Wednesday 12 August 2015

राजमुद्रा प्रतिष्ठाण, पेठवडज यांच्या ऐतिहासिक कार्याची दैनिक मूलनिवासी नायक या दैनिकाने घेतलेली दखल



राजमुद्रा प्रतिष्ठाण, पेठवडज यांच्या ऐतिहासिक कार्याची दैनिक मूलनिवासी नायक या दैनिकाने घेतलेली दखल. वरील बातमी दै. मूलनिवासी नायक मध्ये दि. १० ऑगस्ट २०१५ ला प्रसिद्ध झालेली आहे. आम्ही दै. मूलनिवासी नायकच्या  संपादकांचे आभार मानतो. 


आपण असे कधी वागणार ?

सध्या एका संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यावर अत्यंत खालच्या पातळीवर आरोप होत आहेत. ज्या लोकांनी त्यांचे संगठन सोडले आहे ते लोक समाजामध्ये काही प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या (अप) प्रचारामुळे बरेच कार्यकर्ते संगठना सोडत आहेत. काही तर अगदी सामुहिकरित्या संगठन सोडत आहेत. केडरबेस कार्यकर्ते टिकून असले तरी बऱ्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मनात या विषयी उगाचच संभ्रम निर्माण झाला आहे. ते काहीही असले तरी आज ही वेळ ज्या संगठनेवर आली तशीच वेळ बऱ्याच सामाजिक संघटनेवर एकदा तरी येत असते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. नेतृत्वाबद्दलच प्रश्न चिन्ह निर्माण केले जाते. परंतु सामाजिक चळवळीत कार्य करत असताना मला असे वाटते की हे जे काही होत आहे किंवा होत असते ते अत्यंत चुकीचे आहे. आपला लढा हा या देशातील हजारो वर्ष जुने असणाऱ्या बलाढ्य अश्या ब्राह्मणवादी व्यवस्थेशी आहे. आपला शत्रू हा अत्यंत मजबूत आहे. खुनशी आहे. आजही सामान्य लोकांना प्रश्न पडतो की अवघा तीन टक्के असणारा हा समाज सगळ्या क्षेत्रात आपले वर्चस्व कसा काय टिकून असेल बरे? बांधवांनो याची बरीच करणे देता येतील. किंवा ही कारणे आपल्या इतिहास संशोधकांनी, समाजविश्लेषकांनी दिलेली आहेत. परंतु एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला वयक्तिकरित्या असे वाटते की ब्राह्मण समाज, त्यांच्या संगठना आणि त्यांचे स्वयंसेवक हे जाहीररित्या स्वजातीय नेतृत्वावर किंवा सामान्य कार्यकर्त्यावर कधीच टीका करत नाहीत. त्यांचा कधीच अवमान करत नाहीत. चार भिंतीत एकमेकांना लाथा घालतील परंतु जेव्हा समाजाचा मुद्दा येतो तेव्हा ही मंडळी मात्र कमालीची एकजूट दाखवते. त्यांच्या जातभाईने कितीही नीच पातळीचे काम केलेले असले तरी ते लोक त्याच्यावर कधीच टीका करत नाहीत. केले तर समर्थन करतील किंवा त्यावर मौन बाळगून बसतील पण त्याचे अवमूल्यन कधीच करणार नाहीत. रामदासाने आणि शेकडो वैदिक ग्रंथांनी जे सांगितले आहे की ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ नेमके हेच सूत्र घेऊन ब्राह्मण समाज जगत असतो. आपला जातभाई भलेही बलात्कारी असेल, खुनी असेल, अतिरेकी असेल पण एकही ब्राह्मण त्याला तसे दाखवत नाही. अहो ही मंडळी तर एवढी निर्लज्ज आहेत की यांच्यातील खुनी अतिरेकी माणसांनाही हे हुतात्मा म्हणून प्रोजेक्ट करतात. आत्ता बोला. उदा. नथुराम गोडसे. ब्राह्मणी व्यवस्थेच्या हजारो वर्ष्यांच्या यशाचे जे गमक आहे ना? त्या अनेक कारणांपैकी हे कारण महत्वाचे आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

