Sunday 30 June 2013

जातीयवादी मेंदूतील ‘श्रीमंत’ हागणदारी


      जेम्स लेन प्रकरणानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मण मंडळी सुधारली असे म्हणणे धाडसाचे ठरावे एवढे सारे शिवछत्रपतींना बदनाम करण्याचे नीच प्रयत्न चालूच आहेत. इ टीव्ही मराठी वर चालू असलेल्या ‘कोण होईल मराठी करोडपती’ या मालिकेत मराठी अमिताभ सचिन खेडेकर संचलन करताना दाखवला आहे. परंतु मराठी माणसांना करोडपती बनवण्याचे लालूच दाखवत असताना करोडे मराठी मनांवर राज्य करणाऱ्या शिवछत्रपतींची ‘राजे’ ही उपाधी या कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या संगणकाला देऊ केली आहे. सकृत दर्शनी यात कुणालाही काही गैर वाटणार नाही म्हणूनच तर कदाचित ही मालिका सुरु होऊन एवढे दिवस झालेले असतानाही आजतागायत या कार्यक्रमाचा कुणी निषेध केल्याचे आढळून आलेले नाही. परंतु लक्षपूर्वक पाहिल्यास कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सचिन खेडेकर त्या संगणकाला आदेश देत असतो. उदा. राजे हे उत्तर लॉक करा, राजे यांच्या मित्राला फोन करा, राजे हे करा ते करा वगैरे वगैरे. म्हणजे एक प्रकारे हा सचिन खेडेकर संगणकाच्या आडून खुद्द राजेंनाच आदेश देऊन कामाला लावताना दिसून येत आहे. मराठी माणसांना करोडपती होण्याचे आमिष दाखवून खुद्द राजेंना रोडपती बनवण्याचे नीच कारस्थान इ. टीव्ही वाल्यांकडून चालू आहे. यावर उद्या तीव्र आंदोलन झाल्यास हे चानेलवाले ती उपाधी शिवाजी राजांची नाही असेच म्हणतील परंतु राजे ही उपाधी महाराष्ट्रात कुणाच्या संदर्भात वापरली जाते हे अवघ्या जगाला ठाऊक आहे आणि जरी इ टीव्ही वाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे राजे ही उपाधी शिवाजी महाराज म्हणून घेतली नसेलही तरी पण राजे या उपाधी धारक व्यक्ती अथवा वस्तूला कुणी आज्ञा देत नाही हे तरी साधे तर्कशास्त्र आहे ना? राजे हे आज्ञा देण्याचे काम करतात ते कुणाकडून आज्ञा स्वीकारत नाहीत. या सगळ्या प्रकारातून जातीयवादाचा वास येण्याचे कारण म्हणजे जर संगणकाला काहीही नाव द्यायचे असले असते तर इ. टीव्ही वाल्यांनी ‘पंत’ , ‘श्रीमंत’ अशी त्यांच्या खाजगी ठेवणीतील खास नावे का दिली नाहीत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

