नसल्यानेच संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुर्त्याचा पुतळा उद्ध्वस्त केला. सरकारने त्याची पुनस्र्थापना केल्याने राज्य सरकारने आता एक तर ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडची मागणी मान्य करावी.

Wednesday 1 August 2012

वाघ्या जमीनदोस्त....

     पुण्यातील लाल महालातील दादूचे अनैतिहासिक शिल्प हटविल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपले लक्ष दादू सारख्याच अनैतिहासिक असणाऱ्या रायगडावरील वाघ्याच्या कुत्र्याच्या शिल्पाकडे वळवले. ६ जून ला दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असतो. २०११ सालच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्या संबंधीची बैठक कोल्हापूरच्या तुळजाभवानी मंदिरात पार पडली. याच बैठकीत वाघ्याच्या या अनैतिहासिक शिल्पाचा मुद्दा पुढे आला. या कुत्र्याच्या शिल्पाला इतिहासामध्ये कसलाही ऐतिहासिक आधार नसल्यामुळे त्याचे शिल्प शिवरायांच्या पवित्र समाधीसमोर असणे हा इतिहासाचा आणि परिणामी शिवरायांचा अपमान आहे.त्यामुळे हे काल्पनिक शिल्पच पुरातत्व खात्याने काढून टाकावे अशी मागणी पुढे आली आणि याला मान्यवर इतिहास संशोधकांनीही दुजोरा दिला. परंतु लोकशाही मार्गाने वारंवार मागणी करूनही मुर्दाड शासनाने हे शिल्प काढले नाही."परिणामी समाजाला योग्य  न्याय देण्यास शासन जेव्हा कमी पडते तेव्हा संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटनेला कायदा हातात घ्यावा लागतो.आणि याचाच प्रत्यय म्हणून  १ ओगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडने शिवरायांचा अपमान करणारे वाघ्याचे शिल्प काढून टाकले." सर्वप्रथम या कृत्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर मावळ्यांचे हार्दिक अभिनंदन. परंतु याप्रकारामुळे सर्वसामान्य जन मात्र संभ्रमित झाले आहेत त्यांच्यासाठीच हा लेखन प्रपंच.

     वाघ्याच्या संबंधी एक दंतकथा सांगितली जाते की"  महाराजांचा  अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमिवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता.दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे ,असे पाहताच त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी  घेतली  आणि स्वतास जाळून घेतले ." अशाप्रकारची दंतकथा सर्वप्रथम ची.ग.गोगटे यांनी १९०५ मध्ये प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले " या पुस्तकात आली आहे. परंतु यापूर्वी या कथेचा उल्लेख कोणत्याही अस्सल साधनात झाला नाही.१८६९ मध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांनी अथक परिश्रम घेऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवरायावरचा जगातील सर्वात मोठा पोवाडा लिहिला पण त्या पोवाड्यमध्ये एका शब्दानेही फुलेंनी वाघ्याचा उल्लेख केला नाही.यानंतर १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लस " नावाचा एक इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला होता.त्याने आपल्या "बुक्स ऑफ बॉम्बे " या पुस्तकात रायगडचे वर्णन लिहून ठेवले आहे. या पुस्तकातही वाघ्याचा उल्लेख नाही. १८८५ ला मुंबई इलाख्याचे गवर्नर "सर रिचर्ड टेम्पल "हेदेखील रायगड पाहण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांच्यासोबत "क्रोफर्ड" नावाचा एक इंग्रजी इसम होता. त्याने या रायगड भेटीवर आधारित "अवर ट्रबल इन पूना एंड डेक्कन " हे पुस्तक लिहिले.पण फुले आणि जेम्स डग्लस प्रमाणेच याही पुस्तकात वाघ्याचा साधा उल्लेख देखील नाही.एवढेच नव्हे तर १९२९ साली प्रकाशित झालेल्या "राजधानी रायगड " या वी.वा.जोशी लिखित  अभ्यासपूर्ण पुस्तकातही कुत्र्याचा किंवा समाधीचा नामनिर्देश नाही. म्हणजेच वाघ्या कुत्र्याचा  शिवरायांच्या काळातील अस्सल पुरावातर नाहीच परंतु १८६९ ते १९२९ पर्यन्त सुद्धा कुणीही वाघ्याची साधी दाखलही घेत नाही  यावरूनच हा वाघ्या नावाचा प्रकार बऱ्याच नंतर कुण्यातरी अट्टल शेंडीधार्यांनी घुसडला आहे हे चटकन लक्षात येते.
   
