Friday 11 July 2014

गंगाधरपंत ते अभय कुलकर्णी

     
दिनांक ५ जुलै २०१४ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिंदी सिरसगाव येथे मोठाच अनाहूत प्रसंग घडला. अभय प्रभाकर कुलकर्णी या मनोरुग्ण विकृताला अल्पवयीन मुलींची छेड काढतो म्हणून जमावाने बेदम चोप दिला. खरे तर मुलींची छेड काढण्याचे प्रकार  आजकाल सर्रास घडत असताना या कुलकर्णी काकांच्या छेडछाडीवर अवघा लेख लिहिण्याची गरज काय? असा प्रश्न वाचकांना पडणे साहजिक आहे. परंतु अल्पवयीन मुलींची छेड काढत असताना कुलकर्णी काकांनी जो मार्ग अवलंबला तो भल्या भल्यांची मती गुंग करायला लावणारा आहे. पोलिसांपासून ते सामाजिक अभ्यासकांपर्यंत सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. कारण अभय प्रभाकर कुलकर्णी हा मनोरुग्ण स्त्री वेश परिधान करून अल्पवयीन मुलींची छेड काढत होता. अभय प्रभाकर कुलकर्णी हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील बागला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या बी.जी.लाईन इलेक्ट्रिकल्स या कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. अल्पवयीन मुलींची छेड काढण्यापूर्वी तो कधी साडी तर कधी पंजाबी ड्रेस परिधान करायचा. सोबतच महिलांसारखा नट्टापट्टा करायचा. नाकात नथ घालायचा अन कारमध्ये येऊन स्वतःच्या मुलींच्या वयाच्या शाळकरी मुलींना त्रस्त करून सोडायचा. गावात पाचवीपर्यंतच शाळा असल्यामुळे शिंदी सिरसगावच्या मुली पुढील शिक्षणासाठी पोळ रांजणगाव येथील शाळेत पायी पायी जात असतात. त्या रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून दर बुधवारी आणि शनिवारी हा कुलकर्णी स्वतःच्या मालकीची महिंद्रा लोगनकार घेऊन घेऊन यायचा. शाळकरी मुली दिसताच तो कार थांबवायचा आणि मुलींकडे पाहून अश्लील हातवारे करायचा. ‘चला कारमध्ये बसा मी शाळेत सोडतो’ असे म्हणायचा. त्याच्या या ‘रामदासी’ वागण्याने शाळकरी मुलींमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी अखेर ही बाब घरच्यांना सांगितली. त्यामुळे पालकांनी सापळा रचून, पाठलाग करून अभय कुलकर्णी या विकृताला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेने पोलीसही चांगलेच चक्रावले आहेत. कारण कुलकर्णी हा उच्चशिक्षित असून सधन कुटुंबातील आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याची बायको दोन मुलांसह नाशिक येथे राहते.
     एका नव्या सामाजिक समस्येला तोंड फोडणारे हे प्रकरण आहे. पोलिसांना या विक्षिप्त कुलकर्णीला ताब्यात घेतले आहे. कुलकर्णीला काय सजा व्हायची ते कायद्या प्रमाणे होईलही. परंतु महिलांचा वेश परिधान करून मुलींची छेड काढण्याच्या नवीनच प्रकारामुळे पालकांमध्ये व मुलींमध्ये मात्र सध्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.
    यापूर्वीही २००६ मध्ये असाच प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनौ शहरात उघडकीस आला होता. कुलकर्णी महाशयांनी वेश बदलून मुलींसोबत छेडछाड केली तर लखनौच्या देवेंद्रकुमार पांडा नामक महाशयांनी विविध महिलांशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी वेश पालटाचे नाटक सुरु केले. उपरोक्त अभय कुलकर्णी हा इंजिनियर आहे तर लखनौ येथील देवेंद्रकुमार पांडा हा पोलीस ऊपमहानिरीक्षक (Rules and manuals)  आहे. या पोलीस महाशयांना म्हणे १९९१ मध्ये साक्षात भगवान कृष्णाने दर्शन दिले होते. तेव्हापासून पंडा महाशयांच्या मनात कृष्णा विषयी अपार भक्ती आणि प्रेम निर्माण झाले. म्हणून पंडा यांनी कृष्णाला आपले तन,मन,धन अर्पण करण्याचा निर्णय घेतला. परंतु एवढे सगळे अर्पण करूनही पांडाची ‘भक्ती’ जेव्हा ‘शमली’ नाही तेव्हा त्यांनी स्वताला कृष्णसखी राधेचा अवतार मानून भांगेत सिंदूर, नाकात नथ, पायात पैंजण तसेच ओठाला लीपस्टीक अशी रंगभूषा स्वीकारली. पांडाचे स्त्रीच्या शृंगाराने सजलेले रूप भगवान श्रीकृष्णाला किती भावले हे काही कळायला मार्ग नाही परंतु त्यांना राधेच्या रुपात बघायला मात्र ठिकठिकाणी बघ्यांची गर्दी जमत होती. स्त्रियांसारखा नट्टापट्टा करणारे पांडा अंगावर गणवेश मात्र पोलीस अधिकाऱ्याचा घालतात. पांडू हवालदार आपणा सर्वांना परिचित असला तरी उत्तर प्रदेशचे लोक मात्र ‘पांडा हवालदार’चे रूप याची देही याची डोळा साठवत आहेत. विशेष बाब म्हणजे अभय कुलकर्णी सारखे पंडा देखील विवाहित असून त्यांनाही दोन मुले आहेत. त्यातला मोठा मुलगा मुंबई विभागाच्या आयकर कार्यालयात आयआरएस पदावर असून तो विवाहित आहे. तर दुसरा मुलगा अविवाहित असून बैन्ग्लोर येथे अभियंता आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पांडा स्वताला कृष्णसखी राधेचा अवतार मानत आहेत. त्यांची बायको विना उर्फ सीमा हिचे म्हणणे आहे की-“ माझे पती आपल्या पतीकर्तव्यापासून दूर गेले असून रासलीला या धार्मिक सत्संगाच्या आड अनेक महिलांशी अनैतिक कृत्य करतात. त्यामुळे आपल्या पत्नीला लागणाऱ्या मुलभूत गरजा ते पुरवित नाहीत.” (संदर्भ-राधेची बाधा-प्रा. अशोक राणा)  यालाच म्हणतात ‘घरची नागडी अन बाहेरचीला लुगडी’. स्वतःला राधेचा अवतार मानणाऱ्या पांडावर श्रीकृष्णाचे प्रेम आहे की नाही ते श्रीकृष्णच जाणोत परंतु पांडा मात्र स्वतःवर प्रेम प्रदर्शन करत स्वतःलाच ‘आय लव यू सुंदरी’ म्हणतो. मानसोपचार तज्ञांच्या म्हनण्यानुसाय पंडा हे उन्माद विकृतीचे बळी आहेत.        
     खरे तर पुरुषाने महिलांचा वेश परिधान करणे समाजाला जरी नवीन असले तरी इतिहासाला मात्र असे कुलकर्णी-पांडा हमखास भेटतात. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे नाव वीरांगना म्हणून घेतले जाते तिच्या नवऱ्या संबंधीची अशीच काहीशी परंतु सामान्य लोकांना माहित नसलेली माहिती ‘माझा प्रवास’ या गोडसे भटजी लिखित पुस्तकात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात आलेल्या माहिती संदर्भात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आपल्या प्रस्तावनेत म्हणतात-“गोडसे भटजी प्रत्यक्ष महाराणी लक्ष्मीबाई झासीवाली यांच्या पदरी काही दिवस होते. झासीचा सर्व प्रसंग त्यांनी डोळ्यांनी पहिला आणि अनुभविला.” (पृष्ठ क्र.६, प्रस्तावना, दत्तो वामन पोतदार, माझा प्रवास) आता गोडसे भटजींनी पुस्तकात लिहिलेले सर्वच्या सर्व अनुभव स्वतः पाहिलेले आणि अनुभवलेले असल्यामुळे आणि त्यावर महामहोपाध्यायी शिक्का बसल्यामुळे ते किती अस्सल असतील याची कल्पना एव्हाना वाचकांना आलीच असेल. माझा प्रवास या पुस्तकात ‘झाशिवालीचे बालपण’ नावाचे तिसरे प्रकरण आहे. (पृष्ठ क्र. ५१) त्यात झाशी संस्थानचा राजा गंगाधरपंत यांची पहिली बायको आजारी पडून मरण पावल्यामुळे त्यांना दुसरा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाल्याचे लिहिले आहे. जर सुस्वरूप असेल तर गरीब घरातील मुलगी करण्याची तयारीही गंगाधरपंतांनी दाखवली होती. परंतु त्यांना मुलगी द्यायला गरीबातील गरीब व्यक्तीही धजावत नव्हती याचे कारण देताना गोडसे भटजी लिहितात-“ गरीब गरीबाच्या मुली सुरूप चांगल्या गोत्रासी पडणाऱ्या अशा बहुत पाहिल्या, परंतु कोठे जमेना. याचे कारण गंगाधर बाबा हा लौकिकात आठ प्रकारचे षंढ आहेत, त्या प्रमाणे हा राजा षंढ आहे. गंगाधर बाबाचे आचरण असे होते की, आपले वाड्यात माडीवर दोहोचोहो रोजी पुरुष वेश टाकून स्त्रीचा वेश घ्यावा. पैठणी नेसून जरीकाठी चोळी अंगात घालीत असे. मस्तकावर शेंडी फारच मोठी राखिली होती व काही कृत्रिम केश लाऊन सुगंधी तेले लाऊन वेणी घालीत असे. कधी सर्व वेणीतील नाग घालून पाठीवर सोडलेली असे. कधी खोपाही वेणीस असे. मूद वगैरे अलंकार सर्व घालीत असे. गळ्यात गोट्याचे पेंडे व गुजराथी ठुसी वगैरे गळसऱ्याही घालून सारी व मोहराची माळ कंठा व मोत्यांच्या माळा घालून हातात गोट पाटल्या व बांगड्या व नाकांत नाथ व पायांत तोडेजोडवी वगैरे सर्व स्त्रियांचे अलंकार जडावाचेसू II घालून स्त्रियांबरोबर बोलणे वगैरे करीत असे. अशा कारणावरून गरीब लोक असा वर पाहून देणे त्यापेक्षा पाण्यात लोटणे हे चांगले असे बोलत.” गोडसे भटजींच्या या ‘आंखो देखा हाल’ वरून एखादी स्त्री सुद्धा लाजेल एवढे अलंकार लक्ष्मीबाईचा नवरोबा घालत होता हे लक्षात येते. अभय कुलकर्णी प्रकरणामुळे इतिहासाची पाने का चाळावी लागली याचे उत्तर वाचकांना मिळालेच असेल.
     गंगाधर पंतांच्या अशा वागण्यामुळे गरिबातला गरीब देखील आपली मुलगी पाण्यात ढकलून देऊन मारून टाकलेली बरी पण अशा षंढ असणाऱ्या राजाला देणे योग्य नाही असा विचार करायचा. मग लक्ष्मीबाईच्या पित्याची अशी काय मजबुरी होती की त्यांनी लक्ष्मीबाईला गंगाधरपंत सारख्या ‘मर्दाच्या’ स्वाधीन केले? पुढे गोडसे भटजी लिहितात-“ शास्त्रात आठ प्रकारच्या लेखणापूर्वक व्याख्या आहेत त्याप्रमाणे सचेतन पुरुषाचे सिस्न हातात धरून खेळ केला म्हणजे त्या षंढास चेतना व्हावी हा एक प्रकार त्यातच आहे. हा प्रकार या राजास असावा. आणि हेच खरे, कारण प्रथम स्त्रीला एक पुत्र जाहाला होता. ती स्त्री व्यभिचारिणी नव्हती, पतिव्रता साध्वी होती असे सर्व सांगतात. याजवरून राजा पुरुष आहे, असे गरीब लोक म्हणणारे त्याचे गोत्रासी व टीपणासी पडू नये. हा राजा बहुत करून महिन्याचे महिन्यास स्त्रीयांसारखा एकीकडे बसून अस्पर्शदशा तीन दिवस भोगून चवथे दिवसे नाहाणाचा समारंभ मोठा करीत असे. नाहाणे जाहाले म्हणजे पलंगावर निजून पलंगाखाली अग्नी ठेऊन केश वळवीत असे.” स्वजातीतील लोकांना चेतना मिळावी म्हणून भटांनी लक्ष्मीबाईचा खोटा इतिहास लिहिला परंतु तिच्या नवऱ्याला मात्र भलत्याच मार्गाने चेतना मिळत असलेली वाचली की विवेकबुद्धी जागी असणार्यांची बुद्धी चेतनाहीन झाल्या शिवाय राहत नाही. लक्ष्मीबाई सारख्या स्त्रीला याच कारणामुळे तर मर्दानी म्हटले जात नाही ना? ते काहीही असो, कागदी का होईना पण तटावरून घोडा फेकण्याची वेळ लक्ष्मीबाई वर का आली? याचे उत्तर गंगाधरपंतला आडमार्गाने मिळणाऱ्या चेतनेत आहे. खरे तर असल्या विकृत इतिहासाला सोनेरी पाने म्हणून मिरविणाऱ्या पुस्तकांना काडी लाऊन चेतवून दिले पाहिजे. (येथे चेतवून देण्याचा अर्थ पेटवणे म्हणजेच जाळणे असा घ्यावा.)
     गंगाधरपंतांनाच महिलांचे वस्त्र परिधान करण्याचे वेड होते असे नाही तर त्या पूर्वीही राष्ट्रगुरु रामदास यांनी गंगाधरपंत, देवेंद्रकुमार पंडा आणि अभय कुलकर्णी यांना मागे टाकतील असे चाळे दस्तुरखुद्द शिष्यीनिंशी केलेले आहेत. रामदासांच्या शिष्यांमध्ये बालविधवा स्त्रियांचाही भरणा होता. विशेषतः कऱ्हाडची अक्काबाई व मिरजेची वेणूबाई या दोन विधवा महिला रामदासांच्या खास मर्जीतल्या होत्या. त्या दोघी विधवा तरुणी कामिनी होत्या असे न. र. फाटक यांनी लिहिले आहे. रामदासाचा वेणूबाईवर एवढा जीव होता की “कृष्णावेणीच्या वाळवंटात एकदा वेणूबाईचे वस्त्र वाळत असल्याचे पाहून ते मेखळेप्रमाणे धारण केले, असे समर्थ प्रतापचे निवेदन आहे.(स. प्रताप उल्लास ११ पण ७१) ते त्यांच्या अंगावर सतत अकरा दिवस होते. वेणाबाईच्या लुगड्याची मेखळा अंगावर अकरा दिवस वागवीणाऱ्याबद्दल लोकांच्या अंगात विकल्पाचे वारे संचारल्यास त्यात दोष कोणाचा? ” एखाद्या स्त्रीवर प्रेम दाखवण्यासाठी तिचेच वस्त्र परिधान करण्याची जगावेगळी तऱ्हा राष्ट्रगुरू रामदासाने शोधून काढलेली दिसते. बाजारातून दोन रुपयांचे फुटाणे आणण्याच्या अविर्भावात तुझ्यासाठी चंद्र-तारे आणीन म्हणणारे प्रेमवीर अनेक पहिले होते परंतु जिच्यावर प्रेम आहे तिचेच कपडे घालून I LOVE YOU वेणू ”  म्हणनारा फक्त ब्रह्म्कुलोत्पन्न रामदासाच निपजू शकतो. योगायोग म्हणजे रामदासांचे वास्तव्य नाशिकलाच होते तर अभय कुलकर्णीही नाशिकचाच. जय जय रघुवीर समर्थ !!!
     अशीच पण जरा वेगळ्या प्रकारची विकृती विनायक दामोदर सावरकर या तथाकथित स्वातंत्र्यविरालाही होती. परंतु अभय कुलकर्णी, गंगाधरपंत आणि रामदास यांच्या सारखे महिलांचे वस्त्र परिधान न करताही सावरकरांनी त्यांच्या वाट्याला आलेली स्त्रीची भूमिका प्राण ओतून हुबहू वाटविली. सावरकरांच्या या भूमिकेबद्दल  FREEDOM AT MID NIGHT (Larry Collins &Dominique Lapierre ) या इंग्रजी ग्रंथाच्या आधारे आम्ही आमच्या ‘जेम्स लेन प्रकरणातील ब्रह्मराक्षस’ या ग्रंथात लिहिले आहे. “विनायक दामोदर सावरकर याला कित्येक वर्ष अफूचे (opium) व्यसन होते आणि तो समलिंगी व्यक्तींशी संबंध ठेवीत होता. नथुराम गोडसे याने ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले होते. परंतु त्यापूर्वी त्याला एकाच प्रकारचे लैंगिक संबंध माहित होते. ते म्हणजे समलिंगी संबंध. आणि या संबंधामध्ये त्याचा सहकारी होता त्याचा राजकीय गुरु सावरकर.” १८५७च्या समरातून कुणाला कोणती चेतना मिळाली माहित नाही परंतु सावरकरांनी गंगाधरपंतांकडून ‘की घेतले न व्रत आम्ही अंधतेने’ म्हणत तर वरील प्रेरणा घेतली नसेल ना? बांधवांनो लैंगिक विकृतीचा इतिहास हा असा वलयांकित आहे. अभय कुलकर्णी दोषी आहेच परन्तु प्रत्येक कालखंडात असे कुलकर्णी एका ठराविक जात समूहात का उत्पन्न होत आहेत हा समाजशास्त्रीयांसमोरचा मोठा प्रश्न आहे.
काय आहे हा प्रकार? :
पुरुषाने तथाकथित पुरुषी वस्त्र न परिधान करता स्त्रियांची वस्त्रे घालणे हा काय प्रकार आहे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याचे उत्तर आपल्याला वैद्यकशास्त्र देते. वैद्यकीय अभ्यासक्रमात Forensic medicine and Txicology नावाचा विषय आहे. या पुस्तकात Sexual Perversions म्हणजे लैंगिक विकृती नावाचे प्रकरण आहे. स्त्रीशी शारीरिक संबंध न ठेवता लैंगिक सुख मिळविणाऱ्या प्रत्येक मार्गाला लैंगिक विकृती म्हटले जाते. उपरोक्त विकृतीला Transvestism असे म्हणतात. ही विकृती असणाऱ्या व्यक्तीला आपण विरुद्धलिंगी व्यक्तिमत्वाने ओळखले जावे अशी तीव्र इच्छा असते. म्हणून अशा विकृतीने ग्रस्त असणारे पुरुष महिलांचे वस्त्र परिधान करून लैंगिक आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात. गोडसे भटजींनी वर्णन केलेला गंगाधरपंत असो किंवा न. र. फाटकांनी वर्णिलेला रामदास असो अथवा राधेने बाधलेला देवेंद्रकुमार पंड्या, अभय कुलकर्णी असोत ही सर्व मंडळी या लैंगिक विकृतीने ग्रस्त असल्याचे आपणास वाटत नाही काय?