      एकीकडे राजेंना सांगकाम्या बनवण्याचे षड्यंत्र चालू असताना औरंगाबादेत शिवरायांच्या सर्वोच्च अशा ‘छत्रपती’ या पदवीसमोर त्यांचे नोकर असणाऱ्या पेशव्यांची ‘श्रीमंत’ ही पदवी देऊन खुद्द छत्रपतींना नोकर पेशव्यांच्या पंगतीत आणून बसवण्याचे कारस्थान दै. लोकपत्र ने सप्रमाण उघडकीस आणले आहे. औरंगाबाद शहर हे एक ऐतिहासिक व झपाट्याने वाढणारे असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकाच्या व शहरातील नागरिकांच्या मनोरंजनाकरिता विविध प्रकल्प महानगर पालिकेने राबविले आहेत. शहराला वेरूळ आणि अजिंठा लेण्याच्या स्वरूपात ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वेरूळ हे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे मूळ गाव असल्यामुळेही या शहराला आगळे वेगळे महत्व आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराला भेट देणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पर्यटकांच्या या शहरामध्ये महानगरपालिकेने १९९१-१९९२ साली तीन विविध प्रकारचे संग्रहालय व संशोधन केंद्र उभारण्याचे ठरवले होते. त्यापैकी ‘छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय’ हे एक होय. छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम मार्च १९९६ मध्ये सुरु करण्यात आले असून मार्च १९९८ पर्यंत पूर्ण झाले आहे. औरंगाबादेतील व्ही.आय.पी.रस्त्याच्या सुभेदारी विश्रामगृहालगत नेहरू बालोद्यान येथे या संग्रहालयाची इमारत सहा दालनाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. विदेशी पर्यटकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडावे, तसेच पूर्वजनांचे राहणीमान, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता यावा या दृष्टीने विविध दालनांची उभारणी करण्यात आली आहे अशी कार्यालयीन टिप्पणी छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाबाबत महानगरपालिकेच्या पत्रकात केलेली आहे. परंतु हे संग्रहालय उभे करण्याच्या ठरावात केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय’ असे संग्रहालयाचे नाव सर्वानुमते पारित केलेले असताना संग्रहालयाच्या उभारणी नंतर मात्र छत्रपतींच्या नावासमोर ‘श्रीमंत’ नावाचे ठिगळ जोडण्यात आले. अशी जातीय विद्वेषाची पिचकारी मारत असताना ‘श्रीमंत’ या नावाची मेख कुणाच्या लक्षातही येऊ न देता खुद्द शिवछत्रपतींना नोकरांच्या रांगेत नेऊन बसवण्यात आले. या संदर्भात मराठवाड्यातील आघाडीचे दैनिक असणाऱ्या दै. लोकपत्रने प्रा.रवींद्र तेह्किक आणि चमूच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून अनेक धक्कादायक बाबी पुराव्यानिशी समोर आणल्या त्या बद्दल दै.लोकपत्र, प्रा.रवींद्र तहकिक आणि त्यांच्या सर्व कार्यकुशल टीम चे हार्दिक अभिनंदन.

      छत्रपती शिवाजी महाराजांनी एतद्देशीय लोकांना संघटीत करून अठरा पगड जातीतील रयतेचे स्वराज्य निर्माण केले. एतद्देशीय लोकांमध्ये आपणही अभिषिक्त राजे होऊ शकतो याची जाणीव निर्माण करण्यासाठी शिवरायांनी मा जीजाउंच्या मार्गदर्शनाखाली ६ जून १६७४ रोजी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकानंतर सर्वप्रथम ‘छत्रपती’ ही उपाधी शिवरायांनी धारण केली. नंतरही ही उपाधी केवळ त्यांच्याच घराण्यातील अभिषिक्त लोकांसाठीच वापरण्यात आली आणि आजही वापरण्यात येते. शिवरायांच्या पूर्वी भारताच्या उभ्या इतिहासात कुणीही ‘छत्रपती’ झाला नाही. म्हणूनच सभासदाने ‘मऱ्हाठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही’ असे उद्गार काढले. त्यानंतर शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करत पेशवे पदही निर्माण केले. शिवरायांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी पेशव्यांना पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. ज्या छत्रपतींच्या कृपेने पेशव्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली त्या छत्रपतींचे ऋण मान्य करण्यासाठी पेशवे स्वताच्या नावापुढे ‘श्रीमंत’ ही उपाधी लाऊ लागले. यावरून स्पष्ट होते की पेशवे हे छत्रपतींचे चाकर, नोकर, मांडलिक असून छत्रपतीचे घराणे त्यांचे मालक होते. म्हणूनच छत्रपती ही उपाधी ‘श्रीमंत’ या पदवीपेक्षा केवळ सन्माननीयच नव्हे तर श्रेष्ठही ठरते. असे असताना औरंगाबाद महानगरपालिकेच्या मूळ ठरावात नसलेला आणि मागाहून जोडलेला श्रीमंत हा शब्द शिवछत्रपतींना खुद्द नोकरांच्या पंगतीत नेऊन बसवणारा आहे. त्यामुळे छत्रपती या नावासमोरील श्रीमंत नावाचे ठिगळ स्वतः महापालिकेने काढून टाकायला हवे अन्यथा समाजात याचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत.