      मग हे शिल्प आले  कोठून? तर बाळ गंगाधर टिळकाने रायगडावरील शिव् समाधीचा  जीर्णोद्धार करण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्टची ' स्थापना केली.या माध्यमातून टिळकाने बराच पैसा घशात घातला पण मरे पर्यंत हे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊ दिले नाही.टिळक मेल्यानंतर १९२७ मध्ये हे काम कसेबसे  पूर्ण झाल्यानंतरही पैश्याच्या लालचीने टिळक अनुयायांनी बहुजन समाजाकडून चंदा उकळण्याचे काम सुरूच ठेवले.नेमके याच वेळेस राज्यात 'ब्राह्मण-ब्राह्मनेत्तर वाद ' शिगेला पोचला होता आणि या वादात ब्राहमणवादी चारीमुंड्या चित् होऊन जमीनदोस्त झाले होते.  खायला मिळाले की खा खा खायचे आणि पोट भरले  की खालेल्या ताटातच हागून ठेवायचे अशी इथल्या भटांची जुनीच रीत असल्यामुळे आपल्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्ट' च्या  ब्राह्मणांनी  शिवरायांची बदनामी करणारे  कुत्र्याचे शिल्प त्यांच्याच समाधी समोर बसवून घेतले. यावेळी या कुत्र्याचे बारसे झाले नव्हते. पण या देशात शिवरायांचे चरित्र कायम वादग्रस्त बनवून ठेवण्यासाठी आपल्या शेंडीला गाठ मारून बसलेले  पुष्कळ बाष्कळ भट आहेत. त्यांच्यातीलच एक असणाऱ्या आणि एकच प्याला घेऊन उताना पडणाऱ्या 'राम गणेश गडकर्याने ' आपल्या राजसंन्यास या नाटकात या कुत्र्याचे वाघ्या असे नामकरण केले आणि संभाजी राजांची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बदनामी करणारे आपले नाटक या वाघ्याच्या चरणी अर्पण करून चिरनिद्रा घेतली. तेव्हापासून हा कुत्रा तमाम शिवभक्तांच्या अस्मितेवर फतकल मारून बसला होता तो आता ब्रिगेडने उठवला.

     .....खरे तर यामुळे होळकरांची बदनामी होते.

        दादू काढला आणि तमामभट भाईंना सुतक पडले परंतु टिळकाच्या पुण्य(?)तिथीच्या मुहूर्तावर वाघ्या काढल्यानंतर भट भाईंना मात्र सुतक पडले नाही. सुतक पडले ते आमचेच हाडा मासाचे भाऊ असणाऱ्या धनगर बांधवांना. (परंतु सर्वच बांधव असा सुतकी चेहरा करून बसले नाहीत, तर काहीनी संभाजी ब्रिगेडची भूमिका  उचलून धरली आहे.)  वाघ्या बद्दल धनगर समाजाच्या भावना फारच तीव्र झालेल्या सध्या पाहायला मिळत आहेत. ज्या लोकांना भांडारकरी हरीचे लाल उपदेश देतात त्यांची अस्मिता कुत्र्याच्या चरणी वाहणार नाही तर काय होळकरांच्या चरणी वाहणार आहे काय? वाघ्याच्या निमित्ताने धनगर  समाज बांधवांनी संभाजी ब्रिगेडचे आभार मानावेत कारण वाघ्याचा हा पुतळा जसा शिवरायांचा अपमान करत होता तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो होळकरांची बदनामी करत होता. इंदूरचे होळकर हे कट्टर शिवभक्त होते. पुतळा उभारण्याच्या काळात इंदूरच्या गादीवर तुकोजी होळकर होते.शाहू महाराजांनी जेव्हा पुण्यात शिवरायांचा जगातला पहिला पुतळा उभा करण्याचे ठरविले तेव्हा याच तुकोजीरावांनी पुतळ्याच्या पायाभरणी साठी भरघोस आर्थिक मदत केली होती. जेव्हा  कृष्णाजी अर्जुन केळूस्करांनी शिवरायांचे पहिले वहिले शिवचरित्र लिहिले  तेव्हा याच तुकोजी होळकरांनी त्या पुस्तकाच्या शेकडो प्रती विकत घेऊन जगभरातल्या ग्रंथालयांना धाडल्या होत्या.इतकेच नव्हे तर केळूस्करांवर झालेले मोठे कर्ज फेडन्यामागेही  याच होळकरांचा हात होता. मग असे शिवभक्त असणारे तुकोजी होळकर केवळ इंग्रजांना घाबरून शिव समाधी जीर्णोद्धाराला मदत न करता एका कुत्र्याची समाधी उभी करतील? माझ्या धनगर भावांनो "शोध शिव् समाधीचा" या पुस्तकात गोपाल चांदोरकर नावाचा बामन लिहितो की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते म्हणून ते समाधीच्या कामासाठी पैसे देत नव्हते म्हणून आम्ही कुत्र्याचे नाव पुढे करून त्यांच्याकडून देणगी उकळली . अरे हा आहे धनगर अस्मितेचा अपमान. हा आहे मराठ्यांच्या शूर सरदारांचा अपमान.हा आहे पराक्रमी होळकर खानदानाचा अपमान. तुकोजी होळकरांना जर कुत्र्याचे स्मारक उभा करायचे असले असते तर त्यांनी स्वतःच्या इंदूर संस्थानात अशी हजारो स्मारके उभी केली असती.त्यासाठी हजारो मैल दूर असणारा रायगड निवडला नसता.पण नको त्या हरीचे उपदेश ऐकून आम्ही भरकटलो तर नाही नं? विचार करा बांधवांनो विचार करा. आपण एकाच  आईची लेकरे आहोत आणि आपला शत्रूही एकच आहे . असे असताना आपापसात लढणे कशासाठी? अरे वाघ्याच्या निमित्ताने तरी करू या आपल्या अस्सल  अस्मितेचे स्मरण, घेवूया हाती तलवार आणि करू या खांडोळी  आम्हाला आमच्याच बापाचा खोटा इतिहास सांगणाऱ्या नमक हरामी औलादींची. चला बोला जय जीजाऊ-जय शिवराय -जय अहिल्या - जय मल्हार !