    वर आलेली सर्व मंडळी ही समाजाच्या एका विशिष्ट जातीतील आणि स्तरातील आहेत ही बाब या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढवणारी आहे. समाजासमोर चुकीचे आदर्श ठेवल्यामुळे तर असे प्रकार घडत नाहीत ना? धार्मिक ग्रंथात बऱ्याच विकृती तथा महिलांची अवमानकारक वर्णने आढळतात. उदाहरणच द्यायचे झाले तर धार्मिक ग्रंथांतील अश्वमेघ यज्ञाची वर्णने असोत किंवा यम आणि यमी या भाऊ बहिणींच्या संवादांची वर्णने असणारे ग्रंथ असोत किंवा वि. का. राजवाडे लिखित ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हा ग्रंथ असेल किंवा पेशव्यांच्या काळात खेळल्या जाणारे ‘घटकन्चूकी’ सारखे खेळ असोत की त्याकाळातील स्त्रियांच्या नग्न धावण्याच्या शर्यती असोत. असल्या अभिरुचीहीन ग्रंथांच्या प्रभावामुळे तर असे प्रकार किंवा अशी विकृत मानसिकता तयार होत नसेल ना? कारण उपरोक्त उदाहरणे ही धार्मिक सत्तेवर आपलाच अधिकार सांगणाऱ्या वर्गातली आहेत. याचा समाजशास्त्रीयदृष्ट्या विचार करण्याची गरज अभय कुलकर्णी प्रकरणामुळे निर्माण झालेली आहे. या प्रकारांमुळेच कदाचित वीर उत्तमराव मोहिते यांनी अध्यात्माला ‘नपुंसकाचे स्वप्न रंजन’ असे म्हटले असावे. तेव्हा धर्मग्रंथांचा आणि ऐतिहासिक साधनांचा योग्य तो अभ्यास करून शासन प्रशासनाने या प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा रामदासी विकृती असणारे असे कुलकर्णी प्रत्येक कालखंडात तयारच होत राहतील.                  

Wednesday 2 July 2014

मराठा ही जात नसेल तर...