ठरावात काय आहे?
      दि. २६ जून २०१३ च्या दै.लोकपत्रमध्ये औरंगाबाद महानगरपालिकेचे तीनही मूळ दस्तावेज छापून आलेले आहेत. त्यात नियुक्तीपत्र, ठरावाची सूचना आणि पुराणवस्तू संग्रहालयाच्या बाबतीतील एक कार्यालयीन टिपण्णीही आहे. पैकी नियुक्तीपत्र (सर्वसाधारण सभा ठराव क्र. २१/१८ दिनांक ३१.५.९७ व सुधारित ठराव क्र. ६७/८ दिनांक २.९.९७, जा.क्र.मनपा/अस्था -१/४८२२/१९९७ दिनांक:-२३/९/१९९७) हे डॉ. शांतीलाल पुरवार यांना पुराणवस्तू संग्रहालयाचे डायरेक्टर म्हणून नियुक्त केल्याबद्दल दिलेले आहे. या नियुक्तीपत्राच्या विषयामध्ये संग्रहालयाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय’ असे धडधडीतपणे दिसत आहे. यात कुठेही श्रीमंत नावाचा साधा उल्लेखही नाही. तसेच महानगरपालिकेत पुराणवस्तू संग्रहालय उभारणीच्या बाबतीत जो ठराव झाला त्या ठरावातही श्रीमंत नाव आढळून येत नाही. एवढेच नव्हे तर श्रीमंत नाव लावावे असा कायदेशीर ठरावही महानगर पालिकेने त्यावेळी घेतलेला नाही. मग असे असताना शिवरायांच्या छत्रपती उपाधीला कलंकित करणारा सडका, जातीयवादी मेंदू कुणाचा आहे?

श्रीमंत नाव लावण्यामागचा प्रमुख सूत्रधार
      बऱ्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बाबा पुरंदरे म्हणजे जणू काही आधुनिक शिवाजी महाराजच असे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेले होते. शिवरायांचे कोणतेही शिल्प, शिवसृष्टी, वगैरे उभारायचे ठरले की आमचे सरकार पुरंदरेच्या पायावर लोटांगण घालायचे आणि पुरंदरेंनी सरकारच्या आणि जनतेच्या अवास्तव विश्वासाचा गळा आवळत शिवरायांच्या नावाखाली ब्राह्मणी किडे मोठे करण्याचे कारस्थान खेळायचे असा खेळ वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. या पुरांदरेचे एवढे अवास्तव स्तोम माजवण्यात आले होते की जन्मलेल्या बाळाचे नाव जरी शिवाजी ठेवायचे म्हटले की लोक बाबा पुरंदरेचा सल्ला घ्यायचे. याच परावलंबी सवयीनुसार औरंगाबादेतील वस्तुसंग्रहालय उभे करतानाही सल्लागार म्हणून पुरंदरेचेच पाय धरण्यात आले. त्यात महानगरपालिकेत सेनेची सत्ता म्हणजे ‘सेनेच्या सोन्यावर पुरंदरेंचा सुहागा.’ मग काय? पुरंदरेनी थेट औरंगाबाद गाठले आणि त्यांच्या मेंदूत घर करून बसलेली पेशवाई त्यांनी पुराणवस्तू संग्रहालयात ओकली. शिवरायांच्या नावासमोरील श्रीमंत हे नाव लावण्याची करामतही अर्थातच या पुरंदरेचीच. पुरंदरेचा दराराच एवढा की महानगरपालिकेने श्रीमंत या नावाचा कसलाही ठराव पारित केलेला नसताना देखील त्यांनी श्रीमंत ही पदवी छत्रपती या उपाधीसमोर जोडले. या प्रकल्पाची कल्पना मांडणारे डॉ.शांतीलाल पुरवार यांनी शेवट पर्यंत श्रीमंत या नावाला विरोध केला परंतु तत्कालीन आयुक्त डी.एन.वैद्य यांच्या संगनमताने पुरंदरेने आपला गालीछ हेतू सफल करून घेतला. यात तत्कालीन मनपा आयुक्त वैद्य यांचे ब्राह्मण असणे चांगलेच फायद्याचे ठरले. दै. लोकपत्र मधील बातमी नुसार त्यावेळी एका अभियन्त्यानेही श्रीमंत हे नाव पुढे वादग्रस्त ठरू शकते, ही पेशव्याची उपाधी आहे आणि मुख्य म्हणजे ठरावात या नावाचा उल्लेख नाही हे पुरंदरे आणि वैद्य या ब्राह्मण जोडगोळीच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु एका बैठकीत पुरंदरेंनी साध्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात श्रीमंत असे लिहून तो कागद वैद्य यांच्या हातात दिला आणि हीच अक्षरे संग्रहालयाच्या दर्शनी भागात लावा अशी सक्त ताकीदही दिली.