बोला हर हर महादेव !!!


(विशेष सूचना : कुत्राप्रेमिंच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वादासाठी असे मान्यही करुया की वाघ्या हा काल्पनिक नसून खरा आहे. जसा गणपतीचा उंदीरही खरा खुरा असतो तसा.पण मग काय आपण गणपती सोडून उंदराचे स्मारक भले मोठे बान्धतो काय?)
  

    

Monday 16 July 2012

अमेरिकेत शिवराय...(भाग १)

      छत्रपती शिवरायांचा कालखंड संपून ३५०-४०० वर्ष झाले असले तरी आजही त्यांचे कार्य जगभरातील मानवी समूहाला भुरळ घालते आहे. म्हणूनच जगभरातील बऱ्याच युद्धात शिवरायांच्या शिवतंत्राचा वापर करण्यात आला आहे. सर रवींद्रनाथ टागोर जपानला हेले असता त्यांना तेथील पत्रकारांनी सवाल केला की एका वाक्यात तुम्ही तुमच्या देशाची ओळख काय सांगाल? तेव्हा टागोरांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले की-"बुद्धाचे तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे." अशा प्रकारे आपल्या देशाची मान जगभरात उंचावणारया शिवरायाचे देशभर स्मारके आहेत.पण देशाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार सुधा शिवरायांचे स्मारक आहे असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल नं? पण मित्रांनी हे खरे आहे.शिवाजी महाराज फक्त देशातच नाही तर देशाच्या बाहेरही पोचले आहेत. शिवरायांचे स्मारक परदेशात आहे आणि ते ही स्वताला जागतिक महासत्ता समजणाऱ्या अमेरिकेत. पण हे आपल्याला माहित नाही हे इथल्या बामणी व्यवस्थेचे हरामखोरीचे लक्षन होय.

     छ.शिवरायांचा पुतळा अमेरिकेतील कालीफोर्णिया प्रांतातील स्यान  जोसे शहरात गुअदालुपे रिव्हर पार्क (GUADALUPE RIVER PARK )  येथे आहे. या स्मारकाची उंची साधारणतः ४ फूट असून त्याचे वजन २०० पौंड पेक्षा अधिक आहे. शिवरायांचे हे शिल्प "बी.आर.खेडकर " यांनी बनविले असून यासाठी सुमारे १ लाख रुपयांचा खर्च आणि ३ महिन्यांचा कालावधी लागला आहे.  हे शिल्प कालीफोर्नियातील  बगीच्यात साधारणतः २०><२० एवढ्या जागेत बसविले आहे. हा पुतळा "स्यान जोसे-पुणे सिस्टर कमिटी " तर्फे पुण्याचे तात्कालिक महापौर शिवश्री दत्ता गायकवाड यांच्या हस्ते स्यान जोसे शहराचे महापौर शिवश्री रोन गोंझाले यांना भेट म्हणून देण्यात आला.

     ज्या चबूतऱ्यावर  शिवरायांचे हे शिल्प उभे केले आहे त्या  चबूतऱ्यावर शिल्पाविषयी माहिती देणारा एक स्टीलचा फलकही लावण्यात आला आहे.या फलकावर इंग्रजी भाषेतून पुढील मजकूर कोरला आहे-

"SHIVAJI FOUNDED PUNE (CIRCA1640).HE WAS THE FIRST MODERN WARRIOR WHO SUCCESSFULLY FOUGHT THE FOREIGN INVADERS FOR 40YEARS AND ESTABLISHED A MARATHA KINGDOM. THAT LASTED 200 YEARS WITH PUNE AS ITS CAPITAL."

  याचा स्वैर अर्थ "शिवाजी राजांनी पुणे हे शहर वसवले. आधुनिक भारतातील शिवाजी हा पहिला थोर राजा होता ज्याने परदेशी शक्तींशी सर्व शक्तीने लढा दिला आणि मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचे हे साम्राज्य पुढे २०० वर्ष टिकले ज्यात पुणे हे महत्वाचे शहर होते."
         बांधवांनो यावरून आपल्याला इंग्रजी भाषा किती महत्वाची हे समजलेच असेल.म्हणून आता आपल्या मुला मुलींना हाय फाय इंग्रजी शिकवायला सुरु करा. हे शिल्प  पाहून आपण शपथ घेऊया की आयुष्यात एकदा तरी अमेरिकेत जाऊन महाराजांच्या या स्मारकाला भेट देईन तरच माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. शिवरायांच्या याच शिल्पाच्या साक्षीने आपण निर्धार करुया की आम्ही मराठे पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ.... पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ.....पुन्हा जग जिंकण्यासाठी सज्ज होऊ   !!!