      खरेखुरे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की “पुरोगामी ब्राह्मण व प्रतिगामी ब्राह्मण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एकाच्या अस्तित्वासाठी दुसरा लढ्ल्याशिवाय राहत नाही.” बाबासाहेब असे का बरे म्हणाले असतील? बाबासाहेबांनी हे वाक्य अत्यंत अभ्यासातून चिंतनातून आणि स्वानुभवातून सांगीतलेले होते. आता बाबासाहेबांनी सांगितलेला हा सिद्धांत आजच्या पुरोगामी आणि प्रतिगामी ब्राह्मणांनाही लागू होतो काय? चला आपण याची काही उदाहरणे पाहू. महाराष्ट्रात जेव्हा जेम्स लेन प्रकरण घडले ते जरा आठवा. तेव्हापासून आजपर्यंत एकाही पुरोगामी किंवा प्रतिगामी ब्राह्मणाने लेन बद्दल, त्याच्या लिखाणाबद्दल किंवा त्याला सहकार्य करणाऱ्या भांडारकरी ब्राह्म्नांबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. उलट नरेंद्र दाभोळकर आणि मेधा पाटकर यांच्यासारख्या तथाकथित पुरोगाम्यांनीही जेम्स लेनच्या विकृतीचे समर्थन करणाऱ्या लोकांना आपापल्या प्रसार माध्यमांचे विचारपीठ उपलब्ध करून दिले. सध्या महाराष्ट्रात ब.मो. पुरंदरे या देशी जेम्स लेनला फडणवीस सरकारने यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केलाय त्यावरून किती रणकंदन माजले आहे हे आपण पाहतोच आहोत. मला एक तरी भट ब्राह्मण दाखवा की जो पुरंदरेने  केलेल्या विकृतीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. रस्त्यावर उतरणे जाऊ द्या. किमान त्याचा साधा निषेध तरी कुण्या ब्राह्मणाने केलाय का? भिडे सारख्या विकृत मनुवादी किड्यापासून ते चाणक्य मंडळाचे सर्वेसर्वा असणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांच्या पर्यंत एकजात भट ब्राह्मण पुरंदरेचेच गुणगान गात आहेत. पुरंदरेच कसे श्रेष्ठ आहेत याचा कंठशोष करत आहेत. या धर्माधिकारी यांनी एक बाब ध्यानात घेतली पाहिजे की यांच्या चाणक्य मंडळात ९०% मुले ही बहुजनांची आहेत. त्यांच्या कडूनच फिसच्या स्वरुपात वसूल केलेल्या पैशावर हे धर्माधिकारी शिवरायांची व मॉं साहेबांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेचे समर्थन करतो म्हणजे याचाच अर्थ ही जातीयतेची भावना या लोकांमध्ये किती घट्ट रुजली आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. काही ब्राह्मण महाभागांनी तर पुरंदरेंचा  उल्लेख पितृतुल्य, ऋषीतुल्य, गुरुवर्य असा केलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ही मंडळी एकजात आपल्या जातभाईंचे समर्थन करण्यात गुंतलेली असतात. मग ती व्यक्ती कितीही विकृत आणि गुन्हेगार असली तरीही.
  मग असे वागणे आपल्याला का बरे जमत नाही? माझा हा सवाल आहे.