जात मोठी की प्रशासकीय पद मोठे?
      जेव्हा पुराणवस्तू संग्रहालय उभारले गेले तेव्हा औरंगाबाद मनपाचे तत्कालीन आयुक्त डी.एन.वैद्य हे होते. विशेष बाब म्हणजे ते जातीने ब्राह्मण होते. वैद्यही ब्राह्मण आणि पुरंदरेही ब्राह्मण. मग काय? आपल्या जातीच्या वर्चस्वासाठी झगडणारा पुरंदरे प्रत्येक ब्राह्मणाला शिवरायांपेक्षाच काय तर देश, धर्म आणि देवापेक्षाही मोठा वाटतो. आजही ब्राह्मणांच्या घरी फक्त शिवरायांचा फोटो असत नाही तर रामदास-शिवराय एकत्र असलेलाच असतो. यावरून ब्राह्मणांचे शिवप्रेम किती खोटे आहे हे लक्षात येते. जेम्स लेन प्रकरणातही एकाही ब्राह्मणाने जेम्स लेनचा आणि त्याला मदत करणाऱ्या १४ ब्राह्मणांचा आजतागायत साधा निषेधही केला नाही. उलट निषेध केला तो लेन प्रकरण जिथे शिजले त्या भांडारकर संस्थेवरील हल्ल्याचा. यावरून सिद्ध होते की ब्राह्मण फक्त आपल्याच जातीचे हित पाहतो. मग ब्राह्मण असणाऱ्या वैद्यला पुरंदरे म्हणजे साक्षात देवच. हे वैद्य महाशय बाबा पुरंदरे जेव्हा जेव्हा औरंगाबादेत यायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या वाहनाचे दार उघडून एखाद्या चोपदाराप्रमाणे उभा राहत असल्याचे लोकपत्रने दिलेले आहे. असे करणे एखाद्या ब्राह्मणाला शोभते परंतु प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला शोभत नाही. परंतु ब्राह्मण हा शेवटी ब्राह्मणच असतो. पुरंदरेचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानून या वैद्य यांनी पुरंदरेच्या जातीय विकृतीला प्रशासकीय आधार दिला. श्रीमंत नावाला विरोध करणाऱ्यांना प्रशासकीय बडगा दाखविण्यात येऊ लागला. एवढेच नव्हे तर संग्रहालयातील कामाचे कंत्राटही पुरंदरेच्या मर्जीतील लोकांनाच देण्यात आले. यावरून एका प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा पुरंदरेचा शब्द लाख मोलाचा होता असे लक्षात येते. पुरंदरेनेही आपल्या याच प्रभावाचा वापर विकृत शिल्पे, विकृत इतिहास आणि विकृत चित्रे बनविण्यासाठी करून घेतला. श्रीमंत नावाचे ठिगळ जोडताना संजय केणेकर हे तत्कालीन उपमहापौर होते. हे केनेकरही एवढे शिवभक्त आहेत की तमाम शिवप्रेमींच्या काळजाला डागण्या देणारे लेन प्रकरण झाल्यानंतर यांनी त्यांच्या मतदारसंघात चक्क ‘दादोजी कोंडदेव नावाने गणेश मंडळ स्थापन केले.’