 अमेरिका स्थित शिव् स्मार्काची काही छायाचित्रे खास "पंचफुला प्रकाशनाच्या " वाचकांसाठी खाली
 देत आहोत.

चित्र १. नकाशात दिसणारे शिवस्मारकाचे स्थान (उपग्रह )   




चित्र २.स्यान जोसे शहरातील शिवरायांचा चित्ताकर्षक अश्वारूढ पुतळा.




चित्र ३.चबुतऱ्यावरील  शिवरायांविषयी  माहिती देणारा फलक.

चित्र ४. शिवरायांचे शिल्प तत्कालीन  पुणे महापौरांकडून स्वीकारताना स्यान जोसे शहराचे  तात्कालिक महापौर रोन गोंझाले.
चित्र ५. शिव जयंतीला पोवाडा  गाणारे महाराष्ट्रीय शाहीर .


(विशेष सूचना-शिवरायांचे हे स्मारक अमेरिकेत स्थापन केल्या जाऊ नये म्हणून पुणेरी बामनांनी केलेली हरामखोरी वाचा पुढील लेखात  ""''अमेरिकेत शिवराय...भाग २ '')

Friday 6 July 2012

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण-प्रा.डॉ.दिनेश मोरे {एम.ए.,एम.फिल.,पी.एच.डी.(इतिहास)बी.ड्रामा}


प्रा.डॉ.दिनेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्या एका दुर्लक्षित पैलू संबंधात या ग्रंथात माहितीपूर्ण विवेचन करून इतिहास लेखनात महत्वपूर्ण भर घातलेली आहे.

 ज्या कालखंडात  स्त्रीची किंमत उपभोग्य वस्तू म्हणून मानली जात असे त्या कालखंडातील एका राजाची स्त्री विषयक दृष्टिकोन स्पष्ट  करून सांगणे हे या पुस्तकाचे प्रमुख बलस्थान आहे.

शिवाजी महाराज हे नीतीमत्तेचे समर्थक होते उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी नीतीमत्ता आवश्यक ठरते. शिवाजी महाराजांची नीतीमत्ता ही किती उच्च दर्जाची होती हे समजून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मुळापासून वाचावे लागेल.

मध्ययुगीन काळात स्त्रियांचा गुलाम म्हणून सर्रास व्यापार चालत असे.विशेषत: युध्द अथवा लुटीत मिळालेल्या स्त्रियांवर ही गुलामी लादली जाई.शिवाजीराजांचा डचांबरोबर जेव्हा तह झाला तेव्हा त्या तहात शिवरायांनी गुलामगिरीच्या प्रथेला आळा घातला,त्यांनी त्या तहातील एका कलमात स्पष्ट म्हटले -"मुसलमानांच्या कारकीर्दीत तुम्हाला स्त्री पुरुष गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती.परंतु माझ्या राज्यात अशा गुलाम प्रथेला परवानगी मिळणार नाही."

शिवाजीराजे हे मध्ययुगातील पहिले सत्ताधीश आहेत की ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घातला."महापुरुष आपल्या काळाला आणि समाजाला घडवितो आणि आकार देतो असे नित्सेने म्हटले आहे."  ते शिवरायांच्या बाबतीत बऱ्याच अंशी लागू पडते.  पारंपारिक व्यवस्थेने छळलेल्या आणि तळागाळाच्या घटकाला न्याय देण्याचे क्रांतीकार्य शिवरायांनी आपल्या काळानुरूप केले, म्हणूनच ३५० वर्षानंतरही मराठी माणसाला 'शी-वा-जी ' या तीन शब्दांचे प्रचंड आकर्षण आहे. 

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण हे पंचफुला प्रकाशनाचे १२ वे पुस्तक प्रा.डॉ.दिनेश मोरे यांच्या अभ्यासपूर्ण व्यासंगातून आकारास आले आहे. शिवरायांचा स्त्रीवादी दृष्टिकोन आजही साऱ्या जगाला अचंबित करून सोडतो पण डॉ.दिनेश मोरे यांनी मात्र या विषयावर एक स्वतंत्र पुस्तक लिहून शिवप्रेमी,इतिहास अभ्यासक आणि वाचकांची चांगली सोयच करून दिली आहे. प्रस्तुत पुस्तक विक्रीसाठी खुले झाले आहे. हे पुस्तक प्रत्येक शिव् प्रेमिकडे असायलाच हवे.

प्रकाशन: पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.
मूल्य:६० रु./- (टपाल  खर्च ३० रु /- वेगळा. अशी एकत्रित रक्कम आमच्या खालील पत्त्यावर पाठवा )
पृष्ठे : ७२
संपर्क: ९४ २२ ५२ ८२ ९०
पत्ता: पंचफुला प्रकाशन, प्लॉट नं.११४७, साई नगर, एन-६, सिडको, औरंगाबाद-४३१ ००३.