     

     आरक्षणाचे जनक असणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असणाऱ्या मराठा समाजाला राज्य सरकारने १६ % आरक्षण जाहीर केले. जाहीर केले म्हणजे शासन निर्णय काढला नाही फक्त जाहीर केले. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होणे लांबच आहे. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणाऱ्या व्यक्तीमध्ये निषेध कोणत्या मुद्द्यावरून करावा यात एक वाक्यता दिसून येत नाहीये. म्हणून ‘जातीचे मराठे हे उच्चवर्णीय पासून ते सरंजामदार आहेत’ इथपासून ते ‘मराठा नावाची कोणतीही जात नसून तो एक भाषिक समूह आहे’ इथपर्यंत निषेध होत आहे. मराठा ही जातच नाही असे म्हणत माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. आरक्षण लागूच झाले नसता त्याला आवाहन देणे म्हणजे लग्नाच्या अगोदरच खावटीसाठी अर्ज दाखल करण्यासारखा हा प्रकार होय. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता ही केवळ मराठा जातीसाठीच राबवली जात आहे असे म्हणत या निर्णयाला विरोध होत आहे. (दै. दिव्य मराठी, दि. ३० जून २०१४, मराठा-राष्ट्रातील महादलीत, ले-प्रमोद चुंचूवार)
      मुळात जर मराठा नावाची कोणतीही स्वतंत्र जात नसून भाषिक समूह असेल तर तिला जात मानून कसे काय टीकेची झोड उठवली जात आहे, हे समजण्यास वाव नाही. केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी १६ मार्च २०१४ ला दै. दिव्य मराठीत सतीश वाघमारे यांनीही त्यांच्या “कशाला पाहिजे आरक्षण?” या लेखात ‘महाराष्ट्रात मराठा नावाची स्वतंत्र जात अस्तित्वात हाय का नाही हाच वादाचा विषय आहे’ असे लिहित मराठा जातीबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. सदरील लेखात सतीश वाघमारे यांनी ब्रिटीश इतिहासकार ग्रांट डफ यांच्यापासून ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पर्यंतचे दाखले देत ‘मराठा नावाची स्वतंत्र जात मानण्याऐवजी ब्राह्मणेत्तर जातींपैकी पुढारलेल्या जातींना मराठा नावाने संघटीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता’ असे विधान केले होते. या सर्व संदर्भांना ग्राह्य मनात सतीश वाघमारे यांनी ‘२० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत तरी मराठा नावाची स्वतंत्र जात मानण्यात येत होती काय?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. १९३१ च्या जनगणनेत मराठा जातीच्या नावाखाली एकूण नऊ जातींचा समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी मांडले आहे. याचाच अर्थ वाघमारे सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भ देत मराठा जातीच्या जात असण्यावर प्रश्न चिन्ह उभे केले आहे. तेव्हा प्रमोद चुंचूवार यांनी मराठ्यांना महादलीत ठरविण्यापूर्वी मराठे नेमके कोण व त्यांचा मूळ व्यवसाय काय याचे तपशीलवार संदर्भ दिले असते तर त्यांच्या लेखाचे सामाजिक मूल्य अजूनच वाढले असते.
      बरे सतीश वाघमारे यांनी तरी मराठा नावाखाली समाविष्ट असणाऱ्या नऊ जातींची नावे दिली असती तर दिव्य मराठीच्या वाचकांच्या ज्ञानात भर पडली असती. जर मराठा ही स्वतंत्र जात नसून पुढारलेल्या जातींचा समूह असेल तर आज रोजी स्वतःला मराठा म्हणवून घेणारे वगळल्यास बाकीच्या आठ पुढारलेल्या जातींचे काय झाले? पुढारलेल्या जातींपैकी आजची तथाकथित मराठा जात वगळता बाकीच्या पुढारलेल्या जातींना अचानक मागासलेपणाचे डोहाळे का व कसे लागले? मग ज्या निकषांच्या आधारे मराठा समूहातील पुढारलेल्या इतर जातींना मागास ठरवले गेले तेच निकष मराठा संज्ञेखाली एकाकी पडलेल्यांना का लागू होऊ नयेत? जात हे भारतीय समाजाचे वास्तव आहे. २० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत जर मराठा ही स्वतंत्र जात मानण्यात येत नव्हती तर २० व्या शतकाच्या पूर्वी आजच्या मराठ्यांची गणना कोणत्या जातीत होत होती? या प्रश्नांची उत्तरे सतीश वाघमारे यांनी नाही तरी किमान प्रमोद चुंचूवार यांनी एक जबाबदार पोलिटिकल ब्युरो हेड म्हणून द्यायला हवी होती.
    आजची सामाजिक परिस्थिती पाहता स्वतःला मराठा मानणाऱ्या जात समूहाचे माराठेत्तर समाजात फक्त कुणबी जातीशीच बेटी संबंध प्रस्थापित होतात. (प्रस्तुत लेखक हा तथाकथित ९६ कुळी मराठा जातीतील असून त्यांची बायको ही विदर्भातील कुणबी जातीतील आहे.) ज्यांचा बेटी व्यवहार होतो त्यांची जात एक असते हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे. कारण स्वजातीतच मुलगी देणे (endogamy) हे जात बळकट करण्यास कारणीभूत आहे म्हणूनच शेकडो वर्षांपासून जातीव्यवस्था अस्तित्वात आहे. बेटी बंदी हे जातीला स्वतंत्र अस्तित्व देणाऱ्या सप्तबंदिंपैकी एक बंदी आहे हे समाजशास्त्रीय वास्तव आहे. मग मराठा ही जात नाही तर मग काय आहे? तर “मराठा हे अस्मितेचे किंवा स्वाभिमानाचे प्रतिक आहे. वास्तविक मराठा अशी कुठली जातही नाही आणि पारंपारिक व्यवसायही नाही.” (आरक्षण नको, जातीचे दाखले हवे, ले-प्रा. दत्तात्रय परभणे, मराठा आरक्षण: भूमिका आणि वास्तव. पृ.१०४.) जात म्हणजे उदार्निर्वाहाचा पिढीजात धंदा होय. जात हे फक्त मागासलेपणाच्या Identification चे साधन आहे. स्पष्ट आहे ‘मराठा’ असा कुठलाही वडिलोपार्जित पेशा किंवा पारंपारिक धंदा नाही. मग आज स्वताला मराठा मानणाऱ्या समूहाचा पिढीजात धंदा हा शेती म्हणजेच ‘कुणबिक’ हाच आहे. म्हणजे आजचे मराठे हे त्यांचे कुणब्यांशी असणाऱ्या बेटी संबंध आणि पारंपारिक कुणबिक व्यवसाय या वरून मुळातच इतर मागासवर्गीय आरक्षणाचे लाभधारक ठरतात.
      ‘१९५२ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ते केंद्रात मंत्री असताना मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावे या हेतूने मुंबई येथे मराठा मंदिर मध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक बोलावली होती, परंतु मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय आहोत; कुणबी-मागासवर्गीय कसे म्हणून घ्यावे? असे म्हणून पंजाबरावांच्या सूचनेला विरोध केला. तथापि त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विदर्भातील मराठ्यांनी त्यांची सूचना स्वीकारली. ज्याचा लाभ त्यांच्या भावी पिढ्यांना झाला.’ (आरक्षणा बाबत दिशाभूल करणारे दावे- डी.आर.शेळके, दै. दिव्य मराठी, दि. २०१४) यावरून असे सिद्ध होते की पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावरून विदर्भातील कुणबी झालेला वर्ग १९५२ पर्यंत मराठा म्हणूनच जगत होता. आजही मराठवाड्यातील मराठ्यांचे विवाह विदर्भातील कुणब्यांशी का होतात याचे गमक हेच आहे. विदर्भातील तत्कालीन मराठ्यांनी जो लवचिक व्यवहारवाद स्वीकारला तो मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील तत्कालीन मराठ्यांना दाखवता आला नाही ही खचितच खेदाची बाब आहे. परंतु यावरून आजचे मराठे हे कुणबीच नाहीत असा याचा अर्थ काढल्या जाऊ शकत नाही.

     आमचे म्हणणेही हेच आहे की मराठा ही जातच नाही, ती वृत्ती आहे. राष्ट्रगीतात तर ‘मराठा’ हा शब्द प्रांतवाचक आहे. तेव्हा राज्य सरकारने जास्त आढेवेढे न घेता आजच्या मराठ्यांना  त्यांच्या पारंपारिक व्यवसायाच्या आधारे ‘मराठा-कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ किंवा ‘कुणबी’ जातीचे दाखले द्यावेत. कारण इतर मागासवर्गीय असणे हा मराठ्यांचा घटना दत्त अधिकार आहे.

Wednesday 23 April 2014

‘शाही’ शाई




   दुबार पेरणीची सवय असणाऱ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दुबार मतदानाचे सल्ले देणारे शरद पवार हे या देशाला कृषिमंत्री म्हणून लाभावेत हे या देशाचे दुर्दैव. दुबार मतदान करताना पहिल्यांदा बोटावर लावलेली शाई पुसायला मात्र विसरू नका असा पाचकळ इनोदही पवार साहेबांनी केला. असले पाचकळ इनोद करण्यात महाराष्ट्रात छोट्या पवारांचा कुणी हात धरणार नाही असा भल्या भल्यांचा जो समज होता त्या समजाचे रुपांतर या थोरल्या साहेबांच्या इनोदाने पार गैरसमजात करून टाकले. रोज बडबड करणारी व्यक्ती अचानक गप्प्प राहू लागली की काहीतरी गोम आहे हे समजते तसेच नेहमी गंभीर तत्वज्ञान झोडणारी व्यक्ती जेव्हा पांचट आणि पाचकळ इनोद करते तेव्हाही काहीतरी गोम नक्की आहे हे न समजण्याएवढा महाराष्ट्र दुधखुळा नाही. साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिलेले वाचले होते परंतु महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांना दुबार मतदानाची माहिती व्हावी म्हणून या श्याने गुरुजींनी ‘आमची शाई’ हे पुस्तक लिहायला घेतल्यास गारपिटीने ग्रस्त असणाऱ्या महाराष्ट्राला तेवढेच हसण्याची सवय तरी लागेल. तत्पूर्वी २५००० कोटींचा हिशेब सेबीला देण्यात अपयशी ठरलेल्या सहाराश्रीचे थोबाड कुणीतरी शाई फेकून काळे केले होते. परंतु सहाराश्रीने ती शाई जणू काही त्यांना विजयाचा कुमकुम तिलक लावला आहे अशा अविर्भावात मिरवलेली जगाने पाहिलेले आहे. तेवढ्यात ४९ दिवसातच सत्ता सुंदरीच्या संसाराला विटलेल्या केजरीवालांचेही तोंड कुणीतरी शाईने काळे केल्याचे वाचण्यात आले. अर्थात आमुच्या प्राणप्रिय भारत देशात सुनामी लाटा याव्यात तशा काही लाटा अधून मधून येत असतात. मागे राजकीय नेत्यांचे थोबाड फोडण्याची जणू काही स्पर्धा लागावी असे हल्ले नेत्यांवर होऊ लागले. मा.श्याने गुरुजी उर्फ शरद पवार यांना देशाच्या राजधानीत चपराक लगावण्यात आली आणि दिल्लीत आजही मराठ्यांची काय अवस्था आहे हे आम्हाला समजले. पी. चिदंबरम् यांच्यावर कुण्यातरी उपटसुंभाने चप्पल फेकली. परंतु या थोबाडफोड स्पर्धेचा क्लायम्याक्स मात्र अरविंद केजरीवालांच्या थोबाड फोडीने झाला हेही आपण याची देही याची डोळा अनुभवले.