      विशेष गोष्ट म्हणजे पुण्याच्या लाल महालातील ‘दादोजी शिवरायांचे एकत्रित शिल्पही’ रत्नाकर कुलकर्णी मनपा आयुक्त असताना आणि सुहास कुलकर्णी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना निनाद बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारले गेले. हा योगायोग नाही तर जिथे जिथे ब्राह्मण वरच्या पदावर असतात तिथे तिथे ते आपली जातीय हागणदारी इमाने इतबारे पसरवण्याचे काम करत असतात. म्हणून आजही एखाद्या शासकीय ब्यांकेत कर्जासाठी गेले की तुमचे आडनाव तुम्हाला हमखास विचारले जाते. परीक्षेत एखादा ब्राह्मण शिक्षक असेल तर नकला करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरून हात फिरवला जातो. हेतू एवढाच की अंगात जाणवे असेल तर त्या विद्यार्थ्यावर कडक कारवाई केली जाऊ नये. बऱ्याच धार्मिक ठिकाणी जेवण देताना अंगावरील शर्ट काढून ते दिले जाते कारण आत असणाऱ्या जाणाव्यावरून त्या व्यक्तीची जात लक्षात येते. या विरोधात बहुजनांनी काही आंदोलन केले केले की त्यांनाच जातीयवादी ठरवले जाते. प्रशासकीय पदापेक्षा या लोकांना त्यांच्या जातीचा मनुष्य महत्वाचा वाटतो एवढे यांचे जात प्रेम आमच्या कधी लक्षात येणार?