Monday 2 July 2012

पर्यावरण खात्यानेच उभारावे शिवरायांचे स्मारक


      छत्रपती शिवरायांचे एक भव्य,प्रेरणादायी असे स्मारक मुंबईत उभे राहावे अशी जगभरातील शिवप्रेमींची प्रामाणिक भावना गेल्या कित्येक वर्षांपासून होती आणि आहे.महाराष्ट्र शासनानेही शिवप्रेमींच्या या भावनेची दाखल घेत शिवरायांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभे करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु शिवराय म्हटले की वाद असे समीकरणच गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जाणीवपूर्वक तयार केल्या गेल्यामुळे अरबी समुद्रातील हे शिवस्मारक वितंडवाद न घालता पूर्ण होईल अशी चिन्हे सध्या तरी महाराष्ट्रात दिसत नाहीत. अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षाही उंच असणाऱ्या या स्मारकामुळे मानुवाद्यांना पोटशूळ उठला नसता तरच नवल. ज्याप्रमाणे आपल्या समस्त जातभाइंची सुप्त इच्छा पुर्ण करण्यासाठी ‘कृष्णा भास्कर कुलकर्णीने’ शिवरायांच्या मस्तकावर वार केला होता त्याचप्रमाणे ‘कुमार केतकर’ नावाच्या याच  कुलकर्णीच्या अनौरस औलादिने या शिवस्मारकाला सर्वप्रथम विरोध केला. परंतु कुमार केतकरच्या  या शिव्द्वेशाच्या काविळीवर संभाजी ब्रीगेड आणि शिवसंग्राम ने जालीम पराशुरामी उतारा शोधून काढल्यामुळे केतकर थंड पडला.
      
     पण केतकरी कोल्हेकुई थांबली म्हणून शिवस्मारकाचे काम गतिमान झाले असे मात्र घडले नाही. कारण त्यानंतर शासनाला आपल्याकडे शिवरायांचे स्मारक बांधण्यासाठी पैसाच शिल्लक नाही असा चित्पावनी दृष्टांत झाला आणि शिवस्मारक हे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर उभे करण्याचे शासनाणे जाहीर केले. यातून शासनाने स्वताच्या आर्थिक दिवाळखोरीबरोबरच आपली बौद्धिक दिवाळखोरीही जाहीर केली. तात्काळ संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्र भरातून माणसागणिक एक रुपया शासनाला पाठविल्यानंतर शासनाला आपल्याकडे मुबलक गंगाजळी असल्याचा साक्षात्कार झाला. संभाजी ब्रिगेडच्या या आर्थिक मदतीमुळे महाराष्ट्र शासनाची आर्थिक दिवाळखोरी जरी मिटली तरी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी मात्र कायम राहिली. कारण या नंतर शासनाणे अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचा अध्यक्ष म्हणून अट्टल शिवद्रोही बाबा पुरंदरेचे नाव घोषित केले. पण संभाजी ब्रिगेड सहीत महाराष्ट्रतील समस्त परिवर्तनवादी संघटनांनी शासनाचा जाहीर निषेध नोंदवत शासनाचागोल भोकाला चौकोनी पाचर’ ठोकण्याचा प्रयत्न हाणून पाडला. महाराष्ट्रतील समस्त शिवप्रेमींचा हा प्रक्षोभ एवढा जबरदस्त होता की तात्कालीन ‘आदर्श मुख्यमंत्री माननीय नामदार श्री अशोकराव चव्हाण’ यांना स्मारक समिती अध्यक्ष पदी बाबा पुरंदरे नसून मीच आहे असे लगोलग जाहीर करणे भाग पडले. एवढ्या ब्राह्मणी दिव्यातून पार पडल्यानंतर तरी शिवस्मारकाचे काम गतिमान होईल अशी भाबडी आशा शिवप्रेमींना होती. परंतु आमचे सरकार हे पेशवाईचा वसा घेतलेले असल्यामुळे ते शिवरायांचे स्मारक कसे काय बरे बांधेल? केतकरी कोल्हेकुई, शासनाची आर्थिक दिवाळखोरी, पुरांदरेच्या  माध्यमातून दिसलेली बौद्धिक दिवाळखोरी संपते न संपते तोच पर्यावरण खात्याच्या माध्यमातून एक नवीनच हरामखोरी परवा परवा वाचायला मिळाली. शिवरायांच्या या स्मारकामुळे देशातील पर्यावरणाला म्हणे प्रचंड हानी पोचणार आहे असा घाशरामी साक्षात्कार पर्यावरण खात्याला झाला आहे.
      