     मागे दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मेणबत्त्यांचा प्रचंड खप वाढला. ही मेणबत्त्यांची लाटही एवढी जोरात होती की ती पाहून अंबानी ग्रुपला काही काळासाठी नैसर्गिक वायूंचे साठे बंद करून मेणबत्ती उत्पादनात मुसंडी मारण्याची इच्छा झाल्याची एक बातमीही मध्यंतरी वाचण्यात आली. तत्पूर्वी अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार मुक्तीचे आंदोलन करून देशाला आणि समाजाला “अण्णा” टोपी घातली. विशेष बाब म्हणजे याच टोपीला पूर्वी गांधी टोपी म्हणून नावाजल्या जायचे आणि तीला सोन्याचे दिवस आणणाऱ्या आण्णांना आधुनिक गांधी म्हणून नावाजले जाऊ लागले. असे हे गांधी आणि अण्णांचे साटेलोटे आहे. तर या अण्णा उर्फ गांधी टोपिंची एवढी जोराची लाट आपल्याकडे आली की कित्येक ठिकाणी नवजात बाळाचे बारसे करताना त्याच्या डोक्यावर ही अण्णा उर्फ गांधी टोपी घालण्याची प्रथाच पडलीय म्हणे. म्हणजे ते बाळ आयुष्यभर इतरांना टोप्या घालायला मोकळे. जाऊ द्या, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे. असो. तर सध्याच्या निवडणुकीच्या या धामधुमीत शाईने जिथे हक्काने बोट काळे करून घ्यायला भारतीय समाज तयार झाला तिथे एका शाई प्रकरणाने मात्र महाराष्ट्राला आणि सबंध देशाला चांगलेच हादरवून सोडले व मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझ्याच बापाचा म्हणणाऱ्यांना घाम फुटला.

    त्याचे झाले असे की दि. १० एप्रिल २०१४ रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण येथे सरदार पाटणकर यांच्या घराण्यासंदर्भात लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन बाबा पुरंदरे यांच्या हस्ते होते. या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज, सातारचे शिवाजीराजे भोसले, आमदार विक्रमसिंह पाटणकर आदी ‘शाही’ मंडळींची उपस्थिती होती. हा शाही प्रकाशन सोहळा आटोपून परत निघाल्यानंतर बाबा पुरंदरे यांना पुष्पहार घालण्याच्या निमित्ताने आलेल्या सुयोग औंधकर या बहाद्दर तरुणाने पुरंदरे यांना आधी पुष्पहार घालून नंतर शाईचा प्रसाद दिला. कायम सत्काराचे हारेतुरे मिरवण्याची सवय झालेले पुरंदरे या शाई फेकीमुळे काही काळ हडबडून गेले. अर्थातच पुरंदरे यांच्या लिखाणाची जातकुळी कोणती आहे हे आता महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही माहित झाल्यामुळे या ‘शाही’ शाई फेकीमुळे समाजाच्या कोणत्याही स्तरातून साध्या निषेधाचे सूरही उमटले नाहीत. उलट बरे झाले एकदाचे पुरंदरेचे तोंड काळे झाले इथपासून ते हा प्रकार २००३-०४ सालीच व्हायला हवा होता इथपर्यंतच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभरातून ऐकायला मिळाल्या. स्वतःचे रक्त सांडून जगाला हेवा वाटावा असा इतिहास मराठ्यांनी निर्माण केला मात्र पुरंदरे आणि कंपूने त्यांच्या हातातील लेखणीच्या आणि त्या लेखणीतील शाईच्या जोरावर वारंवार मराठ्यांचा इतिहासाला डांबर फासले. त्यामुळे अशांचे तोंड काळे करणे ही एक सामाजिक आणि नैतिक जबाबदारी होऊन बसली होती ती सुयोग औंधकर या तरुणाने पार पडली. हे महत्कार्य करण्यासाठी सुयोगने जे धाडस दाखवले त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     खरे तर या निमित्ताने असे प्रकार का होत आहेत याचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. परंतु आपल्या पराशुरामापासून ते नथुरामापर्यंतच्या सोनेरी परंपरेला जपत; हाती असलेल्या प्रसार माध्यमांचा वापर वेश्येसारखा करत; ब्राह्मणवादी कंपूने सुयोग औंधकर या तरुणाला तत्काळ शाहिस्तेखान ठरवून टाकले. भांडारकर हल्ला प्रकरणीही संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेला या मंडळींनी असेच तालिबानी ठरवून टाकले होते. या मनुवादी मंडळींच्या म्हणण्यानुसार असली कृत्ये ही तालिबानी किंवा शाहिस्तेखानी वृत्तीची असतील तर या लोकांनी विचार केला पाहिजे की असे कृत्ये करण्यासाठी कुणाचेही पाठबळ नसताना, कुणाची फूस नसताना अगदी उत्स्फूर्तपणे स्वताची कसलीच पर्वा न करता तथाकथित ज्ञानतपस्व्यांचे आणि ज्ञानभांडारांचे तोंड काळे करणारे लोक समाजात का तयार होत आहेत? इतिहासावर अनेक लोक लिहीत असताना औन्धकरच्या हातातील शाईला नेमके पुररंदरेचेच तोंड का काळे करावे वाटले? हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. जर पुरंदरेच्या तोंडावर शाई फेकणारा सुयोग औंधकर शाहिस्तेखान असेल तर त्याने तोंड काळे केलेला बाबा पुरंदरे हा  इतिहास लेखनातील नक्कीच औरंगजेब असला पाहिजे. संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटना जर तालिबानी असतील तर भांडारकर सारख्या संस्था मोगलाईचे अड्डे असले पाहिजेत. म्हणून जो पर्यंत असल्या औरंगजेबांचा आणि त्यांच्या मोगलाई अड्ड्यांचा बंदोबस्त होत नाही तो पर्यंत समाजात असे शायिस्तेखान निर्माण होतच राहतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार पुरंदरे आणि असल्या प्रवृत्तीला पाठीशी घालणारी जातीयवादी वृत्तपत्रेच असतील हे आपण पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. पुरंदरेसारख्या जेष्ठ साहित्यिकावर(?) शाईफेक होते आणि समाज दातखिळी बसल्या सारखा गप्प राहतो यामागे ही वरील कारणे आहेत. 
     
     विरोधकांना गप्प करणे याचा अर्थ त्याचा गळा दाबणे असा होत नाही हे सुयोग औंधकरला पण माहिती आहे परंतु आपण काहीही लिहिले तरी आपले कुणीही वाकडे करूच शकत नाही अशा अविर्भावात वावरणार्यांना किमान सुयोग औंधकरच्या बाटलीतील शाईची तरी भीती असली पाहिजे की नाही? मुद्द्याला उत्तर गुद्दा असूच शकत नाही हे कुण्याही सुसंस्कृत मनुष्याला समजणारे  तत्वज्ञान आहे परंतु इतिहास लेखन करत असताना तो मुद्देसूद न लिहिता वास्तवाचे मुडदे पाडत लिहिला जात असेल तर अशा वेळी गुद्दे जरी वापरायचे नसले तरी ४-५ रुपयात कुठल्याही जनरल स्टोअर्समध्ये भेटणारी शाई वापरणे गरजेचे ठरते. वैचारिक लेखन करत असताना विचारांचे उत्तर विचारांनी देणे हे केव्हाही संयुक्तीकच आहे परंतु वैचारिक लेखनाच्या नावाखाली जर कुणी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळत एखाद्या समाजाच्या इभ्रतीलाच हात घालत असेल तर अशा खटनटाशी वैचारिक युक्तिवाद करणे हे वेळेचा अपव्यय ठरते. म्हणून अशा विकृत आणि तथाकथित ज्ञानतपस्व्यासाठी शाईचा वापर हा केवळ कागदावरच करायचा नसून ती शाई पायातील पायताणाला लावून त्या पायताणाचे पलिते असल्या विकृत वीरांच्या तोंडावरून फिरवायलाच हवेत. तरी बरे औंधकर या तरुणाने ती शाई पायताणाला लावली नव्हती. परंतु या पुढे महाराष्ट्रात असले कुणी निपजणारच नाही या भ्रमात कुणीही राहू नये.
    
    स्वतःची अस्मिता दुखावली की व्यक्ती कोणत्याही टोकाला जातो ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. इकडे ऐतिहासिक विकृती करणाऱ्या पुरंदरेचे तोंड काळे होते न होते तोच प्रधानमंत्री पदाचे बाशिंग गुढग्याला बांधून देशाचे नेतृत्व करण्याचे डोहाळे लागलेल्या नरेंद्र मोदींच्या गुजरातेत शिवरायांच्या बदनामीचे प्रकरण पुढे आले आहे. जेम्स लेन नामक शिवद्रोह्याने शिवरायांचे पितृत्व दादू कोंडदेव या चपराश्याकडे देण्याचे पाप केले होते परंतु गुजरात मधील शिक्षण मंडळाने या चपराशाला शिवरायांच्या बापाचाही बाप म्हणजेच आजोबा दाखवण्याचे महापाप केले आहे. इयत्ता ७वी ला असणाऱ्या 'सोशल सायन्स' या पुस्तकात पृष्ठ.क्र. ५९ वर, "मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ आणि ऱ्हास" या सहाव्या प्रकरणात ही प्रस्तुतची बदनामी छापून आली आहे. एवढेच नव्हे तर शिवरायांचा जन्म १६०३ साली शिवनेरी या राजवाड्यात झाल्याचे लिहून गुजरात शिक्षण मंडळाने आपली बौद्धिक दिवाळखोरीही जाहीर केली. अमेरिकन व्यक्तीच्या नथीतून बाण मारत दादू कोंडदेवाला शिवरायांच्या पितृस्थानी दाखवण्याचे कारस्थान महाराष्ट्रात अयशस्वी झाले परंतु हाती असलेल्या सत्तेच्या मुजोरीवर गुजरातेत मात्र ही विकृती शालेय अभ्यासक्रमात घुसडण्यात आली. देशाची सूत्रे मोदींच्या हाती दिल्यास इतिहासावर कोणती वेळ येईल याचीच ही झलक म्हणायला हवी. म्हणूनच युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात- “बहुधा महाराष्ट्रात या जेम्स लेन प्रवृत्तीच्या लोकांना काही करता येत नसल्याने गुजरातेत ते आपले विकृत मनोरथ तडीस नेत असतील.”
    
