Tuesday 23 June 2015

बाबासाहेब पुरंदरे की शिर्के?


    सध्या महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापलेले आहे. अर्थातच एका राजकीय निर्णायामुळे हे वातावरण तापलेले आहे. फडणवीस सरकारने या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तथाकथित शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केला आहे. गेल्या ३ वर्षांपासून हा पुरस्कार धूळ खात पडला होता. परंतु त्यावरील धूळ दूर करण्याचे परमपुण्याचे काम या मायबाप फडणवीस सरकारने केले आहे. परंतु ही  धूळ करत असताना फडणवीसांनी आपला कुटील नाना फडणवीसी मेंदू वापरून आपले आडनाव सार्थ करत महाराष्ट्राच्या मातीत नवीनच धुरळा उडवून दिलेला आहे. पुरंदरे यांचे खरे रूप जेम्स लेन प्रकरणातील त्यांचा थेट सहभाग, इतिहासाची मूळ साधने तसेच ऐतिहासिक वस्तू गहाळ करणे, मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपिंसोबत त्यांचे असलेले संबंध इ.  कारनामे एव्हाना महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही माहित झालेले आहेत. तेव्हा पुरंदरे यांची खरी जागा ही तुरुंगांच्या चार भिंतीत असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कसा काय? असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्यावाचून राहिला नाही. पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यामागे त्यांनी केलेले शिवकार्य नसून त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले रक्ताचे नातेच कारणीभूत आहे हे सांगायला आता काही भाजप सरकार मधील बोगस डिग्री धारक ज्योतिषांची गरज उरलेली नाही.

     परंतु या पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली मात्र एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलेले आहे ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे हे पुरंदरे नसून शिर्के आहेत. पुरंदरे यांच्या शिर्के असण्याबाबत महाराष्ट्रातील लोक वेगवेगळे विनोद ऐकवत आहेत. लोक म्हणत आहेत की पुरंदरे यांचे बालपण हे पुण्यातल्या ३०७ शुक्रवार पेठेतील राजेशिर्के यांच्या वाड्यात गेलेले आहे. पुरंदरेंच्या बालपणी अर्थातच त्यांचे आई वडील तरुण अवस्थेत होते. तिथे पुरंदरे कुटुंबाला शिर्केंच्या घराण्यातील कुण्यातरी जाणत्या पुरुषाचा चांगलाच “सहवास” आणि “हातभार” लाभला असल्याचे महाराष्ट्राच्या रस्त्यावर मोठ्या चवीने बोलले जात आहे. पुरंदरेवरील संस्कार, अवघ्या १६व्या वर्षांपासून शिवछत्रपतींची सेवा, घरात जगदंबा आणि संत तुकारामांचा असलेला भला मोठा फोटो असले रांगडे मराठमोळे संस्कार बाबासाहेबांना पुरंदरेपेक्षा शिर्के यांच्याकडून वारसा हक्काने मिळाले असावेत असे सांगितले जात आहे. शिर्केंच्या स्वभावातील करडी शिस्त आणि साखरमाया हे गुण बाबासाहेब पुरंदरे यांच्यामध्ये जशास तसे उतरले आहेत. बालपणी पुरंदरे यांच्यावर खुद्द त्यांच्या वडिलांचाही जीव नसेल एवढा जीव शिर्केंचा होता. नव्हे शिर्के आणि पुरंदरे यांचे गोत्र एकच होते ते म्हणजे शिवभक्ती, जगदंबा भक्ती आणि तुकाराम भक्ती. अशा प्रकारच्या चर्चा राज्यभर रंगत असल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे शिर्के यांच्या वाड्यात आपले बालपण गेल्याचा खुलासा दस्तुरखुद्द बाबासाहेब पुरंदरे यांनीच केला आहे. अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी २० फेब्रुवारी २०१२ च्या लोकसत्तेतील संस्कृती आणि संस्कार पान क्र १ वाचावे.

     खरी गोम काय असेल ते बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचे आई वडीलच जाणोत. परंतु मराठा कुणबी समाजातील स्त्रियांबद्दल बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या “राजा शिवछत्रपती” या कादंबरीत केलेला अवमान पाहता आपल्या बालपणातील काही अवमानजनक गोष्टींचा बदला घेण्यासाठीच पुरंदरे यांनी असे लेखन केलेले असावे असे बोलले जात आहे. मराठा पुरुष आणि स्त्रियांबद्दल पुरंदरे यांच्या मनात एवढा पराकोटीचा द्वेष असण्याचे कारणही पुरंदरे यांच्या बालपणातच दडले असल्याची चर्चा लोक मोठ्या चवीने करत आहेत. बालपणीच्या ‘काही कटू आठवणी’ तारुण्यात स्वस्थ बसू देत नसल्यानेच मनात निर्माण झालेल्या न्यूनगंडातून पुरंदरे यांनी ‘बदल्याच्या’ भावनेतून मराठा-कुणबी स्त्रियांची मनसोक्त बदनामी केली असावी असा अंदाज महाराष्ट्रातील जनता वर्तवित आहे. पुरन्दरेंच्याच लोकसत्तेतील खुलाशाचा आधार घेऊन सध्या राज्यामध्ये NAUGHTY JOKES चे पिक आलेले आहे. एवढेच नव्हे तर पुरंदरे यांचे BIOLOGICAL FATHER कोण असावेत यावरून तर्क वितर्कांना उधान आलेले आहे. महाराष्ट्रातील काही लोकांची अभिरुची कोणत्या पातळीला जाऊन पोचली आहे आहे याचेच हे निदर्शक मानायला हवे. असल्या घाणेरड्या प्रकारामुळे शिर्के घराण्याचीही बदनामी होत आहे याची साधी जाणीव सुद्धा या लोकांना नाही. एक व्यक्ती या नात्याने मी असल्या हीन अभिरुचीचा निषेध करतो.


     अर्थात लोकांच्या तोंडाला कोण आवरणार म्हणा? तसेही नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधू नये म्हणतात. आम्हालाही पुरंदरे यांच्या मुळाचा आणि कुळाचा शोध घेण्यात काडीचाही रस नाही. परंतु मराठा-कुणबी स्त्रियांबद्दल पुरंदरे यांच्या मनात खरेच यांच्या मनात एवढा आकस का? असा प्रश्न मात्र सदसदविवेकबुद्धी असणाऱ्या कुणाही व्यक्तीला पडणे साहजिक आहे. याचे उत्तरही बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचे आई वडील यांनाच ठाऊक.   

डॉ.बालाजी जाधव,औरंगाबाद.
मो. 9422528290

No comments:

Post a Comment