     शिवरायांच्या स्माराकाला विरोध करण्यासाठी शासनाचे पर्यावरण खाते असा काही आव आणत आहे की जणू काही या स्मारकामुळे ओझोनचा थर फाटायला लागला आहे, ग्लोबल वार्मिंग मध्ये कमालीची वाढ झाली आहे, हिमनद्या भराभर वितळू लागल्या आहेत, समुद्रातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे आणि यामुळे केव्हाही त्सुनामी येऊन जगबुडी यायचेच तेवढे शिल्लक राहिले आहे. मागे कुण्यातरी उपटसुम्भाने नव्हते का सांगितले की २०१२ मध्ये सकल पृथ्वी नष्ट होणार म्हणून. कदाचित आमच्या अक्कल शून्य पर्यावरण खात्याने या जगबुडीला शिवस्मारकाला कारणीभूत धरलेले दिसत आहे आणि म्हणूनच ही जगबुडी रोकण्यासाठी शिवस्मारक तेवढे होऊ न देणे एवढा एकच पर्याय शासनाने शोधून काढलेला दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे अर्धी मुंबई ही समुद्रात भर टाकून वसविल्या गेली तेव्हा हे पर्यावरण खाते समुद्रात जलक्रीडा करत होते काय? नाशिकच्या कुंभमेळ्यात साधू संतांनी (?) मल मुत्राचे तर्पण करून अख्खी गोदावरी दुषित करून टाकली तेव्हा हे खाते गांजा फुकत होते काय? एवढेच कशाला गणेश विसर्जनाला गणेश मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण हे या खात्याला दिसत नाही काय? अरे प्रशासन चालविता की शेण खाता? की भावना फक्त गणेश भक्तांनाच असतात? आणि शिवभक्तांना काय काळीज नाही काय? कुणीही उठतो आणि शिवप्रेमींच्या भावनांशी खेळतो.
    
     खरे तर शिवरायांचा इतिहास हा एवढा उज्वल आणि प्रेरणादायी आहे की शासनाने अरबी समुद्रातील शिवस्मारक तर उभारावेच परंतु महाराजांचा पर्यावरण प्रेमाचा इतिहास वाचून पर्यावरण खात्यानेही महाराजांचे स्वतंत्र स्मारक उभारावे. एकीकडे पर्यावरण खात्याने शिवस्मारकाला विरोध केलेला असताना त्याच खात्याने शिवरायांचे स्मारक उभारावे ही मागणी काही जणांना चक्रम आणि अडेलतट्टू वाटण्याचा संभव आहे. परंतु बांधवांनो शिवरायांचे पर्यावरण प्रेम आणि जागरूकता पाहूनच आम्ही तशी मागणी शासनाकडे करत आहोत. शिवस्मारकामुळे एकीकडे पर्यावरण ऱ्हासाची बोंब ठोकणारे शासन मात्र दुसरीकडे रस्ता रूंदीकरण करताना दुतर्फा असणाऱ्या विशालकाय वृक्षांना मुळासकट उचकटून फेकते आणि पुन्हा वरून ग्लोबल वार्मिंग ची बोंब ठोकते यालाच चोराच्या उलट्या आणि सुलट्या बोंबा म्हणतात. खरे तर पर्यावरण रक्षण कसे करावे हे शिकावे तर ते शिवरायांकडून. भारताला जगात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे हे सर्वांना माहित आहे. भारताला खरा धोका हा समुद्र मार्गेच आहे हे शिवरायांनी त्याकाळी ओळखले होते. पण शिवरायांची ही चेतावणी लक्षात यायला आम्हाला कसाबची वाट पहावी लागली हे शिवरायांचे दुर्दैव. मुंबईवर हल्ला करण्यापुर्वी कसाब समुद्रमार्गे येऊन होटेल ताजमध्ये काजू बदाम खात हल्ल्याची योजना आखत बसला आणि आमच्या शासनाला याचा थांगपत्ताही लागला नाही. परंतु शिवरायांचे प्रशासन हे काही आजच्या सारखे नव्हते की कुणीही या आणि टपली मारून जा. तर समुद्र मार्गाचा हा धोका कमी करायचा असेल तर समुद्रावर आपली सत्ता असली पाहिजे आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे साधे सोपे तर्कशास्त्र शिवरायांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी भारतात पहिल्यांदा आरमार दलाची स्थापना केली. आता आरमारासाठी लाकडे लागायची. शिवरायांच्या काळात जंगले दाट होती अन लागतात लाकडेही विपुल प्रमाणात उपलब्ध होती. परंतु रस्ता रुंद  करायचा ना? मग तोडा झाडे असा महाराष्ट्र शासन टाईप सपाटा महाराजांनी लावला नाही. उलट त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिले-
        “स्वराज्यातील आंबे फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची. परंतु त्यास हात लाउ       देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरानसारखी ही बहुतकाळ जतन करून वाढविली. त्यांचे दूखास पारावार काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले, तरी त्याचे धन्यास राजी करून घेउन द्रव्य देउन त्याचे संतोसे तोडून द्यावे.”
         याला म्हणतात पर्यावरण रक्षण, याला म्हणतात वृक्षांची काळजी. खरे तर आरमार उभारणे हे सुद्धा प्रशासनाचाच एक भाग होता. जनतेच्याच हिताचा होता, नव्हे जनतेसाठीच होता. पण शिवरायांनी त्यांच्या रयतेने पोटच्या लेकराप्रमाणे वाढविलेली झाडे सरसकट कापून नेली नाहीत. तर एखादे जुने झाड वाळून गेले असल्यास त्याचा योग्य मोबदला देऊन त्या शेतकऱ्याला राजी करून मगच तोडले. अरे कुठे वाळलेल्या झाडाचाही रयतेला योग्य मोबदला देनारे शिवराय आणि कुठे ‘विशेष आर्थिक क्षेत्राच्या’ नावाखाली शेतकर्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालणारे आजचे राजकारणी? दरवर्षी वर्तमान पत्रात छापुन येण्यापुरते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण होत नाही. तर त्यासाठी पोटच्या लेक्राप्रमाने झाडांचे संगोपन करण्याची दृष्टी कमवावी लागते. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि ग्लोबल वर्मिन्ग्लाही आळा बसेल. अरे या पुढाऱ्यांचे वृक्षारोपण तरी कसे? तर दरवर्षी खड्डा तोच फक्त रोपटी आणि पुढारी मात्र नवीन.
         ते काहीही असो. शिवरायांच्या या गुणांमुळेच त्याकाळची रयत त्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार झाली आणि यामुळेच आजही लाखो शिवप्रेमी महाराजांसाठी प्राण द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. शासनाने अरबी समुद्रातील नियोजित स्मारक तर बंधावेच पण झाडांची पोटच्या लेक्रांप्रमाणे काळजी घेनारा राजा म्हणून जागोजागी शिवरायांचे स्मारक बांधावे. यातूनच मग प्रेरणा घेऊन सामान्य जनताही पर्यावरण प्रेमी बनेल. पण असे न झाल्यास निसर्गातील पर्यावरण बिघडेल तेव्हा बिघडो पण लाखो शिवप्रेमींच्या असंतोशामुळे महाराष्ट्रतील सामाजिक पर्यावरण मात्र प्रदुषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सामाजिक प्रदूषणाला आमचे पर्यावरण खातेच जबाबदार असेल हे काही सांगण्याची गरज आहे का?