     गेल्या काही दिवसांपासून आपल्या सभांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी वारंवार चुकीचे ऐतिहासिक दाखले देत आहेत. ज्यांच्या राज्यातील पाठ्यपुस्तकेच चुकांनी भरलेली असतील ते नेते जाहीर सभेत काय दिवे लावतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नसून त्यासाठी मोदींची एखादी सभाच पुरेशी आहे. त्यात पुन्हा रायगडला भेट दिल्यानंतर आजपर्यंत आम्हाला चुकीचा इतिहास सांगण्यात आल्याची वल्गना करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे. खरे तर मोदी साहेब यांच्या रायगडावरील भाषणाने पुरंदरे आणि कंपूच्या मनात चलबिचल झाली असणार. ती अंतर्गत चलबिचल चव्हाट्यावर आणण्याचे काम सुयोग औंधकर या तरुणाने केले. म्हणून नरेंद्र मोदिन्साहित त्यांना प्रधानमंत्री पदासाठी पुढे करून मतांची भिक मागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या दावणीला बांधलेल्या प्रसार माध्यमांनी सुयोग औंधकर याचे आभार मानायला हवेत.
 

     बाकी सुयोग औंधकर यांच्या कृत्याला कुणी काय समजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु “तोंडावरील शाई पाण्याने धुतल्यानंतर निघूनही जाईल पण आपल्या हाती असणाऱ्या लेखणीतील शाईच्या जोरावर आमच्या इभ्रतीवर केलेली शाईफेक आम्ही कशी धुवून काढावी?” या सुयोगला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेही नाही.  

Sunday 13 April 2014

शरद पाटील यांच्या जीवन आणि कार्याची ओळख करून देणारे विविध लेख.



शपा (शरद पाटील)-प्रा.श्रावण देवरे  

राजकीय दरारा, जातीय (सरंजामी) दरारा, आर्थिक दरारा असे अनेक दारारा असलेले नेते गल्लो-गल्ली पायलीचे पंधरा सापडतात. परंतू वैचारिक-तात्त्विक दरारा असलेली व्यक्ती युगात एखादीच असते. दिड जिल्ह्यातील छटाकभर राजकीय पक्ष घेऊन देशाच्या राजकारणाला व तत्त्वकाराणाला जातीअंताचे क्रांतिकारक वळण देण्याची जबरदस्त इच्छाशक्ती बाळगणारा स्वातंत्र्योत्तर (सत्तरीनंतरच्या) काळातील एकमेव महापुरुष शपा होय! सत्यशोधक मार्क्सवादी मासिकातील काही अंक नुसते चाळले तरी या वैचारिक-तात्त्विक दरार्‍याची कल्पना येते.
माणसं राजकीय व सामाजिक जिवनात जेवढी मोठी असतात तेवढीच ती व्यक्तिगत जिवनात लहान व संकुचितही असतात. याला कधी काळाच्या मर्यादा म्हटल्या जातात तर भारतीय संदर्भात या जातीय मर्यादाही असू शकतात. परंतू त्यांच्या ह्या मर्यादा कोणत्या काळात किती प्राधान्याने मांडाव्यात याचेही भान असले पाहिजे. बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या स्वभावाचे भांडवल करून त्यांचेपासून व चळवळीपासून लांब गेलीत. त्यांच्या वैचारिक दरार्‍याने आकर्षित झालेले कार्यकर्ते त्यांच्या स्वभावाच्या दरार्‍याने जेव्हा पळून जाण्याची भाषा करीत तेव्हा ते म्हणत, या चळवळीत तुम्ही क्रांती करण्यासाठी आला आहात की माझे सौंदर्य बघण्यासाठी आला आहात? असाच एक आरोप- ‘तुम्ही फार बोजड लिहितात, समजायला फार कठीण, भलेभले विचारवंतही हतबल होतात.’ त्यावर ते म्हणतात- ‘इतिहास, भुगोल हे विषय सोपे असतात, सायन्स कठीण! फिजिक्स, केमेस्ट्रीची पुस्तकं इतिहास-भुगोलच्या परीभाषेत कशी लिहिणार?’ असे अनेक व्यक्तीगत व कौटुंबिक प्रसंग सांगायचे म्हणजे अनेक खंडी कादंबरी लिहू शकणारा नव्या युगाचा नेमाडेच जन्मावा लागेल. यातील काही प्रसंग शपांची उंची वाढविणारे आहेत तर बरेचसे प्रसंग शपांची खरी उंची दाखविणारे आहेत. परंतू आज या विशेषांकाचा विषय नाही.
एक कार्यकर्ता म्हणून मला भावलेल्या त्यांच्या काही क्रांतिकारक सिद्धांतांची मला येथे चर्चा करायची आहे. हे सिद्धांत त्यांनीच प्रथमतः मांडले आहेत असे नाही तर आधीच्या महापुरुषांनी मांडलेल्या काही क्रांतीकारक सिद्धांतांना 180 डिग्री मध्ये वळवून त्यांना पायावर उभे करण्याचे काम शपांनी केले आहे. याचे श्रेय ते त्यांच्या बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीला देतात. ही अर्थातच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात केवळ नवी भर नाही तर नवे क्रांतीकारक वळण होय. जातीअंताच्या प्रश्नाला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या परीभाषेत उच्चतर स्थानावर नेऊन बसविणे, हे तसे सोपे काम नव्हते. आज काही विचारकांना ते सोपे वाटते. हे विचारवंत भारतीय जातिव्यवस्थेची पाळंमुळं शोधण्यासाठी आवश्यक असलेला प्राच्यविद्येचा कोणताही अभ्यास करण्याची तसदी न घेता, मार्क्सवादाचा ढोबळ वापर करून जातिअंताचे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतात व फसतात. त्यामुळे आपल्याच लोकांनी उभे केलेल्या प्रश्नांना फेस करतांना त्यांच्या तोंडालाच फेस येतो.
मार्क्सने ज्याप्रमाणे हेगेल व फायरबाखच्या तत्त्वज्ञानाला विकसित करून एक नवेच क्रांतिकारक तत्त्वज्ञान निर्माण केले, त्याप्रमाणे कॉ. शरद् पाटील यांनी मार्क्स, फुले, आंबेडकर यांची खिचडी तयार केली आहे, असे कुचेष्टेने म्हटले जात होते. त्यांच्या ‘वर्गजातस्त्रिदास्यअंतक’ तत्त्वज्ञानाचे खरे नाव ‘सौत्रांतिक मार्क्सवाद’ असे होते. तथापि त्यांनी त्याचे व्यवहारिकरण (सोपेकरण नव्हे) करण्यासाठी ‘मार्क्सवाद फुलेआंबेडकरवाद’ असे तात्पुरते नामकरण केले होते. फुलेआंबेडकरांचे नाव घेतले म्हणजे जातिअंताची क्रांती करणारी दलित-ओबीसी फौज स्वनिर्मित नवे तत्तवज्ञान घेऊन क्रांती करेल असा त्यांचा अंदाज होता. माफुआचे धोरण घेऊन जातीअंताची सैन्य उभारण्यात त्यांना किती यश आले हे आपण पहातच आहोत. परंतू त्यात त्यांना यश प्राप्त झाले असते तरी त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचे नामांतर ठराविक काळानंतर ‘सौत्रांतिक मार्क्सवाद’ असे केलेच असते जे त्यांनी ठरवल्याप्रमाणे केलेलेच आहे.
माफुआ नामांतरित सौत्रांतिक मार्क्सवाद (सौमा) हे तत्त्वज्ञान अजून प्रत्यक्ष संघटन व संघर्षाच्या पातळीवर प्रभावी ठरलेले नसले तरी त्याने निर्माण केलेल्या किंवा वापरात आणलेल्या शब्द-संकल्पना आज चळवळीवर प्रभाव गाजावित आहेत. माफुआ, वर्गजातस्त्रिदास्यअंत, ब्राह्मणी-अब्राह्मणी, संगिती आदि शब्द शपांची टिंगलटवाळी करण्यासाठी सर्रास वापरले जात होते, आता या संकल्पना चळवळीत गंभीरपणे वापरल्या जात आहेत. ही यशाची पहिली पायरी मानली पाहीजे. आज ‘परीवर्तनाचा वाटसरू’ सारख्या वैचारिक-तात्त्विक मान्यताप्राप्त मासिकाने शपांवर विशेषांक काढावा, हा केवळ शपांचा गौरव नव्हे तर त्यांनी मांडलेल्या सौत्रांतिक मार्क्सवादाचाही गौरव आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात जातिव्यवस्थेचा प्रश्न अधिकच तिव्रतर होत असतांना त्याची दखल क्रांतिकारक म्हणविणार्‍या मार्क्सवाद्यांनी व समाजवाद्यांनी त्याकडे  अक्षम्य दुर्लक्ष्य केलं. त्यामुळे जातिअंताचे लढे जातसंघटनांच्या बॅनरखाली लढले जाऊ लागले. रिडल्स, नामांतर, मंडल आयोग ही त्याची उदाहरणे होत. त्यामुळे जातसंघटनांना पुरोगामित्व लाभत गेले व त्यांचे उदात्तिकरण होऊ लागले. हे लढे जातीअंतक म्हणून क्रांतिकारक असूनही सत्ताधार्‍यांना लाभदायक ठरत होते. या लढ्यांतून निर्माण झालेले नेतृत्व प्रस्थापित-सत्ताधार्‍यांशी संघर्ष करीत मोठे झालेले दिसत असले तरी ते प्रत्यक्षात सत्ताधार्‍यांनीच ‘लॉंच’ केलेले नेतृत्व होते की काय अशी शंका घ्यायला जागा राहते. कारण हे नेतृत्व सहज व बेमालूमपणे प्रतिक्रांतीकारकांच्या छावणीत जाते. आणि मजेची गोष्ट म्हणजे ते प्रतिक्रांतिकारकांच्या छावणीत असूनही त्यांच्या कपाळावरचा पुरोगामित्वाचा शिक्का पुसण्याची कोणी हिम्मत करू शकत नाही. कधी पुलोआ, तर कधी डालोआ च्या नावाने डावे या नेत्यांशी युती करण्यासाठी उत्सुक असतात.
मंडल आयोगाचा लढा तर जातीव्यवस्थेच्या पेकटात निर्णायकपणे लाथ हाणणारा लढा होता. आजही तो तेवढ्याच क्रांतीकाराक मार्गाने लढला जाऊ शकतो. या लढ्याचे क्रांतीकारक पोटेन्शियल पाहता सर्वच प्रतिक्रांतीकारक पक्ष-संघटनांनी 1985 पासूनच आपापले ‘ओबीसी नेते’ लॉंच करायला सुरूवात केली. ज्या पक्षांकडे लॉंच करण्यासाठी ओबीसी नेते नव्हते त्यांनी मंडल आयोग लागू होताच दुसर्‍या पक्षाकडून ते आयात केले. प्रत्येक जातीलढ्याचा लाभ अंतिमतः प्रस्थापित छावणीलाच का होतो, याचे आत्मपरिक्षण करण्याची तसदी डाव्यांनी कधीच घेतली नाही व आजही ते घेत नाहीत. जातीचा प्रश्न सत्तरीनंतर तीव्र व्हायला लागला. नेमका याच काळापासून शपांचा ‘वर्गजातस्त्रिदास्यअंतक’ माफुआ आकार घेत होता. हा काही योगायोग नव्हता, काळाची गरज म्हणून ती काळाचीच निपज होती, एव्हढेही डायलेक्टिक्स-ज्ञान भारतीय मार्क्सवाद्यांकडे नसेल तर ते कसली क्रांति येथे करणार आहेत?   विशेष महत्वाची बाब ही की, कट्टर वर्गीय सनातनवाद जोपासणार्‍या सीपीएमच्या गर्भातच हे जातिअंताचे तत्त्वज्ञान जन्म घेत होते. सीपीएमने त्याचे नैसर्गीक बाळंतपण नाकारल्यामुळे माफुआला पोट फाडूनच बाहेर यावे लागले. कालचे हे अर्भक आज सौत्रांतिक मार्क्सवादाच्या रूपाने तरणेताठे झाले आहे, जातीव्यवस्थेचा प्रश्न जसजसा तीव्र होत जाईल, तसतसा या तत्त्वज्ञानाला मान्यता मिळत जाईल.
माझ्या दृष्टिने संघर्षाच्या व्यवहारिक पातळीवरचा माफुआचा सर्वात महत्वाचा सिद्धांत हा – ‘वर्गीय संघटनांच्या माध्यमातूनच जातीलढा’! पद्मभूषण कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जातीय पायावरच्या वर्गीय लढ्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वर्गीय पायावरच्या जातीलढ्याचाच पर्याय शिल्लक होता, जो शपांनी शास्त्रशूद्ध पद्धतीने मांडलेला होता.


