Saturday 4 August 2012

'वाघ्या'ची आख्यायिका (४ ओगस्ट २०१२ च्या पुण्य नगरीतील अग्रलेख)

            रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील सन 1936 मध्ये उभारण्यात आलेल्या वाघ्या कुर्त्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर कार्यकत्र्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर सरकारने दबावाला बळी पडून त्या पुतळ्याची पुनस्र्थापना केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार असाच रागरंग दिसतो. कारण या अस्मितेशी संभाजी ब्रिगेडच काय कोणीच तडजोड स्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दंतकथेवर आधारित भाकड संदर्भ चिटकून अधून-मधून जो वादंग उद्भवतो तो टाळण्यासाठी या इतिहासाचे वस्तुनिष्ठ संशोधन झाले पाहिजे. युगपुरुषाच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जाते, ही बाब जेम्स लेन या माथेफिरू इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातून स्पष्ट झाली. त्यातूनच पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूटची संभाजी ब्रिगेडने मोडतोड केली. त्या वेळी त्यांना 'गुंड' म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्याविरोधात मोठा गजहब झाला, पण तद्नंतर जेव्हा वस्तुस्थिती पुढे आली तेव्हा संभाजी ब्रिगेडची भूमिकाच योग्य होती, ही बाब सर्वमान्य झाली. जेम्स लेन प्रकरणावर पडदा पडल्यानंतर संभाजी बिग्रेडने दादोजी कोंडदेव यांचा वाद ऐरणीवर घेतला. त्यांनी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा दावा केला. त्यासाठी इतिहास संशोधकांना ललकारून त्यांना ऐतिहासिक सबळ पुरावा देण्याचे आवाहन केले, पण त्यांना एका पाठोपाठ एक मुदत देऊनही ते सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हलवला. उलट - सुलट चर्चा झडली, पण कोणी अजूनही पुरावा देऊ शकले नाही. इतिहासाचा कोणताच संदर्भ नसेल तर केवळ श्रद्धेपोटी तो वस्तुनिष्ठ कसा मानता येईल. तेव्हा संभाजी ब्रिगेडचा विरोध अनाठायी म्हणता येणारच नाही. संभाजी ब्रिगेडला 'बोल' लावून मनुवाद्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण किती काळ सहज करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबाबतच इतिहासातील वाद-विवादाला सुरुवात होते. महाराष्ट्र सरकारने त्यावर इतिहास संशोधकांच्या माध्यमातून संशोधन करून तो जाहीर केला तरी अनेक पक्ष आणि मंडळी आपला हेका दरवर्षी चालवतातच ना, हे कशाचे द्योतक मानायचे. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुर्त्याचा पुतळा त्याच कपोकल्पित पठडीतील आहे. म्हणून तर संभाजी ब्रिगेड विरोध करत आहे. वाघ्या कुर्त्याचे समर्थक कोणताच ऐतिहासिक पुरावा अथवा संदर्भ का देऊ शकत नाहीत. महाराजांचा इमानी कुत्रा म्हणून मानल्या जाणार्‍या वाघ्या कुर्त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेत उडी मारली होती, अशी आख्यायिका रंगून सांगणे म्हणजे इतिहास नव्हे. राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' या नाटकात आलेल्या कुर्त्याच्या या उल्लेखावरून हा इतिहास समजणे संयुक्तिक नाही. गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते नाटककार होते. भाकडकथा नाटक-सिनेमात उठून दिसतात इतिहासात नाहीत. इतिहास, दंतकथा आणि श्रद्धा याची सरमिसळ सामाजिकदृष्टय़ा हानीकारक ठरते. तेव्हा इतिहास जशाच्या तसाच स्वीकारावा लागतो. तशी अवस्था दंतकथा अथवा श्रद्धेची नसते. राम गणेश गडकरी यांचे नाटक हा ऐतिहासिक दस्तऐवज मानला, तर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी होणार नाही का ? ती वाघ्या कुर्त्याच्या समर्थकांना मान्य होईल का, याचे उत्तर द्यावे. महात्मा फुले यांनी 1869 साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला. शिवरायांवर प्रदीर्घ पोवडा लिहिला पण त्यात या कुर्त्याबाबत कोठेच उल्लेख नाही. 1981-82 च्या दरम्यान इंग्रजी लेखकजेम्स डग्लस यांनी शिवरायांवर अभ्यास करून पुस्तक लिहिले, त्यात कोठे हा संदर्भ नाही. 1929 साली वि. वा. जोशींनी राजधानी रायगड नावाचे पुस्तक लिहिले, त्यातही या कुर्त्याचा संदर्भ कोठे आढळत नाही. जेधे शकावली आणि अन्य तत्कालीन साहित्यात कोठेच उल्लेख नसताना केवळ गडकरींच्या नाटकावरून वाघ्या कुर्त्याचे उदात्तीकरण करणे ही नाटय़रूप विकृती ठरते. ती टाळण्यासाठी संभाजी ब्रिगेडने तीन वर्षे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. पुराव्याच्या संशोधनाची मागणी केली. पुरातत्त्व विभागाकडे कोणता ठोस पुरावा नसल्यानेच संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुर्त्याचा पुतळा उद्ध्वस्त केला. सरकारने त्याची पुनस्र्थापना केल्याने राज्य सरकारने आता एक तर ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडची मागणी मान्य करावी.

2 comments:

  1. Hay Boss, who gave you the right to decide this? Dont try to get the taliban into India.

    ReplyDelete
  2. nice & Real Editorial of PUNYANAGARI!! Thanx to Editor & Balaji jahav sir.

    ReplyDelete