Thursday 16 February 2012

शिवरायांना मनोरुग्ण ठरविणारी मानसिक विकृती

             शिवचरित्र आणि वाद हा विषय तसा महाराष्ट्राला नवीन नाही.नव्हे शिवरायान्विषयी वाद चालूच राहावा असेच काही जातीयवाद्यांना वाटत असते.शिवजयंती अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपली असताना काल  दि.१६.०२.२०१२ रोजी दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रात शिवरायांना मनोरुग्ण ठरविणारा  एक लेख छापून आला.राया उपासनी नावाच्या मूळच्या प्लोटिंगचा व्यवसाय करणाऱ्या जळगाव च्या या लेखकाने काल "उत्तम मानसोपचार तज्ञ समर्थ रामदास स्वामी " नावाचा एक अनैतिहासिक लेख दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रात छापून आणला.आजपर्यंत रामदासाला राष्ट्रगुरू  म्हणून मांडत असताना छत्रपती शिवरायांना त्यांचा शिष्योत्तम म्हणूनरंगविले जायचे परंतु या लेखात मात्र रामदासाला मानसोपचारतज्ञ म्हणून मांडताना शिवरायांना मनोरुग्ण,गर्विस्थ ठरविले गेले.याचा जाब जेव्हा या लेखकाला विचारला गेला तेव्हा मात्र तो म्हणाला कि माझ्या मुद्द्याचे खानदान करा,नुसता वाद घालू नका.मुळात मुद्दाच चुकीचा असल्यावर खानदान काय ढेकळचे करणार?
             
           कालच्या प्रकारानंतर राज्यभर प्रचंड संताप उसळला.हजारो शिवप्रेमींनी या विकृतीचा निषेध करत माफी मागण्याची विनंती संपादकाला आणि लेखकाला केली. शिप्रेमिंच्या भावना लक्षात घेत लेखक-संपादक द्वयीने उद्याच्या अंकात दिलगिरी व्यक्त करण्याचा शब्दही दिला.परंतु आजच्या दैनिक दिव्य मराठीच्या अंकात  लेखक-संपादक यांनी व्यक्त केलेली दिलगिरी वाचून "भीक नको पण कुत्रा अवर " अशीच म्हणण्याची वेळ शिव् प्रेमिंवर आली आहे.वाचकांच्या माहितीसाठी आजच्या दैनिक दिव्य मराठी मधील छापून आलेली दिलगिरी देतो." दैनिक दिव्या मराठीच्या १६ फेब्रुवारीच्या अंकात धर्म-दर्शन या पानावर माझा  उत्तम मानसोपचारतज्ञ समर्थ रामदास स्वामी हा लेख प्रसिद्ध झाला आहे.समर्थ व  शिवरायांच्या भेटीचा त्यात संदर्भ मी इतिहास अभ्यासक म्हणून दिलेले नाही,तो माझ्या वाचनाच्या आधारे दिला आहे.(संदर्भ पुस्तक -श्रीसमर्थ लीलामृत ,लेखक कै.वा .दा .पळणीटकर गुरुजी ,प्रकाशक रीसमर्थ सेवा मंडळ,शके १९००  )त्यात समर्थ रामदास स्वामी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणताही आक्षेपार्ह मजकूर नाही.तथापि काही इतिहास तज्ञांच्या मते समर्थांची व शिवाजी महाराजांची भेट झालेलीच नव्हती .माझ्या लिखाणामुळे अशा इतिहास तज्ञांच्या व  त्यांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.सदर  इतिहास तज्ञांच्या व  त्यांच्या समर्थकांच्या दुखावल्या गेलेल्या भावनांबाबत मी दिलगीर आहे. "