'योध्‍दा' संशोधक!
दिनेश पाटील|Mar 23, 2014, 06:40AM IST

इतिहास मरत नसतो; चुकीच्या आकलनातून तो प्रेरक न बनता बाधक बनतो, ही भूमिका घेऊन भारताच्या इतिहासाची युगप्रवर्तक पुनर्मांडणी करणा-या कॉम्रेड शरद पाटील यांना अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदेचा पहिला वा. सी. बेंद्रे (बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखनाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखनात विकसित केला.) पुरस्कार जाहीर झाला. ही महत्त्वाची घटना आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला अ‍ॅकॅडेमिक मान्यता मिळत आहे. गेली 40 वर्षे एक जीवनदायी कार्यकर्ताम्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रांत अखंडपणे कार्यरत असणा-या शरद पाटलांना अवहेलना, द्वेष आणि मानहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक जैविक विचारवंतही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.

बडोद्याचे जागृतिकार भगवंतराव पाळेकर नात्याने आजोबा, तर वडील धुळे जिल्ह्यातील पहिल्या पिढीतील सत्यशोधक होते. यामुळे घरातच सत्यशोधकी विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. 1964-65च्या चीन युद्धादरम्यान तीन वर्षे स्थानबद्धतेत तुरुंगात असताना त्यांनी मार्क्सचा कॅपिटलहा महाग्रंथ समजून घेतला. या ग्रंथाच्या दुस-या खंडातील मार्क्सने सोडविलेले एक गणित चुकीचे असल्याचे त्यांनी कॉ. बी. टी. रणदिवेंना पत्राने कळवले. मार्क्स चुकला आहे, इतक्या खोलवर विचार कुणी केला नाही’, असे उत्तर आले. मार्क्सही चुकू शकतो, हे सांगत त्यांनी मार्क्सभक्तीचे झापड बाजूला सारले. भारतीय समाज आणि इतिहास हा फक्त मार्क्सच्या मदतीने समजून घेता येणार नाही, याची खात्री पटल्याने त्यांनी स्वतंत्र लेखन करण्याचे ठरवले. यासाठी वैदिक वाङ्मय मुळातून वाचायचे आणि त्यासाठी वैदिक संस्कृत शिकायचे, या हेतूने 1966मध्ये ते बडोद्याला गेले. इतिहास हा नेहमीच सांस्कृतिक राजकारणातील महत्त्वाचे शस्त्र म्हणून पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन्ही गटांकडून वापरला जाणार; परंतु अँतोनिओ ग्रामसी ज्यांना वंचितम्हणतो, त्या सर्वहारांचा सशक्त इतिहास भक्कम पुराव्यांच्या आधारे पुढे आणून सांस्कृतिक राजकारणाची लढाई लढण्यासाठी आवश्यक सांस्कृतिक भांडवलशरद पाटलांच्या इतिहास संशोधनातून सर्वहारांकडे उपलब्ध आहे. म्हणून शरद पाटील नेहमी म्हणतात, ‘मी समतावादी समाजाच्या उभारणीचे शस्त्रागार तयार केले आहे, त्याचा वापर नव्या पिढीने करावा.शरद पाटलांनी इतिहासाला काय योगदान दिले, याचे उत्तर असे की, त्यांनी इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी आवश्यक नव्या संकल्पना, अन्वेषणशास्त्र आणि माफुआ ते सौतांत्रिक भौतिकवाद असे सैद्धांतिक योगदान दिले. राम आणि कृष्ण यांची भारताच्या इतिहासातील भूमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्यांचे ऐतिहासिक महत्त्व, असे अनेक मूलभूत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फुले-आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुधा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षांचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. 1957 ते 1971 अशी 14 वर्षे संशोधन करून दासशूद्रांची गुलामगिरीहा बुद्धकाळापर्यंतचा इतिहास ग्रंथ त्यांनी लिहिला. जातिव्यवस्था व सामंती सेवकत्वहा तुर्काच्या काळापर्यंतचा इतिहास लिहिला. दिग्नाग स्कूलचे सौतांत्रिक विज्ञानवाद व अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र ही जाती व्यवस्थान्तक संघर्षाची अन्वेषण पद्धती   वापरून जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्तीहा ग्रंथ प्रकाशित केला. तर, या महाप्रकल्पातील शेवटचा खंड निऋती व हरिती यांची स्त्री राज्य ते भारताचा समाजवादप्रसिद्धीच्या मार्गावर आहे. शिवाजी-संभाजीची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, या चिकित्सेतून शिवाजी-संभाजीच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. पाटलांनी त्यांच्या शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण-महंमदी की ब्राह्मणी?’ या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषण पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले.

या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्‍ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर  कडवे आव्हान उभे केले. महाराष्‍ट्राची अस्मिता असणा-या शिवाजीच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. त्याचप्रमाणे महाराष्‍ट्राच्या परिवर्तनवादी चळवळींची चिकित्सा करताना ते म्हणतात, ‘महाराष्‍ट्रात ब्राह्मणेत्तर चळवळीत पुढाकार घेणा-या कुणबी जातींनी, जातिव्यवस्था विरोधाला तिलांजली देऊन राष्‍ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि प्रमुख अस्पृश्य जात, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जातिव्यवस्था विरोधार्थ स्वतंत्रपणे संघटित झाल्यामुळे कुणबी जात व ही अस्पृश्य जात यांची विरोधी एकजूट पुन्हा वैमन्यसभावी बनली.त्यांचा हा निष्कर्ष आज परिवर्तनवादी चळवळी क्षीण का होत आहेत, याचे उत्तर देतो. याबरोबरच अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्रया ग्रंथाने संस्कृतीतील सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भांत अधोरेखित केले. मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत ग्रामीण दलित आदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी वर्गजातिस्त्रीदास्यांताच्या लढ्यांना अग्रक्रमाने समजावून घेत माफुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकूणच भारतीय इतिहास याकडे पारंपरिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी दृष्टीने पाहिले. याचे कारण असे, की फक्त मार्क्सवाद, फुलेवाद किंवा आंबेडकरवाद हे दृष्टिकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादही अन्वेषण पद्धती अधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषण पद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात. संस्कृत, प्राच्यविद्या आणि तत्त्वज्ञान या तिन्ही शाखांचा व्यासंग आणि सर्वहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशोधकाची दृष्टी अधिक व्यापक, मूलगामी झाली आहे. त्यांच्या मते, ‘बुद्धाचा धम्म वर्ण व्यवस्था अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक होता. पण आंबेडकरांनी त्याला सर्व विषमता अंताच्या संदर्भांत क्रांतिकारक मानला.शरद पाटलांचा हा सिद्धांत समकालीन दलित चळवळींच्या संदर्भांत तपासला असता, दलित चळवळ जातीअंताचा प्रश्न आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे हाताळण्यामध्ये का अपयशी ठरत आहे, याचे उत्तर मिळते. त्याचप्रमाणे धर्मांतराने जातीअंताचा प्रश्न सोडवण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न अपुरा का ठरला, या प्रश्नाचे आकलन होते. जातहा घटक केंद्रस्थानी ठेवून आधुनिक भारताचे जे इतिहासलेखन शरद पाटील यांनी केले आहे, त्यातून अनेक नवीन तपशील व अन्वयार्थ पुढे येतात. शरद पाटील लिहितात की, ‘फुले या शूद्राने व आंबेडकर या अतिशूद्राने व्यक्तिस्वातंत्र्याचा निकराने पाठपुरावा केला, याचे कारण जात्यन्ताची चळवळ व्यक्तिस्वातंत्र्याशिवाय प्राप्त होऊ शकत नव्हती. फुले-आंबेडकरांनी म्हणून जात्यन्तानंतरच्या स्वातंत्र्याला राष्‍ट्रीय स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ मानले.अशा प्रकारे फुले आणि आंबेडकरांचा अग्रक्रम हा जात्यन्तक स्वातंत्र्याला होता, हे पाटील स्पष्टपणे नोंदवतात. आपण दासशूद्रांची गुलामगिरीया ग्रंथाचे लेखन विधायक अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीने केले आहे, असे सांगून पाटील म्हणतात की, अब्राह्मणी अन्वेषण पद्धतीचे जनक फुले असून तिचा विकास आंबेडकरांनी केला. माफुआ ही अन्वेषणपद्धती घेऊन शरद पाटील यांनी आधुनिक भारतातील इतिहासाच्या आकलनात महत्त्वाची भर घातली आहे. जात हा स्वातंत्र्यलढासमजावून घेण्याचा महत्त्वाचा निकष आहे, असे मानून त्यांनी वासाहतिक काळाचे विश्लेषण केले आहे. शरद पाटील म्हणतात, ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा बाह्यसंघर्ष ब्रिटिश साम्राज्यशाही व हिंदी उच्चजातीय-वर्गीय राष्‍ट्रवादी, यांच्या नेतृत्वाखालील हिंदी जनता यांच्यातला असला, तरी आंतरिक संघर्ष उच्चजातीय, वर्गीय, राष्‍ट्रवादी व शुद्रातिशूद्र जातीय-वर्गीय, जात्यन्तवादी यांच्यातला होता.आज महाराष्‍ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीत विविध ठिकाणी कार्यरत असणारे असंख्य कार्यकर्ते तसेच लेखक-विचारवंतांचा फार मोठा समूह असा आहे, जो त्यांचे लेखन वाचून, त्यांच्या अभ्यासवर्गातून, त्यांच्या चळवळीतून किंवा त्यांची व्याख्याने ऐकून घडला आहे. त्यांच्यामध्ये भारतीय लोकशाही क्रांतीचे स्वप्न रुजविण्याचे श्रेय कॉम्रेड शरद पाटील यांचे आहे.