सर्वात आश्चर्याचे आणि धक्कादायक उदाहरण मी तुम्हाला देतो. राजर्षि शाहू महाराजांच्या काळात वेदोक्त प्रकरण किती गाजले होते हे आपणास ठाऊक आहे. शाहू हे मराठे असल्यामुळे ते शुद्र आहेत म्हणून त्यांचे विधी वेदोक्त मंत्रांनी न करता पुराणोक्त मंत्रांनीच म्हणजे शुद्रांसाठी असणाऱ्या मंत्रांनीच करणार असे शाहू महाराजांनी पगार देऊन नोकरीवर ठेवलेल्या चपराश्याच्या पातळीच्या नारायण भटाने खुद्द राजर्षि शाहू महाराजांना सुनावले होते. आता हा भटुरडा स्नान संध्या करणारा कर्मठ ब्राह्मण असल्यामुळे त्याचे असे म्हणणे आपण एकवेळ समजून घेऊ हो. पण टिळक? हो तेच आपले तथाकथित लोकमान्य टिळक. ते तर त्यावेळी राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते. शाहूंना आशा होती की किमान हे टिळक तरी आपल्या बाजूने उभे राहतील. पण काहीही झाले तरी ब्राह्मण हा शेवटी ब्राह्मणच असतो. तो पाहिल्यान्दाही ब्राह्मण असतो आणि शेवटीही ब्राह्मणच असतो. तो कधीच भारतीय, मराठी अथवा हिंदू असत नाही. शाहूंच्या अपेक्षेवर सपशेल पाणी फिरवत टिळक नावाच्या या राष्ट्रीय नेत्याने चक्क भुरट्या भटाची बाजू घेतली आणि शाहूंना क्षत्रिय मानायला नकार दिला. आपले केसरी नावाचे वर्तमानपत्र टिळकांनी तमाम भटांचे मुखपत्र बनवले. नारायण भटाच्यामागे टिळकांनी प्रचंड मोठी नैतिक ताकत उभी केली आणि काहीही केले तरी राजर्षि शाहूंचा पराभव करायचाच असा चंग बांधला. बरे टिळक ज्या भटाची बाजू घेत होते त्या भटाची नैतिक बाजूही तपासून पाहूयात. हा नारायण भट वेश्यांच्या संगतीमध्ये रात्र काढायचा. शाहू महाराजांचा ड्रायव्हर गाडी घेऊन याला वेश्येच्या घरून नदीवर आणायचा. पण हा बहाद्दर साधी आंघोळही करायचा नाही की तोंडही धुवायचा नाही. पारस्या अंगानेच राजर्षी शाहुंसाठी मंत्र म्हणायचा. याचे कारण विचारले असता अत्यंत उर्मटपणे तो म्हणाला की शाहू हे शुद्र आहेत आणि शुदाची पूजा करताना मला अंघोळीची गरज नाही. काय जातिवंत हरामखोरी आहे हो ही. किती पराकोटीचा निर्लज्जपणा आहे हा. तरीही असल्या चारित्र्यहीन भटासाठी टिळकाने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली. का? कारण रामदासानेच सांगितलय ना की ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. याला म्हणतात जातीयवाद आणि याला म्हणतात एकी. या टिळकाने शाहूंना एवढा त्रास दिला होता की शेवटी शाहूंना म्हणावे लागले की “ हे टिळक जर परदेशात जन्मले असते तर मी यांना गोळी घालून ठार केले असते.”

    तत्कालीन ब्राह्मणाने एका अस्पृश्य जातीतील स्त्रीवर बलात्कार केला होता तेव्हा सुद्धा टिळक म्हणाला होता की “त्याने बलात्कार केला नसून त्या अस्पृश्य असणाऱ्या स्त्रीचा अस्पृश्यता उद्धार केला.” धन्य आहेत रे बाबा असले लोकमान्य आणि त्यांचे चेले.

    सांगण्याचे तात्पर्य काय की टिळकासारखा राष्ट्रीय पातळीवरचा ब्राह्मण एक चारित्र्यहीन भटाची बाजू घेतो, त्याला राजर्षि शाहुंपेक्षा जास्त महत्व देतो आणि आपण मात्र अत्यंत सामान्य कार्यकर्ते असतानाही एका राष्ट्रीय पातळीवरील आपल्याच नेत्याची बदनामी करतो? काय म्हणावे याला.  भावांनो ही व्यवस्था फार मजबूत आहे. आपल्याला यासाठी निरंतर, पिढ्यानपिढ्या लढा द्यावा लागणार आहे. सातत्याने समाज जागृती करावी लागणार आहे. तेव्हा आपल्याच लोकांवर अश्लाघ्य आरोप करून चळवळी संपवण्याचे काम करू नका. कुणाचे विचार पटत नसतील तर दुसऱ्या माध्यमातून आपल्या महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार करा. तुम्हाला कुणी अडवलंय का? पण उगाच साप साप म्हणून जमीन बडवण्यात काही अर्थ आहे का? भटांकडून एवढा एक गुण (?)जरी आपण घेतला ना तरी मला वाटते आपला लढा बराच यशस्वी होईल.

-डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
(०५/०८/२०१५)

~~@@@~~