               या दिलगिरी प्रदर्शनात राया उपासनी यांनी काही इतिहासकार यांच्या मतांचा जो उल्लेख केला आहे तो सरळ सरळ मराठा सेवा संघच्या विचार्वतांकडे अंगुली निर्देश करतो.कालच्या त्यांच्याशी  केलेल्या संभाषणात ते सेवा संघाला आणि त्यांच्या कक्ष्यांना जातीयवादी ठरवत होते.म्हणजे याचा अर्थ असा निघतो कि रामदास भेटीचा पुरावा आहे पण तो सेवा संघाच्या इतिहासकारांना मान्य नाही.म्हणून त्यांनी अशाच इतिहासकारांची आणि समर्थकांची माफी मागितली आहे.आणि मुल मुद्द्याला बगल दिली आहे.बरे त्यांनी जे संदर्भ म्हणून चोपडे दिलेले आहे ते हि ऐतिहासिक साधन संदर्भात मोडत नाही.विशेष गोष्ट ते स्वत कबुल करतात कि मी इतिहासाचा अभ्यासक नाही तरीही रामदास भेतीसारख्या वादग्रस्त मुद्द्यावर ते भाष्य करतात आणि दिव्या मराठीवले ते निर्लज्जपणे छापतात हा बामणी दहशतवाद आहे. जर आपण इतिहास अभ्यासक नाही तर इतिहासावर भाष्य करायचेच कशाला ?  

               बरे त्यांनी जो लेख मानसोपचार तज्ञ म्हणून छापला आहे त्यात  शिवरायांचा संबंध येतच नाही.जी कथा त्यांनी दिली आहे ती मोघमपणे दिली आहे.त्याला कसलाही पुरावा तर नाहीच पण कथेची सुरुवात ते एका किल्ल्याचे बांधकाम असा करतात.म्हणजे किल्ला कोणता हे पण त्यांना माहित नाही.त्याचे बांधकाम कोणत्या साली सुरु होते हेही माहित नाही.तरीही ते रामदासाला मोठे ठरविण्यासाठी शिवरायांना मनोरुग्ण ठरवून मोकळे होतात.त्यांना याची जाणीव नसावी कि इतिहासलेखन म्हणजे परीकथा  लिहिणे नव्हे तर इतिहास लेखनासाठी पुराव्यांची गरज असते.रामदासाला कोणी मानसोपचार तज्ञ सांगो कि मनोरुग्ण म्हणून सांगो आम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही परंतु या भटांनी आतातरी शिवरायांना बदनाम करणे थांबविले पाहिजे.

          वाचकांसाठी एक महत्वाची गोष्ट.सेवा संघाने सातत्याने सांगितले कि ज्या रामदासाचे चित्र चांगले नाही त्याचे चरित्र वाचायचे तरी कशाला? म्हणून बाम्नांनी आत रामदासाचे लांगोतीवारचे चित्र छापणे बंद केले असून त्याला पूर्ण कपड्यात दाखविले जात आहे.दंत कथा देवून शिवरायांना बदनाम करणाऱ्या राया उपासनी सारख्या तुकार लेखकांना तुकारामांच्याच शब्दात सांगावेसे वाटते कि -"नको  दंतकथा सांगो येथे कोणी / कोरडे ते मनी बोल कोण?". शिवजयंतीच्या तोंडावर महाराजांचा अपमान करणाऱ्या हरामखोरांचा निषेध करून आपण सर्वांनी आणखी जास्त जोमाने छत्रपती महोत्सव साजरा करुया.
 जय जिजाऊ !!!

  

Friday 10 February 2012

सुरुवात....

सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. !!!

मी आज १०.०२.२०१२ रोजी हा नवीन ब्लोग बनविला आहे.बांधवांनो या ब्लॉगच्या माध्यमातून मी नवनवीन विषयावर लिखाण करणार आहेच पण आपल्या प्रकाशना तर्फे कोण कोणती नवीन पुस्तके प्रकाशित होणार आहेत हेही सांगणार आहे. माझे  लेखन  जास्तीत जास्त तर्कशुद्ध आणि वास्तव इतिहासाला आणि सत्यतेला धरून असेल याची मी ग्वाही देतो. आपण आपल्या सर्व  हा ब्लोग जॉईन व्हा आणि आपल्या सर्व मित्रांना सुद्धा  जॉईन होण्यास सांगा. आपल्या प्रकाशनच्या पुस्तकांत काय बदल हवे आहेत किंवा आपल्याला कोणत्या विषयावरचे लिखाण अपेक्षित आहे याची सूचनाही आपण या ब्लॉगवर प्रतिक्रियेच्या माध्यमातून देऊ शकता. पण विसरू नका की आपले प्रकाशन हे शिव विचारांना वाहिलेले आहे. तसेच आमचे एखादे पुस्तक आपल्याला आवडल्यास आपण त्यावरील प्रतिक्रिया या ब्लॉगवरील कोणत्याही लेखाखाली नोंदवू शकता. हा ब्लॉग आपल्याला थेट एकमेकांशी संवाद साधण्याचे माध्यम आहे. त्यामुळे आपणा सर्वांचा भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे.

धन्यवाद.