क्रांतिकारी विचारवंत (अग्रलेख)
दिव्य मराठी|Apr 14, 2014, 04:00AM IST


सत्यशोधक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, इतिहासाचे साक्षेपी संशोधक, क्रांतिकारी विचारवंत, प्राच्यविद्यापंडित अशी अनेक नामाभिधानं  ज्यांच्या नावाआधी लावली जात होती ते कॉम्रेड शरद पाटील वयाच्या नव्वदाव्या वर्षी शनिवारी हा इहलोक सोडून गेले. गेली काही वर्षे नेहमीच आजारी राहत आलेले कॉम्रेड अनेकदा मृत्यूच्या दारातून परतलेही होते. काही दिवसांपूर्वीच धुळ्यात त्यांच्या मेंदूवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यातूनही ते बाहेर आले होते. त्याच काळात त्यांना अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला बा. सी. बेंद्रे इतिहासकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण कोणापुढेही हार न मानणार्‍या या सत्यशोधकाला अखेर मृत्यूपुढे हार पत्करावी लागली. कॉम्रेड शरद पाटील हाच एक आता इतिहास झाला आहे. हा इतिहास मात्र सर्वसाधारण इतिहास नाही. हा वैचारिक क्रांतीच्या मशालीचा धगधगता इतिहास आहे. जगभरातल्या सर्वच तत्त्ववेत्यांना अचंबित करणारा देदीप्यमान इतिहास आहे आणि जातिअंताच्या लढ्याचा काळ्या दगडावरच्या रेषेचा न पुसता येणारा इतिहास आहे. धुळे जिल्ह्यातल्या कापडणे या क्रांतिकारकांच्या गावचा वारसा लाभलेल्या या वैचारिक क्रांतिकारकाने तत्त्ववेत्यांचे सर्व परंपरागत मार्ग उखडून टाकले होते.

जगातल्या प्रमुख वादांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करून त्यांनी आपला स्वत:चा असा एक वादजगाला दिला आहे; पण जगाच्याच काय, राष्ट्रीय पातळीवरही या माणसाच्या पारड्यात त्याच्या त्या मोठेपणाचं योग्य माप पडलं नाही, याची खंत त्यांच्या अनुयायांना नक्कीच वाटत राहणार आहे. कॉम्रेड शरद पाटलांच्या हयातीत आणि त्यांच्या उमेदीत अनेक वैचारिक वाद आणि तंटे त्यांनी ओढवून घेतले होते. अर्थात, सत्याच्या शोधाची जिद्द आणि सापडलेले सत्य प्रभावीपणे मांडण्याचा, ते पटवून देण्याचा आग्रह यातून हे वैचारिक तंटे उभे राहिले होते. अशा वादात आणि सत्य-असत्याच्या मांडणीत त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. ज्या मार्क्सच्या वैचारिक प्रभावाखाली येऊन त्यांनी आयुष्यभर तो विचार अंगीकारला, त्याच मार्क्सच्या दास कॅपिटलया ग्रंथातील उणिवा दाखवून द्यायलाही ते कचरले नाहीत. त्या संदर्भातल्या त्यांच्या विश्लेषणामुळे अनेक दिग्गज मार्क्सभक्तांना धक्का बसला होता. त्यांच्या टीकेचे धनी त्यामुळे शरद पाटलांना व्हावे लागले होते. अर्थात, टीका आणि वादांना कचरतील ते कॉम्रेड शरद पाटील कसले! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव नंबुद्रीपाद यांना त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाच्या बाबतीत माझा अधिकार तुमच्यापेक्षा मोठा आहेअसे सुनवायलाही कमी केले नव्हते. मार्क्सवादी जातिअंताची लढाई लढायला नाही म्हणतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाच फारकत दिली आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. यालाच ते सौत्रांतिक कम्युनिस्ट पक्ष म्हणत असत, असं त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात.

या पक्षाचा विस्तार किती झाला, यापेक्षा त्याची सैद्धांतिक बैठक काय होती, हे अधिक महत्त्वाचे आहे. वर्गवाद आणि जातीयवादाचा अंत झाल्याशिवाय दासशूद्रांची आणि महिलांची खर्‍या अर्थाने गुलामगिरीतून सुटका होणार नाही, हे ते ठामपणे सांगत होते. हे सांगण्यासाठीच त्यांनी रामायणाची आणि महाभारताचीही कठोर चिकित्सा केली होती. हे दोन्ही ग्रंथ वर्णसंघर्षावर आधारित आहेत असं त्यांचं प्रतिपादन होतं आणि त्यासाठी त्यांनी याच दोन्ही ग्रंथांतील अनेक दाखलेही दिले होते. केवळ रामायण, महाभारतच नाही तर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या शत्रूंनाही उघडे पाडण्याचे काम त्यांनी ग्रंथांतून आणि भाषणांतून आयुष्यभर केले. ते ब्राह्मणांचे नव्हे, ब्राह्मण्याचे शत्रू होते आणि म्हणूनच ब्राह्मण्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. समाजसुधारणेत शाहू महाराजांना ते आदर्श मानत असत आणि इतर कोणत्याही राजाच्या तुलनेत शाहू महाराजच श्रेष्ठ कसे होते हेही ठामपणे सांगत. पूर्वीच्या धुळे आणि आताच्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी आदिवासींसाठी काम सुरू केले होते. ते करताना त्यांना अनेक वादांना आणि हल्ल्यांनाही तोंड द्यावं लागलं; पण म्हणून त्यांनी माघार कधी घेतली नाही. जे करायचं ते मनापासून आणि मुळापासून, हा त्यांचा स्थायीभाव होता. म्हणूनच इयत्ता सहावीत शिकत असताना त्यांनी  शेक्सपिअर वाचून काढला होता. वेदांचा आणि त्यासाठी संस्कृत भाषेचाही त्यांनी ऐन किशोरवयात अभ्यास केला होता.

त्या अभ्यासातून त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आला होता आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरच ते आपल्या मतांवर ठाम राहत होते. हा संस्कार त्यांच्यावर शालेय शिक्षकांनी केला आणि त्यामुळेच आपल्या जीवनावर त्यांचा मोठा प्रभाव पडला, असं ते सहज मान्य करीत असत. सत्यशोधनाचा संस्कार त्यांच्या वडिलांनी केला. वडील सत्यशोधक चळवळीत तर आई बडोद्यात शिकलेली. त्यामुळे आपल्याला बुद्धिप्रामाण्याचे बाळकडू घरातच मिळाले, असेही त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आपल्या तत्त्वांशी घट्ट चिकटून राहण्याच्या संस्कारांमुळे आईच्या अंत्यसंस्कारालाही ते गेले नाहीत. कारण त्यासाठी त्यांना तुरुंगातून जामीन मागावा लागणार होता. नामांतर चळवळीत त्यांना अटक झाली होती आणि जामीन मागायचा नाही असा निर्णय नामांतरवाद्यांनी घेतला होता. त्या निर्णयापासून ते इतक्या दु:खातही ढळले नाहीत याचा त्यांच्या अनुयायांवरच नाही तर एकूणच कम्युनिस्ट चळवळीवर मोठा प्रभाव पडला होता; पण तो प्रभाव आदर आणि कुतूहलापुरताच मर्यादित राहिला आहे. त्यांच्या पासंगाला पुरेल असा एकही अनुयायी आज त्यांच्या पश्चात दिसत नाही, ही या जिवंत दंतकथेची शोकांतिका आहे.



एका कॉम्रेडची साद ...
Published: Monday, April 14, 2014

'आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे' या समर्थवचनाचा विसर न पडू देता कॉ. शरद् पाटील यांचे लिखाण वाचले पाहिजे. पाटील हे आंबेडकरविरोधी होते की ब्राह्मणविरोधी की मार्क्सयविरोधी, यापेक्षा ते जात्यंतक प्रबोधनवादी होते, हे महत्त्वाचे ठरावे..