ब्रह्मराक्षसांचा शब्दच्छल
     
      दै.लोकपत्रच्या वृत्त मालिकेनंतर प्रतिक्रियांचा ओघ येणे साहजिक होते. या प्रतिक्रिया जशा श्रीमंत या नावाला विरोध करणाऱ्या आल्या तशा त्या श्रीमंत नावाचे समर्थनही करणाऱ्याही आल्या. ज्या बाबा पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली पुराणवस्तू संग्रहालय उभारण्यात आले त्या बाबा पुरंदरेंनी रवींद्र तहकीकांचा शिवाजी महाराजावरील लेख वाचून, औरंगाबाद येथे आल्यानंतर स्वताची गाडी पाठवून बोलून घेऊन, एक फौंटन पेन भेट देऊन कौतुक केले होते. तह्कीकांचे तेव्हाचे लिखाण कदाचित पुरंदरेंना अपेक्षित असे असेल. परंतु सध्या प्रा.रवींद्र तह्कीकांकडे खऱ्या खोट्याचा निवडा करण्याची दृष्टी आहे. यातूनच त्यांनी औरंगाबाद मनपा आणि बाबा पुरंदरे यांना पार उघडे नागडे केले. तेव्हा मात्र बाबा पुरंदरे यांनी प्रा.रवींद्र तहकिक यांना ओळखण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर ती मनपा आणि त्या मराठा संघटना काय गोंधळ घालायचा तो घाला मला पुन्हा फोन सुद्धा करू नका असे पुरंदरे म्हणाले. यावरून त्यांची कार्यपद्धती लक्षात यायला हरकत नाही. याच पुरंदरेचे मानसपुत्र निनाद बेडेकर यांची एक प्रतिक्रिया दै.लोकपत्र मध्ये छपून आली. यात ते  म्हणतात -“छत्रपतींना यापूर्वी श्रीमंत ही उपाधी कुणी लावली नव्हती असे नाही. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपतींच्या व्यक्तित्वाचे जे गौरवास्पद काव्यमय पत्र शिवपुत्र संभाजींना उद्देशून लिहिले होते त्यात छत्रपतींचा उल्लेख श्रीमंत योगी असा केला होता. तेव्हा तर पेशवे नव्हते? आणि मुळात श्रीमंत या शब्दाचा अर्थ वैभवशाली, सामर्थ्यवंत असा असल्याने हा शब्द छत्रपतींसाठी वापरल्याने काहीही बिघडत नाही. तो छत्रपती या बिरुदा आधी असावा की नसावा हा वादाचा मुद्दा आहे. त्या बद्दल मी काही भाष्य करू इच्छित नाही. पण श्रीमंत हा  शब्द पेशव्यान्साठीच  निर्माण झाला असे नाही. तो आधीही होता. नंतरही आहे. म्हणूनच तो फक्त पेशव्यांसाठीच वापरावा असा हट्ट जसा योग्य ठरणार नाही त्याचप्रमाणे तो छत्रपतींच्या आधी लावला म्हणून छत्रपतींचे अवमूल्यन होते असे मला वाटत नाही. अर्थात यावारुउन वादच निर्माण होत असेल तर त्यावर अधिक भाष्य करण्यात मला स्वारस्य नाही. ” इतिहास अभ्यासकांचे काम हे इतिहासातील वाद मिटवण्याचे असते परंतु पुरंदरे असोत, बेडेकर असोत की मेहेंदळे असोत, जेव्हा जेव्हा एखाद्या ऐतिहासिक मुद्द्यावर वाद निर्माण झाले तेव्हा तेव्हा या तथाकथित अभ्यासकांनी गप्प राहणेच पसंद केले. जाहीर परिसंवादाला बोलावले तरी गैरहजर राहिले. यावरून इतिहासातील वाद मिटावे असे या वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांना वाटत नाही हेच सिद्ध होते. रामदास हा गुरु नसल्याचा कसलाही पुरावा नाही हे माहित असतानाही पुरंदरेंनी त्याला संशयाचा फायदा द्यायला काय हरकत आहे? अशी भूमिका घेतली होती तर दादोजी शिवरायांचे गुरु नाहीत हे माहित असूनही जिजाऊ-शिवरायांशेजारी त्यांचा पुतळा असायला काय हरकत आहे? अशी जातीयवादी आणि विकृत भूमिका सगळ्याच ब्राह्मण इतिहासकारांनी आणि त्यांच्या चेल्या चपात्यांनी घेतली होती.
     
       प्रतिक्रिया देताना बेडेकर यांनी श्रीमंत नावाचा महिमा सांगितला परंतु हे नाव छत्रपतीच्या आधी लावावे की नंतर यावर मात्र न बोलणे पसंत केले. मुळात श्रीमंत नावाचा महिमा काय? यावरून हे आंदोलन पेटलेले नाही तर ते छत्रपतीच्या अगोदर कसे? यावरून पेटलेले असताना नेमक्या वादग्रस्त मुद्द्यावरच गप्प राहणे म्हणजे आपल्या जात भाईंच्या विकृत कृत्याला पाठीशी घालणे होय.
      
      बेडेकरांनी श्रीमंत शब्दासाठी रामदासाची साक्ष काढली तर वसंत कुंभोजकर यांनीही गीतेचा  हवाला देऊन श्रीमंत हे नाव कसे सामर्थ्यवान संपन्न आहे हे सांगितले. ही उपाधी भलेही पेशव्यांसाठी वापरली गेली असली तरी श्रीमंत या शब्दाचा अर्थ कमी दर्जाचा होत नाही. इथेही कुंभोजकरांनी त्यांच्या पारंपारिक ब्राह्मणी स्टाईलीत गोलमाल उत्तर देऊन अप्रत्यक्षरित्या श्रीमंत नावाचे समर्थनच केले. मुद्दा श्रीमंत नावाचा अर्थ चांगला आहे की वाईट असा नसून जी उपाधी छत्रपतीनी पेशव्यांना दिली तीच उपाधी खुद्द छत्रपतींच्या नावासमोर लावणे योग्य आहे काय? असा आहे. पण यावर कसलेही भाष्य न करता तुम्हाला हा शब्द छत्रपतींच्या अगोदर खटकत असेल तर काढून टाका? असा शहाजोगपणाचा सल्ला मात्र कुंभोजकर द्यायला विसरत नाहीत. म्हणजे श्रीमंत हा शब्द बेडेकर यांच्या प्रमाणेच कुम्भोजकरांनाही खटकत नाही हेच यातून दिसून येते.
      
      याउलट संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.यू.म.पठाण यांचे मत महत्वाचे आहे. ते म्हणतात “श्रीमंत हा शब्द अपमानदर्शक आहे की नाही हा प्रश्नच नाही. शब्द सन्मानदर्शकच  आहे. परंतु तो छत्रपतींच्या नावा आधी जोडणे मात्र खटकणारे आहे. शब्दाला फक्त शब्दकोशातच अर्थ असतात असे नाही, प्रत्येक शब्दाला वाच्यार्थ, व्यंगार्थ, लक्षार्थ, लक्षणीय अर्थ, संदर्भित अर्थही असतात. श्रीमंत या शब्दाचा शब्द कोशातील अर्थ वैभव संपन्न असा असला तरी संदर्भित अर्थ मात्र पेशव्यांची उपाधी असा आहे. म्हणूनच जेव्हा हा शब्द छत्रपतींच्या आधी लावला जातो तेव्हा तो कमी दर्जाचा ठरतो. एकदा छत्रपती म्हटल्यानंतर पुन्हा त्या आधी श्रीमंत म्हणण्याची गरजच काय? ” जी सडेतोड भूमिका पठाण सरांनी घेतली अशी भूमिका बेडेकर-कुंभोजकर घेत नाहीत उलट ते श्रीमंत शब्दाच्या अर्थाचेच तुणतुणे वाजवत बसतात. पुरंदरेनी तर या संदर्भात मला काहीही विचारू नका अशी तंबी देऊन मौन पाळणे पसंद केले. परंतु पुरंदरे साहेब ‘मौन संमती दर्शनम’ असे एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे मग तुमची आणि तुमच्या जातभायींची शिवरायांच्या विकृतीकरणाला मूक संमतीच आहे ना?

      जेष्ठ सामाजिक विचारवंत तथा साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी मात्र या अश्लाघ्य प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. ते म्हणतात-“श्रीमंत ही उपाधी सातारच्या गादीने पेशव्यांना दिलेली उपाधी आहे. ही काही स्वतंत्र राज्याची गौरवास्पद उपाधी नाही. पेशव्यांची श्रीमंत ही उपाधी मांडलिकत्व प्रदर्शित करणारी आहे. अर्थातच ती छत्रपतींच्या तुलनेत दुय्यम आहे. श्रीमंत या शब्दाचा शब्द कोशातील अर्थ सांगून हा शब्द छत्रपतींच्या अगोदर लिहिला तर काय बिघडते? असे म्हणणे म्हणजे शब्दच्छल आहे. त्यातून या मागची सुप्त अशी हिणकस वृत्तीच दृग्गोचर होते.” ब्राह्मणवाद्यांनी तलवारीच्या बळावर नव्हे तर भाषा प्रभुत्वाच्या ताकदीवर गेली साडे तीन हजार वर्ष भारतीय बहुजन समाजाचे शोषण केलेले आहे, स्वजातीचे वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. श्रीमंत या शब्दाचाही शब्दकोशातील अर्थ सांगून सर्व सामन्यांचा बुद्धिभेद करून स्वजातीचे वर्चस्वच पुन्हा प्रस्थापित करणे होय. मुळात श्रीमंत हे नाव लावण्याचा कसलाही ठराव पारित केलेला नसताना श्रीमंत नाव का लावले? हा मुद्दा असताना ब्राह्मणवादी मात्र शब्दांचे खेळ करून त्याला नेहमी प्रमाणे बगल देत आहेत.
      
शिवरायांचे कुलदैवत आणि रामदास-कोंडदेवाबाबत काय?