आपल्याकडे विचारवंतांनी वैचारिक ऊर्जेच्या निर्मितीत कसूर ठेवलेली नाही; परंतु या वैचारिक ऊर्जेचा प्रसार मात्र एखाद्याच व्यक्तिकेंद्री, पंथवादी संघटनेपुरता मर्यादित राहिल्याची खंत उरते किंवा त्या वैचारिक ऊर्जेवर भलत्याच लोकांनी आपापले आकडे टाकून तिचा गैरवापर केल्याचे चित्र दिसते. हे असे महाराष्ट्रात वारंवार घडल्याने यातून विचारवंताचा पराभव झाला असे मानायचे का यावरील खलच अधिक वाढत जातो. असा खल करणारे हास्यास्पद ठरतात. याचे कारण असे की, विचारवंताच्या हयातीसोबत जणू सारे संपलेच, असे गृहीत या व्यर्थ चर्चामागे असते. यातून उघड होते ती चर्चा करणाऱ्यांची पराभूत मानसिकता. प्राच्यविद्यापंडित आणि सत्यशोधक मार्क्सीवादी पक्षाचे संस्थापक कॉम्रेड शरद् पाटील यांच्या निधनानंतर जी चर्चा होईल, ती तरी अशी होऊ नये. उलट, पाटील यांच्या निधनानंतर 'श्रद्धेच्या ओंजळी' वाहून मोकळे होण्यापेक्षा त्यांच्या वैचारिक मांडणीची आणि या विचारांच्या प्रसार-अपप्रसाराची चर्चा करण्यात मराठीजनांना रस आहे, हे महत्त्वाचे मानले जावे. परंतु तसे होणार नाही. शरद् पाटील यांचे लिखाण आम्ही वाचलेच नाही असे सांगणारे भरपूर आणि पाटील यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या सातपैकी दोन-तीन पुस्तके वाचूनसुद्धा पाटील यांच्यावर बुद्धविरोधी, ब्राह्मणविरोधी, मार्क्सतविरोधी, आंबेडकरविरोधी, असा कोणताही एक शिक्का मारण्यास उत्सुक असलेलेही कमी नाहीत. त्यामुळेच पाटील यांच्या निधनानंतर तरी त्यांना समजून घेतले जावे, ही अपेक्षा मुद्दामहून मांडावी लागते. भारतीय इतिहासाचे अधिक मूलगामी अर्थ लावण्याची कॉ. पाटील यांची तळमळ त्यांना दामोदर धर्मानंद कोसंबी किंवा लोकायतकार देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या पंक्तीत नेऊन बसविणारी आहे. त्यामुळे पाटील हे केवळ महाराष्ट्राचे ठरत नाहीत. परंतु चट्टोपाध्याय किंवा कोसंबी यांच्याहीपेक्षा एका भाषक समाजाची- महाराष्ट्रीय समाजाच्या ताण्याबाण्यांची जाण संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील एक सैनिक, एक मार्क्सषवादी कार्यकर्ता आणि पुढे इतिहासतज्ज्ञ- विचारवंत अशी ओळख असलेल्या पाटील यांना होती. हे प्रादेशिकत्व मोलाचेच आहे.

कम्युनिस्ट पक्षातील १९६४च्या फुटीपूर्वीपासून पाटील त्या पक्षात होते. त्यापुढील १४ वर्षे मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्षात राहून अखेर १९७८च्या ऑक्टोबरात त्यांनी स्वत:च्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. भाजपच्या एका स्थानिक नेत्याने या पक्षाची संभावना 'दोन तालुक्यांपुरता पक्ष' अशी केली होती. परंतु हा पक्ष फारसा सत्ताकांक्षी नव्हताच आणि त्याचे नेते शरद् पाटील हेदेखील रूढार्थाने नेते नसून विचारवंतच होते. कम्युनिस्टांनी भारतीय समाजाचे वर्ण-जाती संदर्भ जसे समजून घ्यावयास हवे होते तसे कधीच घेतले नाहीत, या घुसमटीची पराकोटी म्हणजे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष. हे संदर्भ समजण्यासाठी, इतिहासातील एकेका घटनेचे खरेखोटेपण तपासण्यात धन्यता मानण्याऐवजी इतिहासाची सामाजिक, राजकीय आदी अंगे तपासून त्यांचा अन्वयार्थ लावण्यावर पाटील यांनी भर दिला. अन्वयार्थ का लावायचा, याबद्दल कॉ. पाटील यांची दृष्टी स्वच्छ होती. जे दिसते ते क्षणिक सत्य असू शकते, त्यामुळे नेणिवेच्या पातळीवर जे समजते त्याचा व दिसणाऱ्या सत्याचा एकत्रितच विचार केला पाहिजे, ही शिकवण त्यांनी सुमारे साडेचौदाशे वर्षांपूर्वीचा बौद्ध दार्शनिक दिग्नाग याच्याकडून घेतली. दिग्नागाचे हे सौत्रांतिक दर्शन पाटील यांनी समाजकेंद्री प्राच्यविद्या व सामाजिक इतिहासलेखनातील एक प्रमाणशास्त्र किंवा एपिस्टेमॉलॉजी म्हणून विकसित केले. पाटील यांच्याशी अनेकांचे, अनेक विषयांबाबत वाद झाले, ते याच प्रमाणशास्त्रामुळे. पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षालाच सौत्रांतिक प्रमाणशास्त्रातून आलेल्या संशोधनपर अन्वयार्थाची बैठक दिली. त्याआधी मार्क्स वादाला फुले, आंबेडकरवादाची जोड द्यायला हवी असे ते म्हणत होते. हा त्यांचा मार्क्सु-फुले-आंबेडकर (माफुआं)वाद. मात्र उत्तरायुष्यात, माफुआंवादाच्याही मर्यादा जाणवल्याने आपण सौत्रांतिक समाजवादाची मांडणी करीत आहोत असे पाटील म्हणाले आणि त्यांच्या विरोधकांत भरच पडली. सौत्रांतिक समाजवादी मांडणीतील कच्च्या दुव्यांची चर्चा यापुढेही होत राहील; परंतु पाटील यांचे वाद झडले ते या मांडणीतून कुणाचे तरी महत्त्व नाकारले जाते म्हणून. स्त्रीसत्ताक गणसमाज हा 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम'चा पाया आहे, असे पाटील म्हणाल्याने एकाच वेळी नवबौद्ध आणि कम्युनिस्ट, दोघांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. शिवाजी महाराजांनी छत्रपती होण्यापूर्वी -राज्याभिषेकापूर्वी- केलेला आंतरजातीय विवाह हा खरे तर शाक्तपंथाचा दीक्षाविधी होता, शिवरायांच्या किल्ल्यांवर सर्व जातीजमातींचे लोक असणे हे केवळ वैचारिक उदारतेचे लक्षण नसून प्रचलित (ब्राह्मणी) सामाजिक उतरंडीशी जाणीवपूर्वक केलेला तो संघर्ष होता, असे अन्वयार्थही पाटील यांनी मांडले.


यापैकी सोयीचे तेवढेच त्या-त्या अनुयायांनी किंवा अस्मितावाद्यांनी स्वीकारले. एरवी, पाटील यांचे अन्वयार्थ गैरसोयीचे वाटावेत आणि म्हणून त्यांच्यावर टीका व्हावी हाच क्रम सुरू राहिला होता. पाटील यांच्या या मांडणीमागची जात्यंताची कळकळ समजून घेण्याची तसदी यापुढे तरी घेणे आवश्यक आहे. हयात असताना पाटील यांचे सहा फुटी करारी व्यक्तिमत्त्व, अनेक संकल्पनाव्यूहांचे त्यांना असलेले अंतर्बाह्य़ आकलन, शब्दांवरील त्यांचे प्रभुत्व आणि एवढे असूनही वादांमध्ये स्वत:ची बाजू मांडताना विरोधकाच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्षही करण्याची त्यांची हातोटी, आदी वैशिष्टय़ांमुळे पाटील यांचे आव्हानच मोठे होते आणि ते स्वीकारण्याच्या ऊर्मीपायी अनेकांनी त्यांच्याशी वाद घातले. आता पाटील नाहीत, त्यामुळे अशा वादांतील लौकिक हारजितीचा मुद्दा संपुष्टात आला आहे. पाटील यांची बाजू विरोधकांनीही आधी समग्रपणे समजून घ्यावी यासाठी हे कारण पुरेसे आहे.
अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र हा पाटील यांचा ग्रंथ हे लेखसंकलन आहे. कोसला ही कादंबरी, उत्सव हा चित्रपट, हयवदन हे नाटक अशा गाजलेल्या कलाकृतींवर पाटील यांनी लिहिलेले लेख या संग्रहात आहेत. प्राध्यापकी थाटा-घाटात घुटमळत राहिलेली मराठी समीक्षा वाचण्याचा कंटाळा कुणालाही येतो, तसे या संग्रहाचे होत नाही. वैचारिक साधने दूरची असोत वा जवळची, इतिहासातील असोत वा आत्ताची, त्यांची सांगड घालणारा विचारव्यूह या लिखाणाने रचला आहे. आपण पाहातो कसे, आपल्याला साहित्याकडून काय हवे असते आणि आपल्या सौंदर्यकल्पना आज जशा आहेत त्या तशाच का आहेत, हे प्रश्न वाचकाला या पुस्तकातून पडतात आणि तो सुजाण होतो. भारतीय समाज कसा घडला, मातृसत्ताक व्यवस्थेपासून ते मुसलमानी आक्रमणांच्या आधीपर्यंतच्या बहुधर्मीय भारतीय समाजाचे पितृसत्ताक जाती-वर्णामध्ये कसे होत गेले, वर्ण आणि वर्ग हे भारतीय संदर्भात एकच मानावेत काय आणि जातिअंताच्या सांघिक कृतींचा पराभव भारतीय समाजाने कसकसा केला, अशा अनेक प्रश्नांपर्यंत पाटील यांच्या अन्य पुस्तकांचे वाचक जातात, यापुढेही गेले पाहिजेत. त्या प्रश्नांची उत्तरे पाटील यांच्या साथीने शोधायची तर आपापले राजकारण, आपापल्या अस्मिता हे जरा बाजूला ठेवावे लागेल. परंतु मराठीजनांची स्थिती अशी झालेली आहे की अब्राह्मणी हा शब्द आला रे आला की हे काही तरी ब्राह्मणविरोधी असणार, अशा वैचारिक भिंती तयार होतात. 'आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे' या समर्थवचनाचा विसर अशा वेळी पडतो आणि आपणच जपत असलेल्या दुहीचे आपल्याला काही वाटेनासे होते, असा आजचा काळ आहे. या दुहीमुळे कॉ. शरद् पाटील यांच्या लेखनातील सत्त्वाकडे त्यांच्या हयातीतही लोकांनी सर्वस्तरीय दुर्लक्ष केले.

यापुढेही हे दुर्लक्ष सुरूच राहण्याचा धोका आहे. शिवाजी-संभाजीचा शाक्तपंथ सांगणारे पाटील एका जातीला नको असतील, तर कम्युनिस्टांचा ब्राह्मणीपणा उघड करू पाहणारे पाटील आणखी एका जातीला. तरीही आपण  जातवादी नाही, हे सांगण्यास सारे तयारच. अशा कठीण काळातही पुस्तकरूपाने शरद् पाटलांसारखा कॉम्रेड -साथी, सहकारी, सहप्रवासी- आपल्या वैचारिक प्रवासाला सत्यशोधनाची साद घालत राहणार आहे. ती आपण ऐकायला हवी.