      दै.लोकपत्रने औरंगाबाद महानगरपालिकेच्या शिवद्रोही कारभाराबाबत जी लेखमाला चालवली त्याचे मराठवाडाभर तीव्र पडसाद उमटले. बऱ्याच सामाजिक संघटनांनी या संदर्भात महापौरांना तथा आयुक्तांना निवेदनही दिले. परंतु हे निवेदन देताना एक काळजी मात्र घेण्यात आली नाही. ती म्हणजे सर्वच संघटनांनी पुराणवस्तू संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरील ‘श्रीमंत’ हे नाव तत्काळ काढून टाकावे या संदर्भातच निवेदने दिली. परंतु पुराणवस्तू संग्रहालयात केवळ श्रीमंत शब्दाचीच हागणदारी नाही तर शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानी ऐवजी दुर्गेचे शिल्प उभारणे, शिवरायांचा लष्करी गुरु म्हणून दादोजीला दाखवणे, पुण्याच्या भूमीत नांगर हाकताना शिवरायांसमवेत दादोजी दाखवणे, शिवाजी महाराज गुढगे टेकून रामदासाची करूणा भाकताना दाखवणे अशी तद्दन खोटी आणि अनैतिहासिक तथ्येही उजळ माथ्याने उभी केलेली आहेत. हे अनैतिहासिक शिल्प, चित्र  अथवा मुरल्स तत्काळ काढून टाकावे अशी मागणी मात्र संभाजी ब्रिगेड वगळता कुण्याही संघटनेने केलली दिसत नाही. महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ञांची समिती नेमून दादोजी आणि रामदास या कागदी गुरूंबाबत संशोधन केलेले आहे. या समितीने एकमुखी निर्णय दिला की दादोजी आणि रामदास यांचा शिवरायांचा गुरु म्हणून दुरान्वयेही संबंध नाही. एवढेच नव्हे तर रामदास आणि शिवरायांची उभ्या आयुष्यात भेटही झाली नाही. या समितीच्या अहवालानुसारच स्वतः शासनाने चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात योग्य ते बदल केले आणि पुणे महानगरपालिकेने लाल महालातील दादोजींची २७ डिसेंबर २०१० रोजी हकालपट्टी केली. अर्थातच हे निर्णय कुण्याही संघटनेचे व्ययक्तिक निर्णय नव्हते तर ते शासन स्तरावर घेतले गेलेले शासकीय निर्णय होते. जसा हा निर्णय कोणत्याही संघटनेशी निगडीत नव्हता तसा हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हता. तो पूर्णतः इतिहास तज्ञांनी सखोल संशोधन करून दिलेला निर्णय होता. मग शासनाचा हाच निर्णय समोर ठेऊन राज्यभरातील शिवश्रुष्टीतून रामदास-कोंडदेव यांना वगळायला हवे. खरे तर या संदर्भात महाराष्ट्र शासनानेच एक अध्यादेश काढून त्याची अंमल बजावणी करायला पाहिजे. कारण इतिहासातील अनैतिहासिक मुद्द्यांसाठी प्रत्येक वेळेस एखाद्या संघटनेने आंदोलन करणे हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला आणि सामाजिक संघटनांनाही परवडणारे नाही. २०२० साली भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असताना देशातील सामाजिक संघटनांना इतिहासात नसलेल्या पात्रांसाठी जर वारंवार आंदोलन करावे लागत असतील तर तरुण भारताची उर्जा ही एखाद्या विधायक कार्यासाठी न वापरली जाऊन अस्तित्वात नसलेल्या गोष्टींसाठीच वापरावी लागेल आणि हे भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने नक्कीच चांगले नाही. म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने या बाबतीत योग्य निर्णय घेऊन (जसा तो इतिहासाचे चौथीचे पुस्तक आणि लालमहालातील शिल्पाच्या संदर्भात घेतला तसा) राज्यातील शिवप्रेमींना न्याय द्यावा. अन्यथा वारंवार अस्मितेशी खिलवाड होत राहिला तर राज्यातील शिवप्रेमींना कायदा हातात घेतल्या वाचून पर्याय राहणार नाही.